इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर विमेनतर्फे खास विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असणाऱ्या इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध पदवी अभ्यासक्रम : बीटेक्- कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, बीटेक्- इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, बीटेक्- मेकॅनिकल अ‍ॅण्ड ऑटोमेशन इंजिनीअरिंग व बीटेक्- इन्फरमेशन टेक्नॉलॉजी.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थिनींनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित व विज्ञान विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम : मास्टर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, एमटेक्- इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, एमटेक्- इन्फरमेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट, एमटेक्- डिझाइन व एमटेक् रोबोटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅटोमेशन.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थिनींनी संबंधित इंजिनीअरिंग वा तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वर नमूद केलेली गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ५ टक्क्यांनी शिथिलक्षम आहे.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास ५०० रु.चा रजिस्ट्रार आयजीडीटीयू यांच्या नावे असणारा व दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह पाठवावा.
 संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमेनच्या ६६६.्रॠ्र३.ूं.्रल्ल अथवा ६६६.्रस्र्४.ूं.्रल्ल या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज दि रजिस्ट्रार, इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमेन, कश्मिरी गेट, दिल्ली ११०००६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१३.