डॉ. दिलीप सातभाई

यंदाच्या वर्षी केंद्रीय मध्यवर्ती प्रत्यक्ष कर मंडळाने घोषित केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्र-४ (सुगम) हे प्राप्तिकर विवरणपत्र भरताना त्रास न देणारे व पात्र करदातावर्गात प्राप्तिकर विभागातर्फे उत्पन्नाची जवळपास छाननी न होणारे म्हणून सर्वात लोकप्रिय असणाऱ्या या प्राप्तिकर विवरणपत्रात फारसे महत्वाचे बदल केलेले नाहीत. मात्र त्यातील माहिती पूर्वीप्रमाणेच केवळ काटेकोरपणेच नव्हे तर विस्तारपूर्वक देणे आता बंधनकारक झाले आहे.

Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
sharda madeshwar upsc marathi news, sharda madeshwar upsc marathi news
चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”

प्रत्येक करदात्याने योग्य प्राप्तिकर विवरणपात्र निवडावे ही प्राप्तिकर विभागाची अपेक्षा आहे व त्याप्रमाणे कार्यवाही करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जरी बदल झालेले नसले तरी करदात्यांना गतवर्षीची माहिती लक्षात नसते, त्यामुळे त्याची उजळणी होणे आवश्यक असते. ३१ मार्च २०२३ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाकरिता आता हे विवरण पत्र आता पन्नास लाख रुपयांपर्यंत एकूण ‘ढोबळ उत्पन्न’ असणाऱ्या ‘निवासी व सामान्य निवासी’ असणाऱ्या व्यक्तीस भरता येईल.याचा अर्थ केवळ हेच विवरणपत्र सोपे आहे म्हणून भरावे असा नसून करदात्याच्या इच्छेनुसार तो १, २ किंवा ४ पैकी कोणतेही प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो.

हेही वाचा… Money Mantra : अवघा एक दिवस शिल्लक; अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आज संपणार

प्राप्तिकर विवरणपत्र-४ फॉर्म प्राप्तिकर कायद्याच्या कलम ४४एडी, कलम ४४एडीए आणि कलम ४४एई नुसार गृहीत उत्पन्न योजनेचा पर्याय निवडलेल्या करदात्यांसाठी आहे. तथापि, व्यवसायाची उलाढाल रुपये दोन कोटींपेक्षा व बौद्धिकी व्यवसायाची उलाढाल रुपये पन्नास लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास करदात्यास प्राप्तिकर विवरणपत्र-३ दाखल करावे लागेल. यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पात या दोन्ही मर्यादा जर ९५% उत्पन्न व खर्च बँकेमार्फत नोंदीत झाल्यास अनुक्रमे रुपये तीन कोटी व रुपये पंचाहत्तर लाख इतकी वाढविण्यात आली आहे. तथापि, ही तरतूद पुढील वर्षासाठी म्हणजे आकारणी वर्ष २०२४-२५ साठी लागू होणार आहे. सबब चालू वर्षाच्या प्राप्तिकर विवरणपत्रात व मर्यादेत बदल नाहीत.

कोणाला हे विवरणपत्र भरता येणार नाही?

करदात्यांचे शेतीपासून मिळणारे करमुक्त उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल (इतर करमुक्त उत्पन्नास अट नाही) किंवा लॉटरी वा घोड्यांच्या शर्यतीत उत्पन्न मिळविले असेल किंवा भांडवली नफा किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळविले असेल किंवा परदेशात काही मालमत्ता असल्यास, किंवा विदेशी कर सवलत मिळणार असेल, किंवा काही उत्पन्न परदेशातून आले असेल किंवा उर्वरीत स्त्रोतातून मिळणारे उणे उत्पन्न असेल किंवा जी व्यक्ती कंपनीमध्ये संचालक असेल किंवा शेअर बाजारात नोंद नसणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असल्यास किंवा घरापासून मिळणाऱ्या उत्पन्नाऐवजी नुकसान होत असेल व ते पुढील वर्षाकरीता ओढायचे असेल तर किंवा करदाता ‘निवासी व सामान्य निवासी नसेल किंवा अनिवासी’ असेल तर हे विवरण पत्र भरता येणार नाही. ज्या करदात्यांनी उपरोक्त निर्दिष्ट केलेल्या अटीपैकी एकजरी अट पूर्ण केल्यास त्यानी आयटीआर-३ भरावयाचा आहे.

