भूकंप, चक्रीवादळ, गारपीट, मुसळधार पाऊस, थंडीची लाट, उष्णतेची लाट या संभाव्य नैसर्गिक आपत्तींची माहिती हवामानशास्त्रातील तज्ज्ञांना उपग्रहाद्वारे मिळत असते. या नैसर्गिक आपत्तीला कोणीही थांबवू शकत नसले तरी त्यापासून बचावासाठीच्या उपाययोजना मात्र निश्चित करता येतात. त्याचा संपूर्ण अभ्यास हवामानशास्त्रात केला जातो.
या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी हानी प्रचंड असते. हवामानशास्त्रामुळे नैसर्गिक प्रकोपाबाबत आगाऊ सूचना मिळणे शक्य झाले आहे. हवामानशास्त्राच्या सविस्तर अभ्यासामुळे मनुष्यहानी आणि वित्तहानीदेखील टाळता येते. हवामानशास्त्राचे महत्त्व भारतासारख्या शेतीप्रधान राष्ट्रात खूप मोठे आहे. केंद्र सरकारने त्यासाठी पुणे, दिल्ली, मुंबई, कोचीन अशा अनेक ठिकाणी वेधशाळा स्थापन केल्या आहेत. या वेधशाळेत विविध अद्ययावर उपकरणे बसवलेली असून, त्याद्वारे पाऊस, हवेचा वेग आदींविषयी अचूक अंदाज बांधले जातात.
उपशाखा : सिस्मॉलॉजी, रेडिओ, मीटीऑरॉलॉजी, डायड्रोमीटीऑरॉलॉजी, अ‍ॅग्रिकल्चरल मीटीऑरॉलॉजी, क्लायमॅथॅलॉजी या सर्व हवामानशास्त्राच्या महत्त्वपूर्ण उपशाखा आहेत. या सर्वाचा हवामानशास्त्रात अभ्यास केला जातो. सिस्मॉलॉजी या शाखेअंतर्गत भूकंपविषयक अभ्यास केला जातो. देशातील भूकंपप्रवण क्षेत्र, पट्टे, भूकंपाचे केंद्र निश्चित करून त्यावर सतत लक्ष ठेवले जाते.
रेडीओमीटीऑरॉलॉजी : या शाखेअंतर्गत रडार, रेडिओ, उपग्रह साधनांमार्फत विमानांना उड्डाणासाठी मार्गदर्शन केले जाते. हायड्रोमीटीऑरॉलॉजी या शाखेत पर्जन्यमान, जलऊर्जा, ओला किंवा कोरडा दुष्काळ, जलस्थान यांचा अभ्यास केला जातो.
अ‍ॅग्रिकल्चरल मीटीऑरॉलॉजी : या शाखेत तापमान, हवेतील सापेक्ष आद्र्रता किंवा कोरडेपणा, पडणारा पाऊस यांचा वेगवेगळ्या पिकांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करून कृषी खात्याला शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगितला जातो.
एरॉनॉटिकल मीटीऑरॉलॉजी : या शाखेत वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग, होणारा परिणाम, दृश्यमानता, ढगांचा आकार इ. गोष्टींचा अभ्यास करून, त्याबद्दलची माहिती देशातील विमानतळांना विमान उड्डाणासाठी सतत पुरवीत असते.
या सर्व शाखा आणि त्याकरिता असलेले महत्त्वपूर्ण कार्य लक्षात घेतल्यानंतर हवामानशास्त्रात शिक्षणाला भरपूर संधी आहेत. वेधशाळा, कृषी विद्यापीठे, पाटबंधारे विभाग, तंत्रशाळा इ. ठिकाणी वेधशाळा संचालक/ सहसंचालक/ संशोधक/ प्राध्यापक या पदांवर संधी उपलब्ध आहे.
खालील शिक्षणसंस्थेत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
०    पंजाब विद्यापीठ, पतियाळा (पंजाब)
०     महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र)
०     पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना (पंजाब)
अभ्यासक्रमाची उपलब्धता
हवामानशास्त्रात ‘डिप्लोमा इन मीटीऑरॉलॉजी हा दोन वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम’ ‘एम. एस्सी. मीटीऑरॉलॉजी’ हा दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यासाठी विज्ञान शाखेतील पदवी ही शैक्षणिक पात्रता आहे.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?