01 March 2021

News Flash

तयारी बँक परीक्षांची..

यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया

| March 10, 2014 07:48 am

यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत २०१४-१५ वर्षांत सुमारे ९० हजार अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. या परीक्षांसंबंधी- उमेदवारांची अर्हता, परीक्षेचा अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया या विषयीची माहिती-
शासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणाऱ्या युवावर्गासाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत २०१४-१५ वर्षांत सुमारे ९० हजार अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. या पर्वणीचा लाभ बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांनी करून घ्यायला हवा. विविध इन्स्टिटय़ूटद्वारे घेतल्या जाणाऱ्या बँकिंग, क्लार्क, पी.ओ., स्केल-वन, स्केल-टू व स्केल-थ्री, ‘ग्रुप- ए ’अधिकारीवर्गाच्या परीक्षा तसेच ‘ग्रुप- बी’च्या परीक्षा, लिपिक पदाच्या परीक्षा, ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी लागणाऱ्या विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती देत आहोत –
इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनतर्फे पुढे नमूद केलेल्या १९ राष्ट्रीयीकृत बँकांसाठी- अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक इत्यादीसाठी सामूहिक लेखी परीक्षा (उहए) घेतली जाते.
स्टेट बँक लिपिक परीक्षा
वयोमर्यादा (खुला प्रवर्ग) – १८ ते २८ वष्रे, इतर मागास प्रवर्गासाठी तीन वष्रे शिथिल. मागासवर्गीय प्रवर्गासाठी – पाच वष्रे शिथिल. अपंग (मागासवर्गीय) प्रवर्गासाठी – १५ वष्रे शिथिल. अपंग (इतर मागास) प्रवर्ग – १३ वष्रे शिथिल माजी सनिक (खुला) प्रवर्गासाठी एकूण सेवा + ३ वर्षे व मागासवर्गीय माजी सनिकांसाठी आठ वर्षे शिथिल ठेवण्यात आलेली आहे. विधवा, परित्यक्ता परंतु पुन्हा लग्न न केलेल्या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ३५+९ वर्षे इतर मागास प्रवर्गासाठी ३८+९ वर्षे, मागासप्रवर्गातील महिलांसाठी ४०+९ वर्षे आहे.
अभ्यासक्रम – स्टेट बँकेच्या लिपिक पदासाठी परीक्षा बहुपर्यायी असते. परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या घटकात सामान्य ज्ञान व आíथक चालू घडामोडी, इंग्रजी भाषेचे ज्ञान, मूलभूत पायाभूत गणित व तक्ता सारणी, बुद्धिमत्ता चाचणी, मार्केटिंग कौशल्य व संगणक ज्ञान यावर २०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारली जात असून िहदी व इंग्रजीमध्ये द्विभाषिक पेपर दिलेला असतो. एका अचूक उत्तरासाठी एक गुण मिळत असतो. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा होत असतात. या परीक्षेसाठी ‘कट ऑफ मार्कस्’ प्रसिद्ध होत असतात. प्रत्येक घटकाची माहिती खालीलप्रमाणे आहे –
सामान्य ज्ञान व आíथक चालू घडामोडी – या घटकात ग्रामप्रशासन (स्थानिक स्वराज्य संस्था), भारताची राज्यघटना, भारताचा इतिहास, समाजसुधारक, विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर इंग्रजी भाषेचे ज्ञान, मूलभूत पायाभूत गणित व तक्ता सारणी, बुद्धिमत्ता चाचणी, मार्केटिंग कौशल्य  व संगणक ज्ञान अजमावले जाते.
आय.बी.पी.एस.द्वारे घेतल्या जाणाऱ्या  लिपिक संवर्गातील परीक्षा –
वयोमर्यादा- वरील दिलेल्या एस.बी.आय. क्लार्क परीक्षेप्रमाणे. शैक्षणिक अर्हता – कोणतेही पदवीधर. (१०+२+३ पॅटर्न), लेखी परीक्षा – एकूण प्रश्न २५०, गुण २५०, वेळ – अडीच तास, स्वरूप- बहुपर्यायी, माध्यम- इंग्रजी व िहदी.
अभ्यासक्रम : बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी भाषा चाचणी, पायाभूत मूलभूत गणित एकूण प्रश्न, सामान्य चाचणी व बँकिंग क्षेत्रातील ज्ञान एकूण प्रश्न, संगणक चाचणी. (वरील विषयांच्या प्रश्नांची संख्या ५० आणि गुण ५०.)
या घटकांचा अभ्यासक्रम हा एस.बी.आय. लिपिकला दिलेल्या अभ्यासक्रमानुसार असतो, याची परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला ०.२५ गुण वजा केले जातात. या परीक्षेला ‘कट ऑफ स्कोअर’ दिला जात असतो. आय.बी.पी.एस.द्वारे सामूहिक लेखी परीक्षेचे दिलेले स्कोअरकार्ड एक वर्षांकरिता वैध असते. अंतिम निवड ही मुलाखत व लेखी परीक्षेच्या एकूण गुणांमधून होत असते.
एस.बी.आय. प्रोबेशनरी ऑफिसर/ स्पेशलिस्ट ऑफिसर परीक्षा
अलीकडेच ३९३ स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी एस.बी.आय.तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यानुसार २०१४ -१५ मध्येही अंदाजे तीन ते चार हजार पदे प्रोबेशनरी ऑफिसर व इतर पदे भरण्याचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा मानस आहे. या पदासाठी आवश्यक ठरणारी अर्हता पुढीलप्रमाणे आहे –
शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेची पदवीधर (खुल्या प्रवर्गासाठी ६५ टक्के व इतर प्रवर्गासाठी ६० टक्के)
वयोगट- २१ ते ३० वर्षे. शासननिर्णयानुसार मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादा शिथिल.
ही परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाते. पहिल्या टप्प्यात २०० गुणांची दोन तास कालावधीची बहुपर्यायी परीक्षा िहदी व इंग्रजी या द्विभाषिक माध्यमातून घेतली जाते. यामध्ये इंग्रजी भाषा चाचणी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (विशेषत: बँकिंग संदर्भातील), मूलभूत गणित, तक्ता सारणी व सांख्यिकी प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी. प्रत्येक विषयाची प्रश्नसंख्या ५० आणि गुण ५०. एक तास कालावधीच्या घेण्यात येणाऱ्या पारंपरिक चाचणीत इंग्रजी भाषाज्ञान (५० गुण) तपासले जाते. त्यात उतारा, पत्रलेखन, सारांशलेखन, निबंधलेखन व एखाद्या मुद्दय़ाची मांडणी अपेक्षित असते.
दुसऱ्या टप्प्यात गटचर्चा, ग्रामीण गटचर्चा, मुलाखत  आणि अनुभव याआधारे परीक्षार्थीना गुण देण्यात येतात.  
लेखी परीक्षा,  गटचर्चा आणि मुलाखत यांत मिळून खुल्या प्रवर्गासाठी ४० टक्के व मागासप्रवर्गासाठी ३५ टक्के गुणमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसे झाल्यास अंतिम निवडसाठी परीक्षार्थी ग्राह्य़ मानला जातो.

