27 February 2021

News Flash

फडतूस

‘एवढा आटापिटा करून गेलो पण चित्रपट इतका फडतूस निघाला’

‘एवढा आटापिटा करून गेलो पण चित्रपट इतका फडतूस निघाला’ किंवा ‘इतक्या फडतूस गोष्टीसाठी तू जीव टाकत होतास?’ या वाक्यांवरून आपल्या सहज लक्षात येते की जी गोष्ट अतिशय टाकाऊ , क्षुल्लक आहे त्यासाठी हा शब्द वापरतो. पण मग अशा टाकाऊ  गोष्टीसाठी ‘फडतूूस’ हा शब्द कसा काय तयार झाला असावा बरं?  फड म्हटल्यावर आपल्याला गप्पांचा फड आठवतो नाहीतर थेट तमाशाचा. पण शेतामध्ये जी धान्य साठवण्याची जागा असते ज्यावर धान्याचा, कणसाचा ढीग ठेवला जातो त्यालासुद्धा ‘फड’ म्हणतात. शेतातून काढलेले हे धान्य सालासकट असते ज्याला ‘तूस’ म्हणतात. जेव्हा धान्य स्वच्छ करायला हा फड उडवला जातो, तेव्हा धान्य एका बाजूला आणि धान्याला चिकटलेले तूस, फोलपट दुसऱ्या बाजूला पडतात. त्यानंतर या तुसांचा, फोलपटांचादेखील ‘फड’ तयार होतो. अर्थातच हा ढीग टाकाऊ असतो. त्याचा काही खायला उपयोग नसतो. या टाकाऊ तुसांचा फड म्हणजे फडतूस. काही कामाचा नसलेला.

घटस्फोट

हा शब्द रोजच्या ऐकण्यातला. नवरा-बायकोची कायदेशीर फारकत म्हणजे ‘घटस्फोट’. पण या कायदेशीर प्रक्रियेसाठी; उच्चार करतानाही ज्याची तीव्रता प्रकर्षांने जाणवेल असा घटस्फोट शब्द कशावरून योजला गेला असेल?  तर ‘घट’ म्हणजे मडके आणि ‘स्फोट’ म्हणजे फुटणे / फोडणे. साधारणत: आपल्याकडे मंगलकार्याचा प्रारंभ घटाची स्थापना करून होत असते. लग्नविधीमध्येदेखील हे घट महत्त्वाची भूमिका बजावतात. याच घटांचा स्फोट झाला म्हणजे लग्न मोडले. पती-पत्नीतील एकोपा तुटला. म्हणजेच घटस्फोट झाला. खेडय़ापाडय़ात यासाठी काडीमोड हा शब्दही योजला जातो. कारण काडी ही अखंडतेचे प्रतीक आहे. ती मोडून विवाहबंधन समाप्त केले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 3:00 am

Web Title: the history of marathi word
Next Stories
1 नोकरीची संधी
2 एमपीएससी मंत्र : अपेक्षित प्रश्नांची तयारी
3 संशोधन संस्थायण : शोधाची पूर्व दिशा
Just Now!
X