कर पद्धती असेल किंवा मग आपल्याकडून झालेली मोठी खरेदी- विक्री… सामान्य माणूस गोंधळून जातो. अनेकदा तर त्याला पडणारे बहुतांश प्रश्न हे कररचनेसंदर्भातच असतात… आता तुम्ही प्रश्न पाठवा आणि तज्ज्ञ देतील उत्तरे

प्रश्न१ (महेश कोरटकर): एनएव्ही म्हणजे काय व ती कसी ठरविली जाते?

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
bhakri stomach health marathi news, chapati stomach health marathi news
Health Special: भाकरी, पोळी की चपाती – पोटासाठी काय चांगले?

म्युचुअल फंडाच्या एका विशिष्ट स्कीम मध्ये पूर्व निर्धारित सिक्युरिटीज(उदा: शेअर्स, सरकारी कर्ज रोखे, डिबेंचर्स , ट्रेझरी बिल्स ई.) गुंतवणूक केली जाते व या सिक्युरिटीजच्या बाजारातील किमतीच्या चढउतारानुसार म्युचुअल फंडाच्या सबंधित स्कीमचे निव्वळ मालमत्ता मूल्य (नेट असेट व्ह्याल्यू ) कमीअधिक होत असते , थोडक्यात म्युचुअल फंडाच्या त्या स्कीमची कामगिरी(परर्फॉमन्स) या नेटअसेटव्ह्याल्यू (एनएव्ही ) द्वारे दर्शविली जाते . म्युचुअल फंडाच्या
एका युनिटची प्रारंभिक दर्शनी किंमत (एनएव्ही)रु.१० असते व बाजारातील चढउतारानुसार यात बदल होत असतो. एनएव्ही ठरविण्यासाठी सबंधित फंडाच्या स्कीमचे एकूण मालमत्ता(टोटल असेट) मूल्य – एकूण दायित्व (टोटल लायबिलिटी )=निव्वळ मालमत्ता मूल्य (नेट असेट व्ह्याल्यू ) ठरविले जाते व त्यानुसार एनएव्ही प्रती युनिट काढली जाते (नेट असेट व्ह्याल्यू/सबंधित म्युचुअल फंडचे एकूण युनिट्स) याला एनएव्ही/युनिट असे म्हणतात . उदा: एखाद्या फंडाची नेट असेट व्ह्याल्यू रु. २७२८७९८८ व या फंडाचे एकूण युनिट्स २२५००० असतील तर या फंडाची एनएव्ही रु.१२१.२७९९ इतकी असेल.अशी एनएव्ही मार्केट बंद झाल्यावर काढली जाते व ती पुढील दिवसातही लागू असते.म्युचुअल फंडाचे ग्रोथ व डिव्हिडंड असे दोन पर्याय असतात यातील ग्रोथ फंडाची एनेव्ही डिव्हिडंड फंडाच्या एनएव्ही पेक्षा जास्त असते व सबंधित स्कीमच्या सुरवातीच्या काळात या दोन्हीतील फरक फारसा नसतो मात्र जसजसा कालावधी वाढत जातो तसतसा हा फरक वाढत जातो.उदा : एचडीएफसी टॉप१०० या फंडाची सुरवात ११/१०/१९९६ रोजी झाली त्यावेळी ग्रोथ व डिव्हिडंड या दोन्हीच्या युनिटची एनएव्ही रु. १० होती मात्र दि.२८/०७/२०२३ रोजीची एनएव्ही अनुक्रमे रु.८४९.३६ व रु.५२.०५ इतकी असल्याचे दिसून येते. याचे कारण डिव्हिडंड पर्याय घेणाऱ्या गुंतवणूक दारास वेळोवेळी डिव्हिडंड रक्कम रोख मिळाली आहे तर ग्रोथ पर्याय घेणाऱ्या गुंतवणूकदारास ही रक्कम रोख न मिळता ज्याज्यावेळी डिव्हिडंड दिला आहे त्यात्या वेळी पुन्हा गुंतवली असल्याने एनएव्ही वाढत गेली आहे.

प्रश्न२ (चेतना जोशी): म्युचुअल फंडाचे डायरेक्ट व रेग्युलर प्लॅन म्हणजे काय व यातील कोणता प्लॅन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतो?