आय.बी.पी.एस.  प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेट ट्रेनीज
१९ राष्ट्रीयीकृत बँका व इतर आíथक संस्थांमधील प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेट ट्रेनीज पदभरतीसाठी आय.बी.पी.एस.तर्फे सामूहिक लेखी परीक्षा घेतली जाते. वयोमर्यादा २० ते २८ वर्षे. शासननिर्णयानुसार मागास व इतर मागास प्रवर्गासाठी शिथिल.
शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा पदवीधर (खुला ६० टक्के व मागासप्रवर्ग ५५ टक्के), संगणक हाताळण्याचे ज्ञान आवश्यक. लेखी परीक्षा २०० गुणांची असून दोन तास अवधीची आहे. परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी उत्तरे असे असून इंग्रजी व िहदी  माध्यमातून ही परीक्षा देता येते. त्यात बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी भाषा ज्ञान, पायाभूत मूलभूत गणित व तक्ता सारणी प्रश्न, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (बँकिंग क्षेत्रासंदर्भातील), संगणकज्ञान यांचा समावेश असतो.
मुलाखत १०० गुणांची असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक असते. स्कोअरकार्डनुसार परीक्षार्थीना मुलाखतीसाठी विविध बँकांच्या गरजेनुसार बोलावले जाते. दिलेले स्कोअरकार्ड एक वर्षांसाठी वैध असते.
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांना ८० टक्के तर मुलाखतीतील गुणांना २० टक्के व्हेटेज मिळून अंतिम निवड होते.  
आय.बी.पी.एस. (स्केल वन, टू, थ्री ऑफिसर), गट-ब ऑफिस साहाय्यक
आय.बी.पी.एस.कडून स्केल वन, टू, थ्री अधिकारी व गट-ब ऑफिस साहाय्यक पदासाठी सामूहिक लेखी परीक्षा घेतली जाते. ज्यात ६२ प्रादेशिक, ग्रामीण बँकांचा समावेश असतो.  
वयोमर्यादा – ऑफिसर स्केल थ्री (२१ ते ४०वर्षे),  स्केल टू (२१ ते ३२ वर्षे), स्केल वन (१८ ते २८ वर्षे). शासननिर्णयानुसार मागास – इतर मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.
शैक्षणिक अर्हता –
* ‘गट ब’ ऑफिस साहाय्यक – कोणत्याही शाखेचा पदवीधर, स्थानिक भाषेवर प्रभुत्व, संगणकज्ञान आवश्यक.
* ऑफिसर (स्केल वन)- अ‍ॅग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, अ‍ॅनिमल हजबंडरी, व्हेटेरनरी सायन्स, अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग, अ‍ॅग्रिकल्चर मार्केटिंग अ‍ॅण्ड कॉर्पोरेशन इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स व अकाऊंटन्सी यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधर, स्थानिक भाषेवर प्रभुत्व, संगणकज्ञान आवश्यक.
* ऑफिसर (स्केल टू) – या पदासाठी अनुभव दोन वर्षे गरजेचा असतो. त्यात स्केल- टू  स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी एक वर्ष अनुभव गरजेचा. कोणत्याही शाखेचा पदवीधर, स्थानिक भाषेवर प्रभुत्व, संगणक ज्ञान आवश्यक.
* ऑफिसर (स्केल वन)- अ‍ॅग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, अ‍ॅनिमल हजबण्डरी, व्हेटेरनरी सायन्स, अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग, अ‍ॅग्रिकल्चर मार्केटिंग अ‍ॅण्ड कॉर्पोरेशन, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्स व अकाऊंटन्सी दिलेल्या कोणत्याही शाखेतील पदवीधर, परंतु ५० टक्क्यांनी उत्तीर्ण असायला हवा.