काय आहेत महत्वाचे बदल?

पगारदार, निवृत्ती वेतनधारक व ज्येष्ठ नागरिक वर्गात प्राप्तिकर विभागामार्फत उत्पन्नाची शक्यतो छाननी न होणारे विवरणपत्र म्हणून प्राप्तिकर विवरणपत्र-४ (सुगम) या प्राप्तिकर विवरणपत्रात बदल झाले नसून १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षभरात करदात्याने एक किंवा अधिक वीज जोडांवर आलेल्या सर्व वीज देयकांवर मिळून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्यास ती रक्कम, तर वर्षभरात एका किंवा अनेक चालू, बचत, मुदत, आवर्ती खात्यांमध्ये एकत्रितरीत्या एक कोटी रुपयांपेक्षा ‘रोख’ रक्कम भरली असल्यास ती रक्कम, तसेच वर्षभरात जर परदेशी वारीवर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास त्याची रक्कम उपलब्ध फिल्डमध्ये भरणे बंधनकारक केले आहे.

हेही वाचा… Money Mantra: एनएसडीएल (NSDL) करणार भांडवली बाजारात प्रवेश

एका चेकबॉक्समध्ये १३९ कलमांतर्गत भरलेले रिटर्न सामान्य फाईलिंग दरम्यान नमूद केले गेले आहे की नोटिशीस प्रतिसाद म्हणून दाखल केले आहे हे स्पष्ट करावे लागणार आहे. वस्तू व सेवा कर कायद्या अंतर्गत किती धंद्याची किती उलाढाल दर्शविली आहे त्याची माहिती द्यावी लागणार आहे. मालवाहू वाहनांची माहिती म्हणजे नोंदणी क्रमांक, मालकी हक्क, वाहनाची मालवाहू क्षमता, किती महिन्याचे वर्षभरातील मालकी आहे, इ. माहिती भरण्याची आहे. गेल्या वर्षापासून निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती धारक असा नवा पर्याय समाविष्ट करण्यात आला होता.

कलम ४४ एडीए

आयटीआर ४ (सुगम) मध्ये ज्या डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, चार्टर्ड अकौंटंटस, माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक, आर्किटेक्टस, इंटेरियर डेकोरेटर्स, तांत्रिक सल्लामसलत, अंतर्गत सजावट, अधिकृत प्रतिनिधी, चित्रपट कलाकार, कंपनी सचिव आणि माहिती तंत्रज्ञान या व्यवसायात आहेत. अधिकृत प्रतिनिधीचा अर्थ असा आहे – कोणतीही व्यक्ती, जो एखाद्याचे प्रतिनिधित्व करतो, फी किंवा मोबदल्यासाठी, कोणत्याही कायद्यांतर्गत कोणत्याही न्यायाधिकरण किंवा प्राधिकरणासमोर.

हेही वाचा… Money Mantra : टाटा समूहाच्या ५ सर्वोत्तम योजना; १ लाखाच्या बदल्यात ६.७ लाखांपर्यंत फायदा

फिल्म आर्टिस्टमध्ये निर्माता, अभिनेता, कॅमेरामन, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, संपादक, गायक, गीतकार, कथा लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, ड्रेस डिझायनर – मुळात कोणतीही व्यक्ती जो त्याच्या व्यावसायिक क्षमतेत सामील आहे चित्रपटाची निर्मिती आदी एकूण निर्देशित वीस व्यावसायिकांना मिळणारे ढोबळ सेवाशुल्क इतर स्त्रोतापासून मिळणाऱ्या उत्पन्नासह पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक नसल्यास, कलम ४४एडीए अंतर्गत मिळालेल्या सेवाशुल्काच्या पन्नास टक्के रक्कम उत्पन्न गृहीत धरण्याची सुसंधी या प्राप्तिकर विवरणपत्र-४ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली असल्याने मोठ्या प्रमाणावर प्राप्तीकर वाचणार आहे. याखेरीज कारकुनी काम वाचल्याने सदर व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. पगारदार वर्गाला जशी खर्चासाठी प्रमाणित वजावट दिली जाते तशी नसली तरी त्या सारखी खर्चाची तरतूद गृहीत उत्पन्नाच्या निकषाद्वारे मिळत आहे ही सुविधा व्यवसायिक लोकांना मिळणार आहे हे महत्वाचे!