सैन्यदलांतर्गत विविध आरोग्य व वैद्यकीय आस्थापनांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बीएस्सी (नर्सिग), जनरल नर्सिग वा मिडवाईफरी या चार वर्ष कालावधीच्या विशेष पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्यानुसार पात्रताधारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थिनींनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय घेऊन पहिल्या प्रयत्नात व कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि त्या शारीरिकदृष्टय़ा पात्र असाव्यात.
निवड परीक्षा : अर्जदारांपैकी पात्रताधारक महिला उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी जानेवारी २०१४ मध्ये देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर बोलावण्यात येईल. परीक्षा केंद्रांमध्ये राज्यातील मुंबई परीक्षा केंद्राचा समावेश असेल. निवड परीक्षा बारावीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार आधारित असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना सैन्यदल निवड मंडळातर्फे मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची वरील अभ्यासक्रमांची निवड करण्यात येईल.
निवड व नेमणूक : वरील अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना सैन्यदलांतर्गत विविध वैद्यकीय आस्थापनांमध्ये नियमांनुसार वेतनश्रेणी व इतर लाभांसह नेमण्यात येईल.
अर्जाचा नमुना इतर माहिती व तपशील : अर्जाचा नमुना इतर माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची बीएस्सी- नर्सिग अभ्यासक्रमविषयक जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स ऑफ एमओडी (आर्मी), एजीज ब्रँच, डीजीएमएस- ४ बी, रूम नं. ४५, ‘एल’ ब्लॉक, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर ८ ऑक्टोबर २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व १ ऑगस्ट १९८९ ते ३१ जुलै १९९७ च्या दरम्यान जन्मतारीख असणाऱ्या पात्रताधारक विद्यार्थिनींसाठी सैन्य दलात सेवा-सुश्रूषा क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो