मुंबई : जपानस्थित सॉफ्टबँकेने पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्समधील २ टक्क्यांहून अधिक समभागांची गेल्या महिन्याभरात विक्री केली आहे. भांडवली बाजार नियामक सेबीच्या अधिग्रहणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्समधील समभागांची विक्री करण्यात आली.  

हेही वाचा >>> Stock Market Today : सेन्सेक्स पुन्हा ७१ हजारांवर विराजमान

बाजार मंचाने दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टबँकेची कंपनी असणाऱ्या एसव्हीएफ इंडिया होल्डिंग्ज (केमन) लिमिटेडने १९ डिसेंबर २०२३ आणि २० जानेवारी २०२४ दरम्यान वन ९७ कम्युनिकेशन्समधील १.२७ कोटी समभाग विकले आहेत, जे एकूण समभागसंख्येच्या अंदाजे २ टक्के होते. हा व्यवहार सुमारे ९५० कोटी रुपयांना पार पडला. यांनतर सॉफ्टबँकेची पेटीएममध्ये सुमारे ५.०६ हिस्सेदारी आहे. सॉफ्टबँकेने २०१७ मधील अखेरच्या तिमाहीत पेटीएममध्ये १.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.

The issue of soybean prices is important in the election
सोयाबीनच्या दरांचा मुद्दा निवडणुकीच्या पटलावर
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
SME, small and medium enterprises, initial public offerings, ipo, Raise, Rs 5579 Crore, Current Financial Year, Investors Profit, finance, financial knowledge, finance year end,
‘एसएमई आयपीओं’च्या मंचावर विक्रमी ५,५७९ कोटींची निधी उभारणी

देशांतर्गत गुंतवणूकदारांची हिस्सेदारी वाढली

देशांतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांनी डिसेंबर २०२३ अखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत पेटीएममधील त्यांची भागीदारी अनुक्रमे १२.८५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे, जी एका तिमाहीपूर्वी ८.२८ टक्के होती. सॉफ्टबँकेकडून पेटीएमच्या समभागांची विक्री सुरू असल्याने गेल्यावेळेस त्याचे प्रतिकूल परिणाम समभागांवर उमटले होते. मात्र आता देशांतर्गत गुंतवणूकदार देखील समभाग खरेदीमध्ये पुढे सरसावला आहे. परिणामी गेल्या महिन्याभरात पेटीएमच्या समभागात मोठी पडझड झालेली नाही.

बुधवारी, मुंबई शेअर बाजारात पेटीएमचा समभाग किरकोळ वाढीसह ७५५.९० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे ४८,०१५ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.