म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवणूकदार सबंधित म्युचुअल फंडाच्या एएमसी (असेट मॅनेजमेंट कंपनी कडे थेट गुंतवणूक करू शकतो. थोडक्यात अशा गुंतवणुकीत वितरक(डीस्ट्रीब्युटर), बँक, किंवा ब्रोकर यासारखा कोणी मध्यस्थ नसतो. तर या उलट रेग्युलर प्लॅन मध्ये गुंतवणूकदार वितरक(डीस्ट्रीब्युटर), बँक, किंवा ब्रोकर यासारखा मध्यस्थामार्फत गुंतवणूक करीत असतो व त्यामुळे म्युचुअल फंड एएमसी कडून मध्यस्थाला दिले जाणारे कमिशन आपण करीत असलेल्या गुंतवणुकीतून दिले जाते त्यामुळे तेवढ्या रकमेने गुंतवणूक कमी होते तर डायरेक्ट प्लॅन मध्ये असे कमिशन द्यावे लागत नसल्याने होणारी गुंतवणूक जास्त होते. परिणामत: डायरेक्ट प्लॅनची एनएव्ही ही रेग्युलर प्लॅनच्या एनएव्हीपेक्षा जास्त असते व त्यामुळे दीर्घकालीन उद्देशाने केलेल्या डायरेक्ट प्लॅन गुंतवणुकीची एनएव्ही ही रेग्युलर प्लॅनमधील गुंतवणुकी पेक्षा जास्त असल्याने मिणारी रक्कम जास्त मिळते. सुरवातीच्या काळात आपल्याला म्युचुअल फंडा बाबत फारसी माहिती नसेल तर रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक करून पुढे बऱ्यापैकी माहिती झाल्यावर डायरेक्ट प्लॅन मशे गुंतवणूक करणे हितावह असते.उदाहरणासाठी आपण एक्सिस ब्ल्यूचीप फंडाची १/१/२०१३ची एनएव्ही विचारता घेतली असता टी रु.१२.१८ इतकी होती (या तारखेपासून डायरेक्ट प्लॅन देण्यास सुरवात झाली ) डी.२८/७/२०२३ अखेरीस डायरेक्ट प्लॅनची एनएव्ही रु.५२.६८ इतकी तर रेग्युलर प्लॅनची एनएव्ही रु.४६.५५ इतकी आहे जर अ आणि ब व्यक्तीने १/१/२०१३ रोजी रु.१ लाख अनुक्रमे डायरेक्ट प्लॅन व रेग्युलर प्लॅन मध्ये गुंतविले असतील तर त्याची आजची किंमत अनुक्रमे रु. ४१२२०६.६० व ३६४२४९.०७ इतकी असेल.(हा फंड केवळ उदाहरण म्हणून घेतला आहे शिफारस नव्हे ) यावरून आपल्या असे लक्षात येईल कि आपली जोखीम घेण्याची क्षमता विचारात घेऊन डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असते.

प्रश्न३ (कैलाश यावलकर): म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ग्रोथ व डिव्हिडंड यातील कोणता पर्याय निवडावा?

ग्रोथ व डिव्हिडंड यातील पर्याय निवडताना आपण आपली गरज व उद्दिष्ट विचारता घेऊन पर्याय निडणे योग्य असते त्यासाठी या दोन पर्यात नेमका काय फरक आहे हे समजून घेण आवश्यक असते. ग्रोथ पर्याय निवडल्यास आपण गुंतवणूक केलेल्या फंडास वेळोवेळी जो नफा होतो तो आपल्याला न देता सबंधित स्कीम मधील सिक्युरिटीजमध्ये पुन्हा गुंतविला जातो यामुळे आपल्या असलेल्या युनिटची एनएव्ही वाढते याउलट डिव्हिडंड पर्याय निवडल्यास आपण गुंतवणूक केलेल्या फंडास वेळोवेळी जो नफा होतो तो आपल्याला डिव्हिडंडच्या स्वरुपात रोख दिला जातो व तेवढ्या प्रमाणात आपल्या युनिटची एनएव्ही कमी होत असते. यामुळे सुरवातीच्या काळात जरी दोन्ही एनएव्ही मध्ये फारसा फरक नसाल तरी जसजसा कालावधी वाढत जातो तसतसा हा फरक वाढतच जातो. हे आपल्या वरील उदाहरणावरून लक्षात येईल. समजा वरील उदाहरणात दि.११/१०/१९९६ रु,१०००० या फंडात ग्रोथ पर्यायात गुंतविले आहेत व ब ने रु.१०००० डिव्हिडंड पर्यायात गुंतविले आहेत सुरवातीस दोन्हीही पर्यायांची एनएव्ही रु.१० असल्याने दोघानाही प्रत्येकी १००० युनिट मिळाले आहेत व दोघांची गुंतवणूक आजअखेर चालू आहे. असे गृहीत धरल्यास अ च्या गुंतवणुकीचे दि.२८/०७/२०२३ च्या एनएव्ही नुसार मूल्य रु.८४९३६० इतके असेल तर ब च्या गुंतवणुकीचे मूल्य रु.५२०५० इतके असेल.मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेळोवेळी डिव्हिडंड पोटी रक्कम मिळालेली आहे तर आजवर काहीही रक्कम मिळालेली नाही. यावरून असे म्हणता येईल की आपल्याला जर काही दीर्घकालीन उद्देशासाठी तरतूद करावयाची असेल (उदा: मुलांचे शिक्षण, विवाह, सेवा निवृत्ती साठीची रक्कम ) तर आपल्या उमेदीच्या काळात ज्यावेळी आपल्याला नौकरी/व्यवसायातून नियमित उत्पन्न आहे अशा वेळी आपली दीर्घ कालीन उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी ग्रोथ पर्याय निवडणे योग राहील याउलट आपल्याला जर नियमित उत्पन्नाची गरज असेल तर (उदा: सेवा निवृत्ती नंतर ) डिव्हिडंड पर्याय निवडणे योग्य राहील. थोडक्यात आपल्या गरजेनुसार पर्याय निवडावा.