तब्बल २० वर्षांनंतर टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO आला आहे. तो येताच बाजारात एकच खळबळ उडाली. रतन टाटा यांच्या नावाने टाटा टेकला खूप प्रेम मिळत आहे. इतर कोणत्याही कंपनीला क्वचित तेवढीच रक्कम मिळाली असेल. विशेष म्हणजे या IPO साठी लोकांनी एक लाख कोटी रुपये पणाला लावले आहेत. आता कोणाला किती शेअर्स मिळतात हा नशिबाचा भाग आहे. Tata Tech च्या IPO चा आज शेवटचा दिवस होता. ४ वाजून ५७ मिनिटांनी कंपनीचा IPO जवळपास ७० पट सबस्क्राइब झाला. Tata IPO ची सद्यस्थिती काय आहे हेसुद्धा आपण जाणून घेणार आहोत.

एक लाख कोटींची बोली

टाटा टेकचा आयपीओ ३ हजार कोटी रुपयांचा आहे. तर गुंतवणूकदारांनी या IPOमध्ये भरपूर पैशांची बोली लावली आहे. ३ हजार कोटी रुपयांच्या IPOने १ लाख कोटींहून अधिक मूल्याच्या समभागांसाठीची मागणी मिळवली. या IPO ची इश्यू किंमत ४८५ ते ५०० रुपये आहे. आज अर्जाचा शेवटचा दिवस होता. या IPO च्या प्रचंड मागणीमुळे संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६६००० कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. याचा अर्थ कंपनीला QIB कडून IPO मध्ये जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन मिळाले आहे.

raver lok sabha seat, Raksha Khadse increase in assets, Eknath Khadse s loan of 23 lakhs on Raksha Khadse, seven and a half crores, marathi news, lok sabha 2024, raver lok sabha 2024,
रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे यांचे २३ लाखांचे कर्ज, मालमत्तेत साडेसात कोटींनी वाढ
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

हेही वाचाः मोठी बातमी! RBI ने अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी केले बरखास्त, ग्राहकांवर काय परिणाम?

८० टक्क्यांहून अधिक प्रीमियम

या कंपनीचा आयपीओ ज्या प्रकारे ब्लॉकबस्टर ठरला आहे. तशाच प्रकारे कंपनीच्या लिस्टिंगमुळेही धमाका होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्सची किंमत ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियमवर असू शकते. असे झाल्यास कंपनीचे शेअर्स लिस्टिंग दरम्यान ९०० रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. खरं तर ते खूप आश्चर्यकारक मानले जाईल. मात्र, या कंपनीच्या शेअर्सची मागणी नॉन लिस्टिंग कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे. ग्रे मार्केट प्रीमियम ९०० रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञांच्या मते, कंपनीचे शेअर्स १००० रुपयांमध्येही लिस्ट केले जाऊ शकतात. गुंतवणूकदार या कंपनीच्या शेअर्सची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.

हेही वाचाः Money Mantra : ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या पब्लिक इश्यूचे महत्त्व

फेडबँक वगळता सर्वत्र चांगला प्रतिसाद

टाटा व्यतिरिक्त इतर कंपन्यांचे आयपीओही आले आहेत. पण Fedbank Finance चा आयपीओ सोडून इतर आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे. इतर चारही आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Tata Technologies साठी आतापर्यंत एकूण सदस्यता मागणी सुमारे ७० पट आहे. फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीजच्या ५९३ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शामध्ये सुमारे १३.७३ पट भरणा झाला आहे.