फॉ रेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, डेहराडून येथे रिसर्च असिस्टंट- जनरल म्हणून खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत –
जागांची संख्या व तपशील : एकूण प्रवेशजागांची संख्या १० असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामाची आवड असायला हवी. संगणकाचे अद्ययावत ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २७ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, डेहराडून येथे रिसर्च असिस्टंट- जनरल म्हणून दरमहा ५२००-२०२००+२८०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदे पण देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून २०० रुपयांचा अकाऊंट्स ऑफिसर, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या नावे असणारा व डेहराडून येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, डेहराडूनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://fri.icfre.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज सेक्शन ऑफिसर (एस्टॅब्लिशमेंट), फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, पोस्ट ऑफिस- न्यू फॉरेस्ट, डेहराडून- २४८००६ (उत्तराखंड) या पत्त्यावर २१ जून २०१३ पर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठवावेत.