लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
(बीएसई कोड: ५४३५२६)

प्रवर्तक : भारत सरकार
बाजारभाव: रु. ७९३/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : जीवन वीमा
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६,३२५ कोटी

Portfolio RATHMANI METALS AND TUBES LIMITED
माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलिओ’ला देई पोलादी ताकद ! रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ९६.५०
परदेशी गुंतवणूकदार ०.१०

बँकस्/ म्यूचुअल फंडस्/ सरकार ०.८५
इतर/ जनता २.५५

पुस्तकी मूल्य: रु. ९६.७
दर्शनी मूल्य: रु. १०/-

गतवर्षीचा लाभांश: ३०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ६५.१

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १३.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ००

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४१
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ००

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड: १४९
बीटा: ०.९
बाजार भांडवल: रु. ५०१,४१३ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ८२०/५३०

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीबद्दल खरे तर काहीच लिहायची गरज नाही. संपूर्ण मध्यमवर्गीयांचा केवळ सुरक्षिततेचा नव्हे तर, कर बचत आणि गुंतवणुकीचा देखील आवडीचा पर्याय म्हणजे जीवन विमा. आणि गेल्या अनेक वर्षांचे हे समीकरण अजूनही तसेच आहे.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) ही भारतातील सर्वात मोठी विमा प्रदाता कंपनी आहे. नवीन बिझनेस प्रीमियममध्ये एलआयसीचा बाजार हिस्सा सर्वाधिक असून कंपनी सहभागी विमा उत्पादने आणि बाजार-संलग्न (युलिप) विमा उत्पादने, बचत विमा उत्पादने, मुदत विमा उत्पादने, आरोग्य विमा आणि वार्षिकी आणि पेन्शन उत्पादने यासारखे अनेक आकर्षक पर्याय प्रस्तुत करते.

एलआयसी जागतिक स्तरावर पाचव्या स्थानावर असून एकूण मालमत्तेच्या बाबतीत (४५.५० लाख कोटी रुपये) जागतिक स्तरावर दहाव्या स्थानावर आहे. भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक असलेली एलआयसीची अनेक सूचीबद्ध शेअर्समध्ये तसेच सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक खूप मोठी आहे. सध्याच्या शेअर बाजारातील तेजीचा फायदा एलआयसीला निश्चित होईल.

वर्ष २००० पर्यंत, एलआयसी ही भारतातील एकमेव जीवन विमा कंपनी होती. मात्र गेल्या दशकभरात एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय, एसबीआयसारख्या अनेक खाजगी दिग्गज विमा कंपन्या बाजारात आल्या आहेत. मात्र एलआयसीचा बाजार हिस्सा (६८.६६ टक्के) अजूनही सर्वाधिक आहे. एलआयसी हा ब्रॅंड केवळ भारतातच नव्हे तर जगातलाही मोठा ब्रॅंड समजला जातो. गेल्याच वर्षी गाजावाजा होऊन भारतातील सर्वात मोठ्या ‘आयपीओ’द्वारे एलआयसीने सरकारचा ३.५० टक्के भागभांडवली हिस्सा ९०२ ते ९४९ रुपये प्रति शेअर दराने विकला होता. दुर्दैवाने शेअर बाजारात मात्र एलआयसीची कामगिरी निराशाजनक राहिली. महिन्याभरपूर्वी ६५० रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर सध्या मात्र तेजी दाखवून ८०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षांत एलआयसीने पहिल्या तिमाहीत उत्तम कामगिरी केली होती. मात्र दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत ११ टक्के घट होऊन नक्त नफाही गेल्या वर्षातील तिमाहीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. मात्र असे असूनही सप्टेंबरपर्यंत पहिल्या सहमाहीत कंपनीच्या ढोबळ एनपीएमध्ये मोठी घट होऊन ते ५.६० टक्क्यांवरून २.४० टक्क्यांवर आले आहेत. संपूर्ण भारतातील कानाकोपऱ्यांत आपल्या शाखा, सेवा केंद्रे तसेच १३.५ लाख एजंटच्या साहाय्याने सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने आता नवीन आकर्षक उत्पादने बाजारात आणून खाजगी कंपन्यांप्रमाणे डिजिटलायझेशनलादेखील सुरुवात केली आहे. त्याचा मोठा फायदा आगामी काळात दिसून येईल. भारतीय शेअर बाजारातील अनेक मोठ्या कंपन्यांत एलआयसीची लक्षणीय गुंतवणूक असून सध्याच्या तेजीचा फायदा कंपनीला होईल. ‘सेबी’ने एलआयसीला केंद्र सरकारचा भांडवली हिस्सा ७५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यास १० वर्षांचा अवधी दिला आहे. त्यामुळे भांडवलातील सरकारी हिस्सा अजून काही वर्षतरी ९० टक्क्यांवर राहील. वर्षभराहून अधिक काल संयम बाळगलेल्या एलआयसीच्या आयपीओ गुंतवणूकदारांना लवकरच लाभाचे दिवस येतील अशी अपेक्षा आहे. नवीन गुंतवणूकदारांनी देखील मध्यम कालावधीसाठी एलआयसीचा जरूर विचार करावा.

-हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे.

-प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यांंपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

-लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Stocksandwealth@gmail.com