* ऑफिसर (स्केल थ्री) – वरील उल्लेख केलेल्या विद्याशाखेतून ५० टक्के गुणांनी पदवी प्राप्त आणि बँकिंग क्षेत्रातील कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव.
लेखी परीक्षा –
* गट- ब ऑफिस साहाय्यक तसेच ऑफिसर स्केल-वन याकरिता अडीच तास कालावधीची २०० गुणांची लेखी परीक्षा होते. त्यात बुद्धिमत्ता चाचणी, पायाभूत गणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा ज्ञान, िहदी भाषा ज्ञान, संगणक ज्ञान या घटकांवर प्रश्न विचारले जातात.  
* ऑफिसर – स्केल टू (जनरल बँकिंग ऑफिसर) – या पदांसाठी २०० गुणांसाठी बहुपर्यायी परीक्षा अडीच तासांसाठी होत असते. त्यात बुद्धिमत्ता चाचणी, पायाभूत गणित व तक्ता सारणी, आíथक सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा ज्ञान, संगणक ज्ञानाची चाचणी होते.
* ऑफिसर स्केल टू – (स्पेशालिस्ट केडर)- या पदांसाठी २०० गुणांसाठी बहुपर्यायी परीक्षा तीन तासांसाठी होत असते. त्यात बुद्धिमत्ता चाचणी, पायाभूत गणित व तक्ता सारणी, आíथक सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा ज्ञान, व्यावसायिक ज्ञान, संगणक ज्ञान या घटकांवर प्रश्न विचारले जातात.
* ऑफिसर स्केल – थ्री (स्पेशलिस्ट केडर) – या पदासाठी २०० गुणांसाठी बहुपर्यायी परीक्षा अडीच तासांसाठी होते. त्यात बुद्धिमत्ता चाचणी, पायाभूत गणित व तक्ता सारणी, आíथक सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा ज्ञान, संगणक ज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
चुकीच्या प्रश्नासाठी ०.२५ गुण वजा केले जातात. यात ‘कट ऑफ स्कोअर’ जाहीर केला जातो तसेच सामूहिक लेखी परीक्षेचाही स्कोअर जाहीर केला जातो. तो एक वर्षांसाठी वैध असतो. मुलाखत व लेखाद्वारे विविध क्षेत्रीय ग्रामीण बँकांसाठी परीक्षार्थीची निवड होत असते.
निरनिराळ्या बँकांच्या विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर असे जाणवते की, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत पायाभूत गणित, तक्ता सारणी व सांख्यिकी, इंग्रजी भाषेचे ज्ञान, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी विशेषत: बँकिंग क्षेत्र व आíथक घडामोडी, संगणक ज्ञान तसेच मार्केटिंग कौशल्य यांचा मूलभूत अभ्यास परीक्षार्थीनी करायला हवा.
अभ्यास करताना वेळेचे नियोजन, क्लृप्त्या व मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण या बाबी महत्त्वाच्या ठरतात. आगामी वर्षांत बँकिंग क्षेत्रात उपलब्ध होणारी असंख्य पदे लक्षात घेत अभ्यासाची तयारी केली, तर यश मिळवणे सोपे जाईल.         

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 7:48 am

Web Title: bank exam preparation
Next Stories
1 अभयांत्रिकीची ओसरली जादू..
2 कम्बाइण्ड टेक्नॉलॉजी एन्ट्रन्स एक्झामिनेशन
3 वैद्यक प्रवेशपरीक्षेतील बदलांचे वारे
Just Now!
X