मुंबई : सरलेल्या आर्थिक वर्षात राज्यात तीन लाख कोटींपेक्षा अधिक वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन झाले आहे. देशाच्या एकूण २०.१८ लाख कोटींच्या वार्षिक संकलनात महाराष्ट्राचा वाटा हा १५ टक्के आहे.

सरलेल्या मार्च महिन्यात राज्यात २७,६८८ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. या वर्षातील हे दुसरे सर्वाधिक संकलन आहे. देशात सरलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षात २०.१८ लाख कोटींचे एकूण संकलन झाले, त्यात महाराष्ट्राचा वाटा हा तीन लाख कोटींपेक्षा अधिक म्हणजेच जवळपास १५ टक्के आहे. जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक कायम राखला आहे.

india second highest gst collection at 1 78 lakh crore in march
मार्चमध्ये दुसरे सर्वाधिक १.७८ लाख कोटींचे जीएसटी संकलन; आर्थिक वर्षात एकूण संकलन उद्दिष्टापेक्षा सरस २०.१८ लाख कोटींवर
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
34.37 lakh crore tax revenue target of the Central government is completed
केंद्राचे ३४.३७ लाख कोटींचे कर महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

हेही वाचा >>> निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

करोनानंतर अर्थव्यवस्थेला गती आल्यावर २०२१-२२ या वर्षात राज्यात २ लाख १७ हजार कोटींचे संकलन झाले. गेल्या वर्षी २०२२-२३ मध्ये २ लाख ७५ हजार कोटींचे संकलन झाले होते. यंदा २०२३-२४ मध्ये प्रथमच ते तीन लाख कोटींवर गेल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या आकडेवारीवरून राज्याची अर्थव्यवस्था बळकट झाल्याचे मानले जाते.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

गेल्या एप्रिल महिन्यात राज्यात सर्वाधिक ३३,१९६ कोटींचे संकलन झाले होते. त्यानंतर सरलेल्या मार्चमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे संकलन झाले आहे.

२०२३-२४ मध्ये दरमहा झालेले संकलन : एप्रिल (३३,१९६ कोटी), मे (२३,५३६ कोटी), जून (२६,०९८ कोटी), जुलै (२६,०६४ कोटी), ऑगस्ट (२३,२८२ कोटी), सप्टेंबर (२५,१३७ कोटी), ऑक्टोबर (२५ जार कोटींपेक्षा अधिक), नोव्हेंबर (२५,५८५ कोटी), डिसेंबर (२६,८१४ कोटी), जानेवारी (आकडेवारी उपलब्ध नाही), फेब्रुवारी (२७,०६५ कोटी), मार्च (२७,६८८ कोटी)