यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षा २०१६ आणि भारतीय वन सेवा परीक्षा- २०१६ साठी ७ ऑगस्ट २०१६ रोजी सामाईक पूर्वपरीक्षा होईल. याद्वारे नागरी सेवा मुख्य परीक्षा आणि भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा यांकरता उमेदवार निवडले जातील.

रिक्त पदे- १०७९ (आयएएस, आयएफएस, आयपीएस, आयआरएस आदी १९ सेवांसाठी (अ प्रवर्ग) आणि इतर ५ सेवांसाठी  (ब प्रवर्ग) निवडले जातील.

maharashtra teacher recruitment 2024 marathi news
शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर काय होणार?
julio ribeiro article praising ips officer sadanand date
लेख : आमच्या उत्तराधिकाऱ्यांपुढचा काळ अधिक कठीण!
Pratibha Dhanorkar
प्रतिभा धानोरकरांनी ‘हातउसने’ घेतले ३९ कोटी! निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्ती विवरणातील तपशील
Job Opportunity Recruitment of License Inspector Posts
नोकरीची संधी: अनुज्ञापन निरीक्षकपदांची भरती

वयोमर्यादा- २१ ते ३२ वष्रे (अजा/अज ३७ वष्रे, इमाव ३५ वष्रे).

शैक्षणिक पात्रता- पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.  खुल्या गटातील उमेदवार कमाल ६ वेळा परीक्षेस बसू शकतात. (इमाव उमेदवार- ९ वेळा, अजा/अजसाठी अट नाही.)

परीक्षा शुल्क- रु. १००  (अजा/ अज/ महिला/ अपंग यांना शुल्क माफ).

निवड पद्धती- पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची  आहे. दुसऱ्या टप्प्यातील मुख्य परीक्षा- वर्णनात्मक स्वरूपाची असून तिसऱ्या टप्प्यात मुलाखतीला सामोरे जावे लागते.  नागरी सेवा मुख्य परीक्षा साधारणत: डिसेंबर २०१६मध्ये होईल. भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०१६ मध्ये होईल. ती फक्त इंग्रजीमधून लिहावी लागेल.

शैक्षणिक अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, भूशास्त्र, कृषी, वन, पशुपालन यांपकी एका विषयातील पदवी किंवा अभियांत्रिकीमधील पदवी कोणत्याही शाखेची.

रिक्त पदे- ११०. ज्याद्वारे सहायक वनसंरक्षक अशा पदावर नियुक्ती मिळू शकते.

भारतीय भूदलात तांत्रिक विभागात भरती

भारतीय भूदलात टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी- १२४) साठी ४० पदांची भरती करण्यात येत आहे. सिव्हिल- ११ पदे. मेकॅनिकल- ४ पदे.  इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स- ५ पदे. संगणक विज्ञान अभियांत्रिकी किंवा एमएस्सी : माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान- ६ पदे.  इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन- ६ पदे. इलेक्ट्रॉनिक्स/ मेटॅलर्जिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स प्रत्येकी २ पदे.

पात्रतेच्या अटी- संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी.(फक्त पुरुष उमेदवार पात्र).

वयोमर्यादा- १ जानेवारी २०१७ रोजी २० ते २७ वष्रे. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, देहराडून येथील प्रशिक्षणादरम्यान लेफ्टनंट पदावर नियुक्ती. प्रशिक्षणादरम्यान रु. २१ हजार विद्यावेतन दिले जाईल.

हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यास लेफ्टनंट पदासाठीचे पूर्ण वेतन दिले जाईल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ९ मे २०१६ ते ८ जून २०१६ पर्यंत करावेत.

पदवीधरांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियात उच्च पदाच्या संधी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २२०० ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांची भरती करण्यात येत आहे.

पात्रता- १ ऑगस्ट २०१६ रोजी पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा- १ एप्रिल २०१६ रोजी २१-३० वष्रे (अजा/अज- २१ ते ३५ वष्रे, इमाव- २१-३३ वष्रे). वेतन- प्रतिवर्ष किमान रु. ७.५५ लाख ते कमाल रु. १२.९३ लाख (पोस्टिंगनुसार). सविस्तर जाहिरात बँकेच्या www.sbi.co.in/careers १२ आणि www.statebankofindia.com/careers या संकेतस्थळावर आणि ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ मे २०१६ च्या अंकात पाहता येईल. ऑनलाइन पद्धतीने २४ मे २०१६ पर्यंत अर्ज करावेत. निवडीसाठी पूर्वपरीक्षा जुल २०१६ मध्ये होईल.

बारावी (विज्ञान) शाखेतील विद्यार्थ्यांना आर्मड् फोस्रेस मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएसला प्रवेश.

आर्मड् फोस्रेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) पुणे-४११०४० येथे ‘एमबीबीएस’साठी प्रवेश उपलब्ध आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- साडेचार वष्रे. एक वर्षांची इंटर्नशिप. पात्रतेच्या अटी- उमेदवार अविवाहित असणे आवश्यक. अभ्यासक्रमादरम्यान विवाहास परवानगी नाही. वयोमर्यादा- ३१ डिसेंबर २०१६ रोजी १७ ते २२ वष्रे. बीएस्सी उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा २४ वष्रे.

