सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

इंडियन आर्मीमध्ये अविवाहित पुरुष/महिला उमेदवारांकरिता ऑक्टोबर, २०२० पासून ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी (ओटीए),

चेन्नई येथे सुरू होणाऱ्या ट्रेिनग कोर्ससाठी प्रवेश.

एकूण १८९ पदे (एसएससी (टेक) पुरुष – ५५वा कोर्स. पुरुष – १७५, एसएससी (टेक) महिला – २६वा कोर्स. महिला – १४) प्रवेश.

रिक्त पदांचा तपशील इंजिनीअरिंग स्ट्रीमनुसार पुढीलप्रमाणे –

(१)    सिव्हिल इंजिनिअरिंग – पुरुष – ४२ पदे, महिला – २ पदे.

(२)    मेकॅनिकल इंजिनीअरिंग – पुरुष – १४ पदे, महिला – ३ पदे.

(३)    इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स – पुरुष – १७ पदे, महिला – २ पदे.

(४)    एअरोनॉटिकल/बॅलिस्टिक्स/ अव्हिऑनिक्स/एअरोस्पेस – पुरुष – ८ पदे.

(५) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) – पुरुष – ५८ पदे, महिला – ३ पदे.

(६)    इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ सॅटेलाइट कम्युनिकेशन इ. – पुरुष – २१ पदे, महिला – ३ पदे.

(७) इलेक्ट्रॉनिक्स/ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स/फायबर ऑप्टिक्स इ. – पुरुष – ८ पदे.

(८) प्रोडक्शन इंजिनीअरिंग – पुरुष – ९ पदे.

(९) आर्किटेक्चर/बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी – पुरुष – ५ पदे.

पात्रता

संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण. (अंतिम वर्षांत शिकणारे उमेदवार (जे अंतिम निकाल १ ऑक्टोबर, २०२० पर्यंत सादर करू शकतील ते), अर्ज करण्यास पात्र आहेत.)

(पद क्र. ५ कॉम्प्युटर सायन्ससाठी एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) पात्रताधारक अर्ज करू शकतात.)

वयोमर्यादा

२०-२७ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑक्टोबर १९९३ ते १ ऑक्टोबर २००० दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती

पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांआधीच्या वर्षांपर्यंतच्या गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर वाटप केलेल्या सिलेक्शन सेंटरचे नाव कळविले जाईल. त्यानंतर उमेदवारांनी संकेतस्थळावर लॉगइन करून एसएसबीची तारीख निश्चित करावी.

अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर, कापूरथळा या सिलेक्शन सेंटरवर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची सायकॉलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग

ऑफिसर आणि इंटरव्ह्य़ूइंग ऑफिसर यांच्याकडून एसएसबी इंटरव्ह्य़ू घेतला जाईल. (एसएसबी इंटरव्ह्य़ू ५ दिवसांपर्यंत चालेल. एसएसबीने निवडलेल्या उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल. यात फिट ठरणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार ट्रेनिंगसाठी निवड यादी जाहीर केली जाईल.

ट्रेनिंग

निवडलेल्या उमेदवारांना ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवडय़ांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास उमेदवारांना मद्रास युनिव्हर्सिटिकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्टट्रेजिक स्टडिज दिला जाईल. निवडलेल्या उमेदवारांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल लेफ्टनंट पदावर नेमले जाईल. लेफ्टनंट पदावर २ वर्ष सेवा पूर्ण केल्यावर कॅप्टन पदावर बढती दिली जाईल. ६ वर्ष पूर्ण केल्यावर ‘मेजर’ पदावर बढती मिळेल. १३ वर्षे पूर्ण केल्यावर लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळेल. ट्रेनिंगदरम्यान उमेदवारांना रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंगनंतर मिळणारे वेतन अंदाजे १ लाख रुपये असेल.

ऑनलाइन अर्ज http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. २० फेब्रुवारी २०२० (१२.०० वाजे)पर्यंत करावेत.

(Officer Entry Appln/Login – Registration – Apply Online).