पीटीआय, नवी दिल्ली

येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांची बँक खाती खुली करण्याचा आदेश भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने बुधवारी दिला. तसेच, कपूर यांचे समभाग (डीमॅट) आणि म्युच्युअल फंड खातीही खुली करण्याचे निर्देश दिले आहेत. डीएचएफएल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मार्च २०२० पासून कारागृहात असलेल्या कपूर यांना मोठ्या अवधीनंतर मिळू शकलेला हा दिलासा आहे.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
Paytm Payments Bank Managing Director and CEO Surinder Chawla resigns
पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा
Threats from leaders of India Alliance Allegation of Prime Minister Narendra Modi
इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून धमक्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

‘सेबी’ने जुलै महिन्यात कपूर यांनी खासगी क्षेत्रातील कर्जदारांचे अतिरिक्त टिअर-१ (एटी १) रोखे चुकीच्या पद्धतीने विकल्याप्रकरणी २.२२ कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली होती. या रकमेत व्याज आणि वसुली खर्चाचाही समावेश होता. हे पैसे १५ दिवसांत न भरल्यास अटक करण्याची आणि मालमत्ता गोठविण्याचा इशारा सेबीने दिला होता.

आणखी वाचा-ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना १ लाख कोटींच्या वसुलीच्या नोटिसा

सेबीने कपूर यांना सप्टेंबर २०२२ मध्ये २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तो न भरल्याने सेबीने ही नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांची मालमत्ता गोठविण्यात आली. मात्र रोखे अपिलीय न्यायाधिकरणाने सेबीच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. तसेच, कपूर यांना सहा आठवड्यांत ५० लाख रुपयांचे भरण्याचे आदेश दिले. कपूर यांनी या मुदतीत पैसे भरल्याने त्यांची गोठविलेली बँक व इतर खाती खुली करण्याचा आदेश सेबीने आता दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २० नोव्हेंबरला न्यायाधिकरणासमोर होणार आहे.