आज शेअर बाजार तेजीसह व्यवहार करीत आहे. शेअर बाजारातील सर्व निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी २९२.६५ अंकांच्या म्हणजेच १.४४ टक्क्यांच्या वाढीसह २०,५६०.५५ अंकांवर पोहोचला आहे. या वाढीसह NSE वर सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात वाढ झाली आहे. NSE ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, NSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल प्रथमच ४ ट्रिलियन यूएस डॉलर्स ( ३३४.७२ ट्रिलियन) ओलांडले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी NSE ने २०,२९१.५५ चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. आजही NSE सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत आहे. शुक्रवारी निफ्टी -५०० निर्देशांकानेही १८,१४१.६५ या सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. याचा अर्थ निफ्टी -५०० निर्देशांक दाखवतो की, इक्विटी बाजारातील तेजी केवळ लार्ज कॅप समभागांपुरती मर्यादित नाही.

NSE ने अलीकडेच आपल्या निवेदनात म्हटले आहे की, NSE चे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलर ओलांडणे हा एक मैलाचा दगड आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल जुलै २०१७ मध्ये २ ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. मे २०२१ मध्ये ते जवळजवळ ३ ट्रिलियन यूएस डॉलरवर पोहोचले होते. त्याचप्रमाणे NSE ला ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास ४६ महिने लागले.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
Will Nifty reach the difficult stage of 22800 to 23400 in bullish trend
तेजीच्या वाटचालीतील २२,८०० ते २३,४०० हा अवघड टप्पा निफ्टी गाठेल?
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?

हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ दोन योजनांमध्ये गुंतवणूक करून महिला होऊ शकतात श्रीमंत, लाखोंचा परतावा मिळणार

एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले, NSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडणे हा देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अर्थव्यवस्थेतील सकारात्मक भावनेने भांडवली बाजाराला गती दिली आहे. बाजार भांडवलानुसार, NSE वरील महत्त्वाच्या तीन कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि HDFC बँक आहेत. बाजार भांडवलाच्या आधारावर भारत पहिल्या पाच देशांपैकी एक असल्याचे एनएसईने आपल्या निवेदनात म्हटले आहे. NSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल भारताच्या GDP च्या १.१८ म्हणजेच ११८ टक्के आहे. खरं तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा यूएस यांसारख्या विकसित बाजारपेठांपेक्षा कमी आहे, असंही NSE ने निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: भाजपाच्या विजयानंतर शेअर बाजारात तेजी, १५ मिनिटांत बाजारात ४ लाख कोटींची कमाई

चालू आर्थिक वर्षात NSE वर शेअर्सचे ट्रेडिंग व्हॉल्यूम ४७ टक्के होते. हे अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि ब्राझील यांसारख्या काही जागतिक बाजारपेठांपेक्षा खूपच कमी आहे. इक्विटी विभागाची दैनंदिन सरासरी उलाढाल ६ पटीने वाढली आहे आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जची दैनंदिन सरासरी उलाढाल गेल्या १० वर्षांत ५ पटीने वाढली आहे, असे एक्सचेंजने म्हटले आहे. NSE ने चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२३ पर्यंत इक्विटी आणि कॉर्पोरेट बाँड्समधील प्राथमिक बाजारांद्वारे ५,००,००० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे. इक्विटी विभागामध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात दैनंदिन सरासरी उलाढालीत २७ टक्के आणि इक्विटी डेरिव्हेटिव्हमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात २९ नोव्हेंबर २०२३ (बुधवार) रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चे बाजार भांडवल ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले होते. BSE सूचीबद्ध कंपनीचे बाजारमूल्य गेल्या १० वर्षांत १७.५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढले आहे.