कौस्तुभ जोशी

भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारपेठेत भारतातील बलाढ्य टू व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्पने प्रवेश केला आहे. या वर्षभरात तब्बल तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल बाजारात आणल्या जातील अशी घोषणा कंपनीचे सीईओ निरंजन गुप्ता यांनी केली आहे.

Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग…
Firewall , Wife, Children Property Rights, MWPA,
जिम्मा न् विमा : पत्नी, मुलांच्या मालमत्ताधिकाराचा फायरवॉल – एमडब्ल्यूपीए
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
angel investor, investor, investment, startup,
प्रतिशब्द : दर्शन दे रे इशदूता : एंजल इन्व्हेस्टर – देवदूत गुंतवणूकदार 
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?

सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी जयपुर येथे ही घोषणा करण्यात आली. हिरो एक्स्ट्रीम १२५ आर आणि १२५cc या दोन दुचाकींची नवीन आवृत्ती बाजारात आणणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

राजस्थान मधील नवलपुर जिल्ह्यात वार्षिक ७५ हजार दुचाकीची निर्मिती करणारा नवा कारखाना उभारण्याची योजना यावेळी जाहीर करण्यात आली.

सध्या ‘विदा’ ही एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून विकली जाते. भारतातील इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारपेठेत ओला, टीव्हीएस मोटर, बजाज ऑटो यांनी आपले स्थान निर्माण करायला सुरुवात केले आहे व या कंपन्यांचा बाजारपेठेतील एकूण हिस्सा जवळपास ८०% च्या आसपास आहे.

हेही वाचा >>> Money Mantra : NEFT, RTGS, IMPS यामध्ये फरक काय असतो?

इलेक्ट्रिक स्कूटर का ?

देशभरात उपलब्ध असलेली चार्जिंग स्टेशनची व्यवस्था, तरुणांमध्ये असलेला इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचा वाढता उत्साह यामुळे सर्व कंपन्यांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करणे भाग पडले आहे. सध्या हिरोची ‘विदा’ ही एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर शंभर शहरातून दीडशे दुकानांच्या डीलर नेटवर्कच्या माध्यमातून  विकली जाते. इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणताना तिचे योग्य मार्केटिंग व्हावे यासाठी कंपनी काळजी घेणार आहे. सर्वसामान्यपणे कंपनीचे डीलर्स दुचाकी विकण्यामध्ये मोलाचा वाटा बजावतात मात्र इलेक्ट्रिक स्कूटर विकण्यासाठी वेगळी ५०० स्क्वेअर फुटाची छोटी शोरूम कंपनी सुरू करणार आहे. यामध्ये फक्त इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या वर्षात ज्या तीन इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती करून बाजारात लॉन्च केली जाणार आहे त्यामध्ये मध्यम श्रेणीतील, परवडणाऱ्या दरातील आणि बी टू बी सेगमेंटसाठी अशा तीन वेगळ्या मॉडेलचे नियोजन करण्यात आले आहे.

आपल्या ४०व्या वर्धापन दिनी हिरो मोटोकॉर्प ने मॅव्हरिक ४४० या अत्याधुनिक मोटरसायकलचे लोकार्पण केले. या अत्याधुनिक ४४०CC  मोटरसायकलचे बुकिंग फेब्रुवारी महिन्यात सुरू होऊन एप्रिल महिन्यापासून त्या दिल्या जातील.

बाजारामध्ये सध्या असलेल्या टू व्हीलर कंपन्यांनी अगोदरच इलेक्ट्रिक दुचाकी टू व्हीलर विक्री सुरुवात केल्यामुळे स्पर्धा अधिकच वाढली आहे. मात्र संपूर्ण भारतातील इलेक्ट्रिक टू व्हीलर विकण्याच्या द्र्ष्टीने ही नुसती सुरुवातच आहे,  असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> Money Mantra : पोस्ट ऑफिसची सर्वाधिक व्याज देणारी जबरदस्त योजना, तुम्हाला दरमहा २००५० रुपये कमवता येणार

मंगळवारी शेअर बाजार चालू असतानाच ही घोषणा येताच कंपनीचा शेअर २.९% नी वाढून ४५३० वर स्थिरावला निफ्टीच्या तुलनेत हिरो मोटोकॉलच्या शेअरने गुंतवणूकदारांना सरस परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात हा शेअर जवळपास ६० टक्क्यांनी वाढला आहे.

भारत इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीमध्ये कंपन्यांनी जेवढा उत्साह दाखवला तेवढा दुचाकी की वाहनांच्या संदर्भात दिसला नव्हता.  भारतातील सर्वाधिक दुचाकी विकणारी कंपनी बजाज  ऑटो ने चेतक या आपल्या क्लासिक ब्रँडची सुधारित इलेक्ट्रिक आवृत्ती बाजारात आणल्यावर इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजाराला नवी चालना मिळाली.

हिरो मोटो कॉर्प ११०CC पासून ४००CC पर्यंतच्या टू व्हीलर च्या निर्मितीमध्ये अग्रेसर असली तरीही इलेक्ट्रिक दुचाकीच्या निर्मितीबाबत कंपनीने कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. कालच्या या घोषणेनंतर कंपनीचे याबाबतीतील इरादे मात्र स्पष्ट झाले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील झिरो मोटर्स या कंपनीच्या सहकार्यातून नव्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर ची निर्मिती करण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांना परवडणारी टू व्हीलर स्प्लेंडर आणि स्पोर्ट्स बाईक या श्रेणीत मोडणारी करिज्मा या सर्वसमावेशक वाहनांच्या पोलिओ मध्ये यामुळे भर पडणार आहे. सगळ्या प्रकारच्या ग्राहकांची विकत घेण्याची क्षमता आणि आवड या दोन मुद्द्यांचा एकत्रित विचार करून  तीन मॉडेल्स एकत्र बाजारात आणली जाणार आहेत.

हिरो मोटोला ४० वर्षे पूर्ण होत असताना देशांतर्गत बाजारावर अवलंबून न राहता विकसनशील देशांतील बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीची निर्यात करणे हा कंपनीचा भविष्यकालीन इरादा नक्कीच असू शकतो. गुरुवारी बाजार बंद होताना कंपनीच्या शेअरने ५२ आठवड्यातील उच्चांक पातळीला ( ४४१७ ) स्पर्श केला. गेल्या वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना घसघशीत ५८% परतावा मिळवून दिला आहे.

Story img Loader