या पुस्तकात राज्य सेवा पूर्वपरीक्षेच्या पेपर-२ च्या अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्न आणि अभ्यासतंत्र अथवा क्लृप्त्याही देण्यात आल्या आहेत. गणिते सोडविताना वापरावयाच्या युक्त्यांचा समावेशही या पुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आकलन सोप्या पद्धतीने व्हावे यासाठी सारणी, स्तंभालेख, वृत्तालेख, उदाहरणांसह स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तार्किक अनुमान, विश्लेषणात्मक चाचणी या घटकावर संकीर्ण प्रश्नसंच देण्यात आला आहे. आकृत्यांचे पृथक्करण, नातेसंबंध व त्यावरील सराव, दिग्दर्शिका व कालमापन यावरही मार्गदर्शन करण्यात आले आहे. कूटप्रश्नात गणिती क्रियांवर, बुद्धिमापन चाचणीसाठी तसेच विचार करण्याच्या क्षमतेवर आधारित प्रश्न देण्यात आले आहेत. निर्णयक्षमता आणि संवादकौशल्यावर आधारित सराव प्रश्नही यात देण्यात आले आहेत. सी-सॅटचा पद्धतशीर अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक परीक्षार्थीना उपयुक्त ठरू शकेल.
 राज्य सेवा पूर्वपरीक्षा : सी-सॅट – गोपाल दर्जी, प्रशांत पब्लिकेशन्स, किंमत – ३३० रु.