मुंबई : गुजरातस्थित ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) ९ जानेवारीपासून खुली होत आहे. या माध्यमातून १,००० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार असून, कंपनीने प्रति समभाग ३१५ ते ३३१ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. नवीन कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये मुख्य मंचावर सूचिबद्ध होणारी ज्योती सीएनसी ऑटोमेशन मुख्य कंपनी आहे.

हेही वाचा >>> Stock Market Today : तेजी परतली ! ‘सेन्सेक्स’ची ४९१ अंशांनी मुसंडी

The Hindustan Urvarak And Rasayan Limited Apply Online for 80 Various Posts Vacancies Check all the detailed
HURL Recruitment 2024 : एचयूआरएल अंतर्गत ‘या’ पदांसाठी होणार भरती; महिना १६ लाख पगार; जाणून घ्या शेवटची तारीख
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री

ही समभाग विक्री ९ जानेवारीला खुली होईल आणि ती ११ जानेवारीला बंद होईल. गुंतवणूकदार किमान ४५ समभागांसाठी आणि त्यानंतर ४५ समभागांच्या पटीत बोली लावू शकतील. तर सुकाणू गुंतवणूकदारांना ८ जानेवारीरोजी समभागांसाठी बोली लावता येईल. कंपनी १,००० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. या माध्यमातून मिळणारा निधी कंपनी कर्जफेडीसाठी आणि कंपनीच्या दीर्घकालीन कार्यरत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे.

कंपनीने एकूण आकारमानाचा ७५ टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १० टक्के किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. याआधी २०१३ मध्ये कंपनीने आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी सेबीकडे मसुदा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यांवेळी आयपीओची योजना बारगळली.

हेही वाचा >>> विमान प्रवास आता स्वस्त होणार, इंडिगोने इंधन शुल्क लावण्याचा निर्णय घेतला मागे

ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही संगणक संख्यात्मक नियंत्रण (कॉम्युटर न्यूमेरिकल कंट्रोल – सीएनसी) मशीनची एक आघाडीची उत्पादक आहे. तिच्या ग्राहकांमध्ये इस्रो, ब्रह्मोस एरोस्पेस तिरुवनंतपुरम लिमिटेड, तुर्की एरोस्पेस, एमबीडीए, युनिपार्ट्स इंडिया, टाटा ऍडव्हान्स सिस्टीम, टाटा सिकोर्स्की एरोस्पेस, भारत फोर्ज, कल्याणी टेक्नोफोर्ज आणि बॉश या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२३ अखेर, कंपनीच्या उत्पादनांसाठी ३,३१५ कोटी रुपयांच्या मागणी नोंदवण्यात आली आहे.