भारत पेट्रोलियमच्या एचआर विभागातील विविध संधी
 अर्जदार एचआरमधील एमबीए वा समकक्ष पात्रता उत्तीर्ण असावेत व त्यांना एचआरशी संबंधित कामाचा चार ते १२ वर्षांचा अनुभव असायला हवा.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या http://www.bpcicareers.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख
१४ जून २०१३.
संरक्षण मंत्रालयात इटारसी येथे फायरमनच्या १० जागा : उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी अग्निशमनविषयक प्रशिक्षण घेतलेले असावे व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल प्रूफ एस्टॅब्लिशमेंट, इटारसीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज संरक्षण मंत्रालय, सेंट्रल प्रूफ एस्टॅब्लिशमेंट, इटारसी (होशंगाबाद) म.प्र. या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जून २०१३.
एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये टेक्निकल ऑफिसरच्या १३ जागा : अर्जदारांनी मेकॅनिकल, एरोनॉटिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वा टेलिकम्युनिकेशनमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व इतर तपशिलासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या http://www.airindia.in अथवा http://www.airindia या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख
१७ जून २०१३.
नौदलाच्या दक्षिण मुख्यालयात कनिष्ठ कारकुनांच्या १५ जागा – उमेदवारांनी बारावीची परीक्षा व इंग्रजी आणि हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाच्या दक्षिण मुख्यालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि फ्लॅग ऑफिसर – कमांडिंग इन चीफ, हेडक्वार्टर्स- सदर्न नेव्हल कमांड, कोची- ६८२००४ (केरळ) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जून २०१३.
नौदलात बारावी उत्तीर्णासाठी संधी : अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेऊन ७०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असावेत. वयोमर्यादा १९.५ वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.nausena-bharti.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ०४, आर. के. पुरम् (मेन) पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली ११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जून २०१३.
मध्यवर्ती आयुध डेपो, देहू रोड येथे कनिष्ठ कारकुनांच्या ४ जागा : अर्जदार बारावीची परीक्षा उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता उत्तीर्ण झालेले असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्यवर्ती आयुध डेपो देहू रोडची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडंट, सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, देहू रोड, पुणे -४१२१०१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ जून २०१३.
फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, डेहराडून येथे रिसर्च असिस्टंटच्या १० जागा : अर्जदारांनी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://fri.icfre.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्शन ऑफिसर (एस्टॅब्लिशमेंट), फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, पोस्ट न्यू फॉरेस्ट, डेहराडून- २४८००६ (उत्तराखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ जून २०१३.
कंबाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस अंतर्गत सैन्य दलाच्या विविध विभागांत ५०० जागा : अर्जदार इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत. वयोमर्यादा २३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०१३