25 February 2021

News Flash

रोजगार संधी

आयुध निर्माणीमध्ये ज्युनिअर वर्क्‍स मॅनेजर (मेकॅनिकल)च्या १७४ जागा : अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांचे वय ३० वर्षांहून

| June 24, 2013 09:54 am

आयुध निर्माणीमध्ये ज्युनिअर वर्क्‍स मॅनेजर (मेकॅनिकल)च्या        १७४ जागा :
अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांचे वय ३० वर्षांहून अधिक असू नये.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०१३.

अणुऊर्जा विभागात टेक्निशियनच्या ८ जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रिकलमधील पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. एक वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.    वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली अणु-ऊर्जा विभागाची जाहिरात पाहावी अथवा अणु-ऊर्जा विभागाच्या http://www.igcar.gov.in      या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, जनरल सव्‍‌र्हिसेस ऑर्गनायझेशन, कालपक्कम्, ६०३१०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख             १ जुलै २०१३.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये स्टेनोग्राफर्सच्या आठ जागा :
अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.upcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), काक्रापार साइट, पोस्ट अनुमला, मार्गे व्यारा, जि. तापी (गुजरात) ३९४६५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३.

कोल इंडियामध्ये मेडिकल एक्झिक्युटिव्हच्या ३१७ जागा :
अर्जदारांनी एमबीबीएस पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. पदव्युत्तर पात्रताधारक व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली कोल इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कोल इंडियाच्या www.coalindia.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज स्पीड पोस्टने जनरल मॅनेजर (पर्सोनेल / रिक्रूटमेंट), कोल इंडिया लिमिटेड, ‘कोल भवन’, १०, नेताजी सुभाष मार्ग, कोलकोता- ७००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३.

संरक्षण मंत्रालयात कनिष्ठ कारकुनांच्या २६ जागा उपलब्ध :
अर्जदार बारावी उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची २५ शब्द प्रतिमिनिट, तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज रिक्रूटमेंट सेल, कमांडंट, सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, जबलपूर, म. प्र. – ४८२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ जुलै २०१३.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल-टेलिकम्युनिकेशन्स ३६९ जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित व विज्ञान विषय घेऊन व ४५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा दहावीच्या परीक्षेनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिकमधील पात्रता पूर्ण केलेली असावी आणि ते शारीरिदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रूटमेंट तिकिटांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ३४४, जीपीओ-लखनऊ, उ. प्र. या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१३.

वायुदलात महिलांना वैमानिक म्हणून संधी :
अर्जदार महिलांनी इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांची दृष्टी निकोप असावी व त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोगट १९ ते २३ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी अथवा वायुदलाच्या www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०१३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 9:54 am

Web Title: employment opportunities 15
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 विदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या
2 कृषीविषयक पदवी अभ्यासक्रम
3 सांघिक भावना रुजविण्यासाठी..
Just Now!
X