भाजपाच्या तीन राज्यांतील विजयानंतर सोमवारी शेअर बाजारातील व्यापाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडला. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. BSE सेन्सेक्स १,०४९.३१ म्हणजेच १.५५ टक्क्यांच्या वाढीसह ६८,५३०.५० अंकांवर आणि निफ्टी ३१६.७० अंकांच्या म्हणजेच १.५६ टक्क्यांच्या वाढीसह २०,५८४.६० अंकांवर उघडला. बाजाराला मजबूत देशांतर्गत आणि जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. निफ्टीमध्ये अदाणी एंटरप्रायझेस आणि अदाणी पोर्ट्सचे शेअर्स ४ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. एवढेच नाही तर बीएसईने बाजार उघडताच १५ मिनिटांत ४ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. जर आपणाला शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविलेल्या निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास तर निफ्टी मिड कॅप १००, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक मध्ये बंपर वाढ नोंदवली जात आहे.

१५ मिनिटांत ४ लाख कोटींची कमाई

सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ४ लाख कोटी रुपयांनी वाढून ३४१.७६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच मार्केट ओपनिंगच्या १५ मिनिटांत बीएसईने ४ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. बाजारातील जाणकारांच्या मते ४ राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे बाजारात सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
ipo investment
Initial Public Offer: गुंतवणूकदारांचा ‘आयपीओ’द्वारे २०२४ मध्ये विक्रमी १.२२ लाख कोटींचा भरणा
sensex gains 335 degrees on muhurat trading day
Muhurat Trading Day: सवंत्सर २०८१ बक्कळ लाभाचे… मुहूर्ताला सेन्सेक्सची ३३५ अंशांची कमाई
Assets soar of Maharashtra cabinet ministers
पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?

हेही वाचाः BYJU’s च्या १००० कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबरचे पगार रखडले, कंपनीनं दिलं ‘हे’ कारण

या समभागांमध्ये वाढ झाली

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या तासांमध्ये NTPC, Larsen & Toubro, Axis Bank, SBI, ICICI, Airtel २ टक्क्यांपर्यंत वाढले. आयटीसीचे समभाग हिरव्या रंगात व्यवहार करीत होते. एम अँड एम, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्सही वाढीसह उघडले. तसेच नेस्ले लाल चिन्हावर उघडले. याशिवाय सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदाणी समूहाच्या सर्व नऊ सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आणि गौतम अदाणी यांच्या अदाणी ग्रीन एनर्जीचे शेअर्स १० टक्क्यांच्या वाढीसह उघडले. सोमवारी अदाणी टोटल गॅस आणि अदाणी पॉवरसह अदाणी एंटरप्रायझेस सहा टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करीत होते, तर एनडीटीव्ही, अदाणी पोर्ट्स, अदाणी विल्मार, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट या सर्व कंपन्यांचे शेअर्स वधारत होते.

हेही वाचाः LPG Price Hike: काल मतदान संपलं, आज गॅस सिलिंडरची भाववाढ! मुंबईसह विविध शहरांमधील नवे दर जाणून घ्या

जिओ फायनान्शिअलमध्येही वाढ झाली

सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात पटेल इंजिनीअरिंग, कामधेनू लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, देवयानी इंटरनॅशनल, एक्साइड इंडस्ट्रीज, जिओ फायनान्शियल, गती लिमिटेड, टाटा मोटर्स, युनि पार्ट्स इंडियाचे शेअर्स वधारत होते, तर स्टोव्ह क्राफ्ट आणि ओम इन्फ्रा यांचे शेअर्स वधारत होते. सोमवारी प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये बीएसई सेन्सेक्स ९५० अंकांनी वाढून ६८४३५ च्या पातळीवर कार्यरत होता, तर निफ्टीने २०६०० ची पातळी ओलांडली होती. अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीची शक्यता फेटाळून लावली असली तरी निफ्टी बंपर वाढ नोंदवत असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्य निवडणूक निकालांचा सकारात्मक परिणाम

भारतातील तीन प्रमुख उत्तरेकडील राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर दलाल स्ट्रीटने वेग पकडला आणि विक्रमी उच्चांक गाठला आहे. ” देशातील राज्य निवडणुकांचे निकाल ही एक मोठी घटना ठरली आहे, ज्यामुळे नवा आशावाद निर्माण होऊ शकतो आणि बाजारात आणखी तेजी येऊ शकते. बाजाराला राजकीय स्थिरता आणि सुधारणा केंद्रित, बाजाराला अनुकूल सरकार आवडते. बाजाराच्या दृष्टिकोनातून परिणाम अपेक्षेपेक्षा जास्त चांगले होते,” असंही जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूकदार व्ही. के. विजयकुमार म्हणालेत.