आगामी पाच वर्षांत रिटेल उद्योगक्षेत्राची वाढ दुपटीने होणार असल्याचा विश्लेषकांचा दावा आहे. या क्षेत्रातील नवनव्या संधींची, संबंधित अभ्यासक्रमांची आणि हे शिक्षणक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्थांची सविस्तर माहिती-
सध्या शॉपिंग हा युवापिढीचा लाडका छंद बनला आहे. खरेदीच्या संकल्पना, प्राधान्यक्रम झपाटय़ाने बदलत आहेत. शहरीकरणाचा वाढता वेग आणि त्याबरोबर शॉिपग मॉल्स, सुपर मार्केट यांची वाढती संख्या, किरकोळ विक्री केंद्रांचे बदलते स्वरूप, वाढत्या लोकसंख्येमुळे दूरदूपर्यंत पसरलेल्या टोलेजंग वसाहती या सर्व कारणांमुळे रिटेल उद्योग क्षेत्र हे नजीकच्या भविष्यात वेगाने विस्तारणारे आकर्षक करिअर क्षेत्र बनू शकते. परिणामी, या क्षेत्रातील रोजगार संधीतही लक्षणीय वाढ संभवते.
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि बोस्टन कौन्सेिलग ग्रुपच्या ताज्या अहवालात येत्या पाच वर्षांत देशातील रिटेल उद्योगाची भरभराट दुपटीने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रस्तावनेच्या आधारे, आगामी दशकात रिटेिलग उद्योगक्षेत्रात वृिद्धगत होणाऱ्या प्रगतीच्या संधींबद्दल आपण नक्कीच सकारात्मक अंदाज बांधू शकतो. १५-२० वर्षांपूर्वी फक्त किराणा, औषधे, स्टेशनरी, तयार कपडे अशा निवडक गोष्टींच्या विक्रीसाठी मोक्याच्या जागेवर बाजारपेठ भागांतून दुकाने नजरेस पडत; पण गेल्या १०-१५ वर्षांत देशातील महानगरांपासून तालुका, जिल्हय़ाच्या ठिकाणीही नावाजलेल्या खासगी कंपन्यांची सुपर मार्केट्स सुरू झाली. या कंपन्यांशी स्पर्धा करू पाहणाऱ्या स्थानिक दुकानदारांनी उघडलेल्या सुपरशॉपीजही आपल्याला जागोजागी दिसतात. या उद्योगक्षेत्रात प्रगत माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ई-ट्रेिडग/ऑनलाइन शॉिपग अलीकडे मोठय़ा प्रमाणावर होताना दिसते. अर्थात, भारतातील लोकसंख्येचा वाढता आलेख आणि बहुस्तरीय विस्तार लक्षात घेता, रिटेल क्षेत्रातील लहान दुकानदारांपासून, सुपरमार्केट्स, ऑनलाइन ट्रेिडग
सर्वच आघाडय़ांवर खरेदीचा ओघ वर्षांनुवर्षे सतत वाढतच राहील यात शंका नाही.
करिअर संधी
रिटेिलग उद्योग क्षेत्रातील व्यवसाय हे एकाच वेळी निरनिराळ्या उत्पादकांच्या विविध प्रकारच्या उत्पादनांची मोठय़ा प्रमाणावर विक्री करणारी दुकानेच म्हणायला हवीत. या क्षेत्राचे नियोजनबद्ध आणि व्यापक स्वरूप पाहता येथे नोकरी करणारा उमेदवार कोणा एका व्यक्तीचा नोकर नसून विशिष्ट कंपनीचा नोकर असतो. कामाचे वातावरण तुलनेने आरामदायी आणि सुसहय़ असते. अन्य कॉर्पोरेट नोकरदार व्यक्तीप्रमाणे नियमित वेतन, भत्ते, कामाच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेप्रमाणे बढती, वेतनवाढ, भरपगारी सुटी, सरकारी कामगार योजनांचे लाभ, रिटेल उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तीलाही प्राप्त होतात. वर्तमानपत्रांतून रिटेल उद्योग क्षेत्राबद्दल प्रसृत होणाऱ्या बातम्यांचा आढावा घेतल्यास आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्याही आता भारतीय बाजारपेठेत उतरण्याची चिन्हे सुस्पष्ट आहेत.
या क्षेत्रातील उद्योग प्रामुख्याने स्पेशालिटी स्टोअर्स, सुपरमार्केट, मॉल्स, थेट उत्पादक विक्री केंद्र (फॅक्टरी आउटलेट), फ्रँचायजीस, चेन स्टोअर्स, डिस्काऊंट स्टोर्स, फíनिशग, ग्रोसरी (किराणा व तत्संबंधी) स्टोअर्स अशा विविध स्तरांवर विभागलेले दिसून येतात. कोणत्याही मॉल किंवा सुपरशॉपमध्ये नजर टाकल्यास, अशा ठिकाणी कुशल, अकुशल, शिक्षित, अशिक्षित, अनुभवी, अननुभवी, उच्चशिक्षित, अर्धवेळ, पूर्ण वेळ, सर्व वयोगटांतील उमेदवारांना कामाच्या संधी असल्याचे दिसून येते.
