असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे।
संतश्रेष्ठ तुकारामांनी ‘अभ्यास’ म्हणजे काय,  अभ्यास नेमका कसा करावा,  हे या अभंगातून नेमकेपणानं सांगितलं आहे.
अभ्यास म्हणजे सायास, प्रयास, प्रयत्न, सराव, मेहनत. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी, अनुभवण्यासाठी, आकलनासाठी, शिकण्यासाठी पुन:पुन्हा करणे म्हणजे अभ्यास.
कोणताही विषय कितीही कठीण, अशक्य वा असाध्य असला तरीही तो सातत्यानं, शिस्तबद्ध प्रयत्न करून शिकता येतो. शिकण्यासाठी केला जातो तो अभ्यास. अभ्यास म्हणजे चुकतमाकत शिकत केलेली कृतीच. कृतीतूनच आपण शिकत असतो. म्हणून त्यासाठी अभ्यास आनंददायी हवा. आकलनासाठी हवा. अभ्यास हा विविध विषयांच्या माहितीची परीक्षा देण्यासाठी नव्हे तर; शहाणपणासाठी, जगण्यासाठी हवा. अभ्यास ही जिज्ञासा, निरीक्षण आणि कल्पनेतून उलगडत जाणारी आणि आत्मभान देणारी प्रक्रिया असते. बुद्धिमत्ता, गुणवत्ता, क्षमता आणि सर्जनशीलता यांचा आविष्कार घडवणारी आनंददायी अनुभूती असते.
आपल्याकडे अभ्यासाचा, शिक्षणाचा संबंध हा केवळ स्मरणशक्तीशी जोडला गेला आहे. मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे आणि मेंदू कृतीतून, अनुभवातून शिकत असतो; याचं भान आपल्याला अजून आलेलं नाही म्हणून अभ्यास हा आनंदमयी वाटण्याऐवजी मुलांना तो शिक्षा वाटत आहे.
आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपण बघत, कृती करत स्वत:हून शिकत असतो, त्याकरिता आपण साऱ्यांनी ‘अभ्यास’ आणि शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.
अभ्यास एक जगण्याची दृष्टी देणारा अनुभव म्हणून स्वीकारायला हवा. ‘शिकायचं कसं!’ हे शिकविणारा अभ्यास हवा.

प्रा. विजय जामसंडेकर
vijayjamsandekar@yahoo.com

cabinet deputy secretary mrunmai joshi guidance for upsc
माझीस्पर्धा परीक्षा :अभ्यास करावा नेटका…
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका