जवाहरलाल नेहरू विद्यापीठ- नवी दिल्लीद्वारा जदेशांतर्गत विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमएस्सी (बायोटेक्नॉलॉजी), एमएस्सी (कृषी), मास्टर्स ऑफ व्हेटर्नरी सायन्स व एमटेक (बायोटेक्नॉलॉजी) इ. विविध पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कंबाइण्ड टेक्नॉलॉजी एन्ट्रन्स एक्झामिनेशन- २०१४-१५ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र, कृषी, पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान, भौतिकशास्त्र, औषधशास्त्र, अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १९ मे २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर व पुणे या केंद्रांचा समावेश आहे. अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची संबंधित संस्थेतील अभ्यासक्रमासाठी निवड होईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास २६० रु.चा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या नावे असलेला व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या http://www.jnu.ac.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज सेक्शन ऑफिसर (अ‍ॅडमिशन्स) रू. नं. २८, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली ११००६७ या पत्त्यावर २६ मार्च २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
रामलिंगस्वामी री-एन्ट्री फेलोशिप
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विदेशातील कार्यरत संशोधकांनां भारतातील विज्ञान-तंत्रज्ञान- अभियांत्रिकी-कृषी वा पशुवैद्यक यांसारख्या क्षेत्रातील शैक्षणिक वा संशोधन संस्थांमध्ये विशेष संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देणाऱ्या रामलिंगस्वामी री-एन्ट्री फेलोशिप- शिष्यवृत्तीसाठी पात्रताधारक संशोधकांकडून प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.
समाविष्ट विषय- या योजनेच्या अंतर्गत जैव-तंत्रज्ञान, कृषी, वैद्यक-विज्ञान, जैव-अभियांत्रिकी, ऊर्जा, पर्यावरण, जैव-माहितीतंत्रज्ञान, पशु वैद्यक यांसारख्या विषयांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे संबंधित विषयातील पीएच.डी., एम.डी., एम.टेक्., एमव्हीएससी यासारखी पात्रता  प्राप्त केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा आणि त्यांना संबंधित क्षेत्रातील विदेशातील संशोधनपर कामाचा पुरेसा अनुभव असायला हवा.
जे संशोधक वर नमूद केल्याप्रमाणे विदेशातील संशोधनपर कामाचा अनुभव घेऊन गेल्या वर्षभरात परत आले असतील तेसुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदार संशोधकांचे वय ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना विशेष निवड मंडळाद्वारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्ती- या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षे कालावधीसाठी दरमहा ८५,००० रु.  शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना पाच ते दहा लाख रु. वार्षिक आकस्मिक निधी, वैद्यकीय सवलत यांसारखे लाभही उपलब्ध होतील.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या http://www.dbtindia.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेल्या व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणाऱ्या प्रवेशिका डॉ. मीनाक्षी मुन्शी, डायरेक्टर- डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ब्लॉक-२, सहावा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर २५ मार्च २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात.                                  
नॅशनल वुमेन बायो- सायंटिस्ट्स अवॉर्ड- २०१३
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ बायो-टेक्नॉलॉजीतर्फे महिला संशोधकांना पुरस्कार देण्यात येतात. जीवशास्त्र आणि जैव-तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय अशा संशोधनपर कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या नॅशनल ‘वुमेन बायो- सायंटिस्ट  अवॉर्ड- २०१३’ साठी खाली नमूद केल्यानुसार महिला संशोधकांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत-
पुरस्कारांची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत तीन संशोधनपर पुरस्कार देण्यात येतात. यापैकी एक पुरस्कार वरिष्ठ महिला संशोधकासाठी तर २ पुरस्कार कनिष्ठ महिला संशोधकांसाठी असून त्यासाठी अर्जदार महिला खालीलप्रमाणे पात्रताधारक असणे आवश्यक आहे-
० नॅशनल वुमेन बायो- सायंटिस्ट  अवॉर्ड-वरिष्ठ श्रेणी (पुरस्कार संख्या- १) :
हा पुरस्कार महिला संशोधकांनी त्यांच्या शैक्षणिक संशोधनपर क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कामासाठी देण्यात येतो. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या जीवशास्त्र आणि जैव-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला संशोधकाला त्यांच्या जीवन-गौरव पुरस्काराअंतर्गत पाच लाख रुपये देण्यात येतात.
० नॅशनल वुमेन बायो- सायंटिस्ट अ‍ॅवार्ड- कनिष्ठ श्रेणी : (पुरस्कार संख्या-२)
अर्जदार महिला संशोधकांनी जीवशास्त्र, जैव-तंत्रज्ञान, कृषी, जैव-वैद्यक, पर्यावरण संरक्षण- संवर्धन यांसारख्या क्षेत्रात सुमारे तीन ते पाच वर्षे सातत्यपूर्ण संशोधन कामगिरी बजावलेली असावी.
वयोमर्यादा : उमेदवार महिलांचे वय ४५ वर्षांहून अधिक नसावे.
पुरस्काराचा कालावधी व तपशील : योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिला संशोधकांना पाच वर्षे कालावधीसाठी वार्षिक एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती व सुवर्णपदक देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : पुरस्कारा संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ बायो-टेक्नॉलॉजीच्या http://dbtindia.nic.in/index.asp या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज श्री. जे. के. डोरा, अंडर सेक्रेटरी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, रूम नं. ६११, ६ वा मजला, ब्लॉक-२, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१४.