कामाचे स्वरूप
० कस्टमर सेल्स असोसिएट किंवा सेल्सपर्सन- या उद्योगात शिरकाव करण्यासाठी ही अगदी पहिली पायरी म्हणायला हवी. उत्पादनांची पूर्ण माहिती, ग्राहकांच्या अपेक्षांची उत्तम जाण असणे या व्यक्तींसाठी महत्त्वाचे ठरते.
० डिपार्टमेंट मॅनेजर/फ्लोअर मॅनेजर- पूर्ण दुकानाची किंवा दुकानातील मोठा विभाग सांभाळण्याची जबाबदारी या व्यक्तींवर असते.
० स्टोअर मॅनेजर- पूर्ण दुकान, त्यातील नोकरवर्ग, वस्तूंच्या विक्रीचा आवाका वाढवणे व त्याची माहिती कंपनीच्या क्षेत्रीय विक्री अधिकाऱ्याला देणे.
० रिटेल ऑपरेशन्स मॅनेजर- दुकानातील वस्तूंची विक्री, मालाचा पुरवठा, साठा यांतील सुसूत्रता, प्रत्यक्ष मालाची मांडणी (ग्राहकांच्या मागणीनुसार मालाची आखणी, उत्साही, मेहनती व्यक्तिमत्त्व आवश्यक).
० रिटेल बायर्स अ‍ॅण्ड र्मकडायझर्स- या व्यक्ती दुकानांसाठी माल निवडतात. ग्राहकांची तसेच उत्पादनाची जाण, आवश्यक व्हिज्युअल र्मकडायझर्स, वेअरहाउस मॅनेजर, रिटेल कम्युनिकेशन मॅनेजर, रिटेल मार्केटिंग एक्झीक्युटिव्हज अशा विविध पातळ्यांवर रिटेल उद्योगात रोजगार संधींची उपलब्धता शक्य होते. या उद्योगातील व्यावसायिक शिक्षण घेतलेले उमेदवार देशातील अग्रगण्य किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत तसेच जाहिरात, विमा, विमान सेवा, बँक्स, हॉटेल या उद्योग क्षेत्रांतही रोजगार किंवा स्वयंरोजगारही मिळवू शकतात.
 शिक्षणक्रम  
० बीएस्सी फॅशन र्मकडायिझग,
रिटेल मॅनेजमेंट
० एमएस्सी फॅशन र्मकडायिझग, रिटेल मॅनेजमेंट
० बॅचलर ऑफ फॅशन रिटेल मॅनेजमेंट
० पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट रिटेल मॅनेजमेंट
० पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मार्केटिंग, रिटेल मॅनेजमेंट
० डिप्लोमा व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट
० डिप्लोमा व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा र्मकडायिझग
० डिप्लोमा इन्व्हेनटरी मॅनेजमेंट
० डिप्लोमा रिटेल मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट
० स्टोअर मॅनेजमेंट
वरील शिक्षणक्रमांपकी डिप्लोमा, सर्टििफकेट किंवा पदवी शिक्षणक्रमांना  बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात. या प्रकारच्या शिक्षणातून रिटेल उद्योगासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापन, ग्राहकांशी संवादकौशल्य, आíथक बाबी, उद्योगासंबंधी मूलभूत नियम आणि कायदेविषयक माहिती आदी गोष्टींबद्दल व्यावहारिक ज्ञान दिले जाते.
 प्रमुख शिक्षणसंस्था
० सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लìनग, पुणे, मुंबई. http://www.scdl.net
० महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे. http://www.mitpune.com
० एएसएम इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, पुणे.
http://www.asmibmr.edu.in
० गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, मुंबई.
giced.edu.in
० इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मटेरिअल्स मॅनेजमेंट, मुंबई.
http://www.iimmmumbai.org
० इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग, मुंबई
http://www.iip-in.com
० इन्स्टिटय़ूट ऑफ लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅव्हिएशन मॅनेजमेंट, मुंबई.
http://www.ilamindia.in
० नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिटेल अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, अंधेरी, मुंबई.
http://www.nirm.org.in
या व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वरील व्यावसायिक शिक्षणासोबतच मेहनत, चिकाटी, ग्राहकांच्या अपेक्षा, बाजारपेठेचे स्वरूप या विषयांची जाण, संवादकौशल्य या बाबीही
महत्त्वाच्या ठरतात. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि थेट परकीय गुंतवणुकीला अनुकूल सरकारी धोरणे पाहता आगामी काळात या क्षेत्रात अनेक नवनवीन देशी-विदेशी कंपन्यांचा समावेश होऊ शकतो, तेव्हा करिअर संधींचा विचार करताना रिटेिलग उद्योग क्षेत्राचा नक्कीच विचार व्हायला हवा.
गीता सोनी
geetazsoni@yahoo.co.in

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