News Flash

मुख्य परीक्षा – इतिहास अभ्यासक्रम विश्लेषण

साम्यवादी (डावी) चळवळ - साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, काँग्रेस समाजवादी पार्टी, ट्रेड युनियन चळवळ

एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमध्ये इतिहास विषयासाठी १५० पैकी ६० गुण निश्चित करण्यात आले आहेत. आयोगाने विहित केलेला अभ्यासक्रम त्याच क्रमाने अभ्यासणे आवश्यकही नाही आणि व्यवहार्यही नाही. त्यामुळे कोणते मुद्दे एकत्रितपणे अभ्यासावेत जेणेकरून ‘ तयार होऊन लॉजिकल अभ्यास होईल ते पाहू.

वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था

व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांत, अनौद्योगिकीकरण, भारतीय हस्तोद्योगांचा ऱ्हास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यिकरण, आधुनिक उद्योगांचा उदय- भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी (फंड) व गो. कृ. गोखले यांचे योगदान.

स्वातंत्र्यपूर्व भारताचा राजकीय इतिहास

ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे, तैनाती फौज धोरण, खालसा धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश सत्तेची रचना.

भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास : सामाजिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय संघटनांची स्थापना, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्रे व शिक्षण यांची भूमिका, १८५७ चा उठाव, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना (इंडियन नॅशनल काँग्रेस), मवाळ गटाचा काळ, जहाल गटाची वाढ, बंगालची फाळणी व होमरुल चळवळ, महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका – सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, ए. ओ. ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लाजपत राय, अ‍ॅनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू व इतर.

ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव

शेतमजुरांचे उठाव, आदिवासींचे उठाव – राघोजी भांगरे, उमाजी नाईक इत्यादी व आदिवासींच्या चळवळी. क्रांतिकारी चळवळी – महाराष्ट्रातील बंड – वासुदेव फडके, अभिनव भारत, बंगाल व पंजाबमधील क्रांतिकारी चळवळी, अमेरिका, इंग्लंड येथील भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी, आझाद हिंद सेना

साम्यवादी (डावी) चळवळ – साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, काँग्रेस समाजवादी पार्टी, ट्रेड युनियन चळवळ

गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन –

गांधीजींचे नेतृत्व आणि प्रतिकाराचे तत्त्व, गांधीजींच्या लोक चळवळी, असहकार, सविनय कायदेभंग, राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन १९३६, वैयक्तिक सत्याग्रह, चलेजाव चळवळ, गांधीजी आणि अस्पृश्यता निर्मूलन,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन, जातिव्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळी – आंबेडकरांचा दृष्टिकोन, गांधीजींचा दृष्टिकोन, इतर प्रयत्न, युनियनिस्ट पार्टी, कृषक प्रजा पार्टी

राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग, संस्थानातील जनतेच्या चळवळी

ब्रिटिश प्रशासनाधीन घटनात्मक विकास – भारतीय परिषद कायदा, १८६१; भारतीय परिषद कायदा, १८९२; भारतीय परिषद कायदा, १९०९ (मोर्ले- मिंटो सुधारणा); भारत सरकारचा कायदा, १९१९ (माँट – फोर्ड सुधारणा); भारत सरकारचा कायदा, १९३५

सांप्रदायिकतेचा विकास व फाळणी-  मुस्लीम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ (सर सय्यद अहमद खान व अलिगढ़ चळवळ, मुस्लीम लीग व अली बंधू, इक्बाल, जीना), हिंदू महासभेचे राजकारण

सत्ता हस्तांतरणाकडे – ऑगस्ट घोषणा- १९४०; क्रिप्स योजना-१९४२; वेव्हेल योजना- १९४५; कॅबिनेट मिशन योजना -१९४६; माउंटबॅटन योजना- १९४७; भारतीय स्वातंत्र्याचा कायदा- १९४७.

स्वातंत्र्योत्तर भारताचा राजकीय इतिहास

अंतर्गत राजकारण

फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, राज्यांची भाषावार पुनर्रचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ : महत्त्वाच्या राजकीय पक्षांचा सहभाग व त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय,  राज्यांतील संयुक्त सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी, काश्मीर, पंजाब व आसाममधील आतंकवाद, नक्षलवाद व माओवाद, पर्यावरण चळवळ, महिला चळवळ व वांशिक चळवळ.

कृषी, उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यांमधील प्रगती.

आंतरराष्ट्रीय राजकारण

शेजारील देशांशी संबंध, भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणातील भूमिका, अलिप्ततावादी धोरण, नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, आंतरराष्ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका, बांगलादेशाची मुक्तता

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताचा सामाजिक इतिहास

आधुनिक भारताचा इतिहास : आधुनिक शिक्षणाची ओळख – वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक-धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम

प्रबोधन काळ

सामाजिक-सांस्कृतिक बदल : ख्रिश्चन मिशनरींबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७),

सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या चळवळी : ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन आणि थिओसोफिकल सोसायटी शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टीस पार्टी

महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक

महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यांची विचारप्रणाली व कार्य : गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षि शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती का. त्र्यं. तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, धों. के कर्वे, र. धों. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर नाना पाटील, लहुजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

(प्राचीन ते आधुनिक) :

कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरुळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इ. प्रायोगिक कला (नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत व लोककला, लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इतर लोकनृत्ये), दृश्य कला (वास्तुरचना, चित्रकला व वास्तुशिल्प) आणि उत्सव, महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासावरील वाङ्मयाचा प्रभाव, भक्ती वाङ्मय, दलित वाङ्मय, नागरी आणि ग्रामीण वाङ्मय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:25 am

Web Title: mpsc exam study history course analysis akp 94
Next Stories
1 आधुनिक भारताचा इतिहास
2 एमपीएससी मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा इतिहास सुधारणा किती आणि कशा
3 यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास
Just Now!
X