Senior Citizen Savings Scheme: पोस्टातील योजना बऱ्याचदा लोकांच्या पसंतीस पडतात, कारण त्यात गुंतवणुकीबरोबरच सुरक्षिततेचीही हमी मिळते. पोस्टातील लहान बचत योजना तर अनेकांना आकर्षित करतात. देशात असे बरेच लोक आहेत, ज्यांना त्यांचे पैसे सुरक्षित योजनांमध्ये कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवायचे आहेत, जेथे चांगले व्याज उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस योजना लोकांची विविध उद्दिष्टे लक्षात घेऊन अशा अनेक लहान बचत योजना चालवते. मात्र यामध्येही ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही अशी योजना असून, ज्यावर व्याजदर सर्वाधिक असते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे, याचा अर्थ तुमचे पैसे फार मोठ्या कालावधीसाठी अडकून राहत नाहीत. विशेष म्हणजे तुम्ही ते तुमच्या पालकांच्या नावाने ट्रान्सफर करू शकता. बचत योजनेत गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळवू शकतात.

हेही वाचाः Money Mantra: कमी जोखीम अन् चांगल्या परताव्यासाठी सर्वोत्कृष्ट योजना निवडा, इंडेक्स फंडांबद्दल A टू Z जाणून घ्या

Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि…
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
fake branch of state bank open in Chhattisgarh
आमची कुठेही शाखा नाही!
My Portfolio Phoenix Mills Ltd
माझा पोर्टफोलियो : फिनिक्स मिल्स लिमिटेड
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?

व्याज आणि कमाल ठेव मर्यादा किती?

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत एकल खात्यात जमा करण्याची कमाल मर्यादा ३० लाख रुपये आहे. यापूर्वी ही मर्यादा १५ लाख रुपये होती. २०२३ च्या अर्थसंकल्पात ही मर्यादा वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेत वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळते. या सरकारी योजनेत किमान १००० रुपये गुंतवले जाऊ शकतात.

हेही वाचाः हिरे उद्योगातील प्रमुख किरण जेम्सचे पुन्हा मुंबईत स्थलांतर; कंपनीची मालकी, संस्थापक अन् आर्थिक कामगिरीबद्दल जाणून घ्या

तुम्हाला किती परतावा मिळेल?

कमाल ठेव: ३० लाख रुपये

व्याज दर: वार्षिक ८.२ टक्के

परिपक्वता कालावधी: ५ वर्षे

मासिक व्याज: २०,०५० रुपये

त्रैमासिक व्याज: ६०,१५० रुपये

वार्षिक व्याज: २,४०,६०० रुपये

५ वर्षांत एकूण व्याज: १२,०३,००० रुपये

एकूण परतावा: ४२,०३,००० लाख (३०,००,००० रुपये + १२,०३,००० रुपये)

पती-पत्नी स्वतंत्र खाते उघडू शकतात

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत अशी सुविधा आहे की, जर तुम्ही पती-पत्नी असाल तर तुम्ही दोन स्वतंत्र खाती उघडू शकता. त्यामुळे दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये (एका खात्यात ३० लाख रुपये) जास्तीत जास्त ६० लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. साधारणपणे हे खाते वयाच्या ६० वर्षांनंतर उघडता येते. काही प्रकरणांमध्ये वयोमर्यादा ५५-६० वर्षे आहे.

२ खात्यांमधून किती फायदा होणार

कमाल ठेव: ६० लाख रुपये

व्याजदर: वार्षिक ८.२ टक्के

परिपक्वता कालावधी: ५ वर्षे

मासिक व्याज: ४०,१०० रुपये

त्रैमासिक व्याज: १,२०,३०० रुपये

वार्षिक व्याज: ४,८१,२०० रुपये

५ वर्षांत एकूण व्याज: २४,०६,०००

एकूण परतावा: ८४,०६,००० लाख (६०,००,००० रुपये + २४,०६,००० रुपये)