scorecardresearch

Premium

Money Mantra: प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डात काय फरक असतो?

शक्यतोवर क्रेडिट कार्डचा वापर एटीएम मधून रोख रक्कम काढण्यासाठी करू नये.

difference between credit card and debit card
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डात काय फरक असतो? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!

प्रश्न (दिनकर अडसूळ): क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड मध्ये नेमका काय फरक आहे?

Video Nita Ambani Hair Stylist Shares Secret To Stop Hair Breaking Without Spending One Rupee Should You Tie Hair While Sleeping
नीता अंबानींचा हेअर स्टायलिस्ट सांगतोय, रुपया खर्च न करता केस तुटणं कसं थांबवाल? केस धुतल्यावर व झोपताना फक्त..
tcs ceo kritiwassan
वर्क फ्रॉम होम फायद्याचं की तोट्याचं? टीसीएसच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
money mantra article hdfc group buy share of bank permission reserve bank
Money Mantra : एचडीएफसी समूह या सहा बँकांमध्ये हिस्सेदारी विकत घेणार; जाणून घेऊया याविषयी सर्व काही
Can Sex Cause Bigger Breast 7 reasons why Breast Size Increases Check these Symptoms
सेक्समुळे स्तनांचा आकार वाढतो का? ‘या’ ७ कारणांनी अचानक वाढू शकते Breast Size

डेबिट कार्डाने पेमेंट केले असता रक्कम थेट आपल्या बँक खात्यात नावे (डेबिट) पडते या उलट क्रेडिट कार्डाने आपल्याला एक क्रेडिट लिमिट (उचल मर्यादा) दिलेली असते व या मर्यादेपर्यंत आपण कोणतेही पेमेंट केले तरी रक्कम आपल्या बँक खात्याला नावे पडत नाही तर बिलिंग सायकल नुसारच्या एक महिन्याच्या कालावधीत केलेल्या सर्व पेमेंटचे एकत्रित बिल कार्ड धारकाला पाठविले जाते व बिलाची रक्कम बिल तारखेपासून पुढील २० दिवसात भरावयाची असते.

हेही वाचा… Money Mantra: जागतिक अनिश्चितता; बाजारांचा नरमाईचा पवित्रा

यामुळे कार्ड धारकाला किमान २० तर कमाल ५० दिवस बिनव्याजी रक्कम वापरता येते. देण्यात येणारी क्रेडीट लिमिट अर्जदाराच्या आर्थिक क्षमतेनुसार कमीअधिक असते, व ही मर्यादा कार्ड धारकाचे व्यवहार समाधानकारक असल्यास वाढविली जाते.

प्रश्न (आदित्य शंकर): क्रेडिट कार्ड वापरून एटीएम मधून रोख रक्कम काढता येते का? व त्यासाठी काही चार्जेस द्यावे लागतात का?

क्रेडिट वापरून एटीएम मधून रोख रक्कम काढता येते व ती काढण्याची कमाल मर्यादा कार्ड नुसार कमी अधिक असते . सर्व साधारणपणे क्रेडिट लिमिटच्या २० % ते ३०% च्या दरम्यान ही मर्यादा असते. यासाठी २.५% ते ३% इतके चार्जेस द्यावे लागतात. शक्यतोवर क्रेडिट कार्डचा वापर एटीएम मधून रोख रक्कम काढण्यासाठी करू नये.

प्रश्न (सागर कोपरकर): क्रेडिट कार्ड बिलातील एकूण देय रक्कम व किमान देय रक्कम म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड बिलाची संपूर्ण रक्कम म्हणजे एकूण देय रक्कम ही संपूर्ण देय रक्कम बिलाच्या अंतिम तारखेच्या आत भरणे बंधनकारक नसते तर तर किमान देय रक्कम म्हणजे बिलाच्या काही टक्के रक्कम बिलाच्या अंतिम तारखेच्या आत भरणे बंधनकारक असते.सर्वसाधारणपणे किमान ५% इतकी रक्कम भरावीच लागते मात्र उर्वरित रकमेवर व्याज भरावे लागते त्यामुळे शक्य तो हा पर्याय वापरू नये आणि काही अपरिहार्य कारणाने संपूर्ण पेमेंट करणे शक्य नसेल तरच हा पर्याय वापरावा व उर्वरित पेमेंट शक्य तितक्या लवकर करावे.

प्रश्न (चंद्रकांत मुळे): क्रेडिट युटीलायझेशन रेशो म्हणजे काय व त्याचे महत्व काय आहे?

आपल्या क्रेडिट कार्डाच्या क्रेडिट लिमिटचा किती प्रमाणात वापर झाला आहे हे या रेशो वरून समजते व तो खालील प्रमाणे काढला जातो. क्रेडिट युटीलायझेशन रेशो= (कार्ड बिलाची रक्कम /क्रेडीट लिमिट )*१००. आपला क्रेडिट स्कोर ठरविताना क्रेडिट युटीलायझेशन रेशो विचारता घेतला जातो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is the difference between credit card and debit card mmdc dvr

First published on: 14-10-2023 at 18:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×