अर्हता- बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांत किमान ६० टक्के गुणांसह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण. इंग्रजी आणि शास्त्र विषयांत किमान ५० टक्के गुण. गणित विषयासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. उमेदवाराने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा ऑल इंडिया प्री मेडिकल (एआयपीएमटी- २०१६) उत्तीर्ण होणे आवश्यक.

प्रवेश जागा- १३० (मुले- १०५ आणि मुली- २५). एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांनी कमिशन्ड ऑफिसर म्हणून सन्यदलात काम करणे आवश्यक.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्र युनिव्हर्सटिी ऑफ हेल्थ सायन्सेस, नाशिक यांची पदवी मिळेल. शिकवणी शुल्क आणि हॉस्टेल फी माफ असते. वर्षांला केवळ रु. सात हजार मेससाठी भरावे लागतील.

ऑनलाइन पद्धतीने एआयपीएमटी रोल नंबर वापरून एएफएमसी पोर्टल  www.afmcdgrd.gov.in किंवा www.afmc.nic.in या वेबसाइटवर अर्ज करावेत.  ऑनलाइन नोंदणी २० मे २०१६ पर्यंत करावी आणि शुल्क ३० मे २०१६ पर्यंत भरावे.

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) मध्ये विविध जागा भरती

१. मॅनेजर (स्थापत्त्य अभियांत्रिकी)- ६७ जागा.  २. मॅनेजर (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी)- ४८ जागा. ३. मॅनेजर (ऑपरेशन्स)- १६ जागा. ४. मॅनेजर कमíशयल- ७ जागा. ५. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (वित्त)- २० जागा. अशा एकूण १५८ पदांची भरती.

वेतन- सीटीसी प्रतिवर्ष- व्यवस्थापक पदासाठी रु. १० लाख. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी रु. ७ लाख.

पात्रता- पद क्र. १ व २ साठी संबंधित विषयांतील पूर्णकालीन अभियांत्रिकी पदवी. पद क्र. ३ साठी- विज्ञान शाखेतील पदवी २ वर्षांचा पूर्णकालीन एमबीए किंवा बी.ई. पद क्र. ४ साठी पदवी एमबीए (मार्केटिंग) किंवा बी.ई. (पद क्र. १ ते ४ मॅनेजर पदासाठी दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.) पद क्र. ५- बी.कॉम. सीए / आयसीडब्ल्यूए/ एमबीए (फायनान्स) किंवा बीई पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक.

उच्चतम वयोमर्यादा- १ जून २०१६ रोजी व्यवस्थापक पदासाठी ३२ वष्रे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी २७ वष्रे (अजा/ अज- ५ वष्रे, इमाव- ३ वष्रे शिथिलक्षम).

परीक्षा शुल्क- एक हजार रु. (अजा/अज/महिला/अपंग यांना शुल्क माफ) ऑनलाइन पद्धतीने प्राथमिक स्तरावरील नोंदणी www.aai.aero या संकेतस्थळावर २४ मे २०१६ पर्यंत करावी. द्वितीय स्तरावरील नोंदणी १ जून २०१६ पर्यंत करावी.

सीमा सुरक्षा दलामध्ये पदभरती

सहायक उपनिरीक्षक (एएसआय आरएम)- १५२ पदे आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर (एचसी आरओ)- ४७० पदे मिळून एकूण ६२२ पदांची भरती. पात्र असल्यास उमेदवार दोन्ही पदांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतात.

अर्हता- शैक्षणिक- (१) एएसआय (आरएम) साठी रेडिओ अ‍ॅण्ड टी.व्ही. टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा डोमेस्टिक अप्लायन्सेसमधील पदविका किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांतील बारावी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(२) एचसी (आरओ)- पात्रता- दहावी उत्तीर्ण  रेडिओ अ‍ॅण्ड टी.व्ही. किंवा इलेक्ट्रॉनिक्समधील आयटीआय किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण.

परीक्षा शुल्क- रु. ५०/- बँक ड्राफ्ट स्वरूपात (अजा/अज, इमाव, पीडब्ल्यूडी यांना फी माफ) ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.bsf.gov.in या संकेतस्थळावर  १६ जून ते १५ जुल २०१६ पर्यंत करावेत. ऑनलाइन फॉर्मची िपट्र बँक ड्राफ्टसोबत  पाठवावी- द इन्स्पेक्टर जनरल, सीएसडब्ल्यूटी, बीएसएफ, इंदूर, बीजासन रोड, मध्य प्रदेश- ४५२००५.

संरक्षण मंत्रालयात एमपीएसच्या १५ जागा

केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालय, ईएमई रेकॉर्ड्स, त्रिमुलघेरी, सिकंदराबाद, तेलंगण राज्य- ५०० ०१५ मध्ये एमटीएसची १५ पदे भरण्यात येत आहेत.

पात्रता- दहावी उत्तीर्ण.

वयोमर्यादा- १८ ते २५ वष्रे.

निवड पद्धती- दहावीतील गुणानुक्रमे निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता, गणिती क्षमता, इंग्रजी आणि सामान्य माहिती या विषयांवर प्रश्न विचारले जातील.

विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह टपालाने २० मे २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना याकरता ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ एप्रिल २०१६ च्या अंकात पाहावा.

सुहास पाटील