नॅशनल वॉटर डेव्लहपमेंट एजन्सीमध्ये सिव्हिल इंजिनीअर्सच्या १० जागा
अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक अथवा पदवीधर असावेत. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीची जाहिरात पाहावी अथवा http.//www.nwda.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सुपरिंटेंडिंग इंजिनीअर, इन्व्हेस्टिगेशन सर्कल, नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी, एम-४ ब्लॉक, मनोरंजन कॉम्प्लेक्स, एम. जे. रोड, नामपल्ली, हैदराबाद ५०० ००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०११.
‘इस्रो’मध्ये इंजिनीअरिंगसाठी १० जागा
अर्जदारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल वा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी ६५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या २ ते ८ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.isro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज सीनियर अ‍ॅडमिनिस्ट्रेट्व्हि ऑफिसर, आयसीआरबी- इस्रो, अंतरिक्ष भवन, न्यू बीईएल रोड, बंगळुरू ५६० ०९४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१३.
प्रसारभारतीची इंजिनीअरिंग असिस्टंट निवड परीक्षा
२०१३ अंतर्गत १२९० जागा : उमेदवारांनी रेडिओ, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यासारख्या विषयांतील पदविका, भौतिकशास्त्रासह बीएस्सी पदवी किंवा टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन किंवा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ फेब्रुवारी- १ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली प्रसारभारतीची जाहिरात पाहावी अथवा प्रसारभारतीच्या http://ssconline2.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१३.
केंद्रीय आरोग्य सेवा योजनेत परिचारिकांच्या २९ जागा
 उमेदवारांनी बारावी व त्यानंतर नर्सिगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व त्यांची नर्सिग काऊन्सिलकडे नोंदणी झालेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय सेवायोजन कार्यालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडिशनल डायरेक्टर हेडक्वार्टर्स), सेंट्रल गव्हर्नमेन्ट हेल्थ स्कीम, ९, बिकानेर हाऊस, हटमेंटस्, शाहजहान रोड, नवी दिल्ली ११००११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०१३.