यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताअंतर्गत येणाऱ्या भारतीय स्वातंत्र चळवळ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०२० मध्ये  एकूण  ५८ प्रश्न विचारण्यात आलेले होते.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Border march canceled in Ladakh Determined to continue peaceful protests
लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांचे स्वरूप

२०२० मध्ये गांधी-आयर्विन करार, १८८४ चा रखमाबाई खटला, २० व्या शतकाच्या सुरुवातीला नीळ लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट का झालेली होती आणि  ‘देशेर कथा’ हे पुस्तक कोणी लिहिले यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१९ मध्ये ‘स्वदेशी आंदोलन’, ‘विविध संघटना’, ‘व्यक्ती तसेच गांधीजींच्या कार्या’शी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१८ मध्ये ‘१९३५ चा भारत सरकार कायदा, हिंद मजदूर सभा, कोणत्या संघटनेचे नाव बदलून स्वराज्य सभा ठेवण्यात आले होते?’ इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१७ मध्ये ‘बट्लर समिती, १९२९ चा ट्रेड डिस्प्युट कायदा, १८८१ चा फॅ क्टरी कायदा, तसेच द्विदल-शासन पद्धती (Dyarchy)’  इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१६ मध्ये ‘माँटेग्यू चेम्सफोर्ड प्रस्ताव कशाशी संबंधित होता?’ असा प्रश्न विचारला होता. यासाठी सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, पोलीस प्रशासनातील सुधारणा आणि घटनात्मक सुधारणा असे चार पर्याय देण्यात आलेले होते आणि यातील योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१५ मध्ये ‘खालीलपैकी कोणत्या चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभाजन होऊन मवाळवादी आणि जहालवादी गटांचा उदय झाला?’ आणि यासाठी स्वदेशी चळवळ, चले जाव चळवळ, असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळ हे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातून योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१४ मध्ये ‘१९२९ चे भारतीय राष्ट्रीय  काँग्रेसचे अधिवेशन भारतीय इतिहासामध्ये का महत्त्वपूर्ण मानले जाते?’ हा प्रश्न होता. त्यासाठी पर्याय होते, स्व-सरकार मिळविणे हे  काँग्रेसचे उद्दिष्ट आहे, ही घोषणा केली, पूर्ण स्वराज्य मिळविणे  हा  काँग्रेसचा उद्देश आहे याची घोषणा केली, असहकार चळवळ सुरू करण्यात आली आणि लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा होता.

२०१३ मध्ये ‘अल्बर्ट  बिल कशाशी संबंधित होते?’ भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी निश्चित स्वरूपाचे निर्बंध लादणे, भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे आणि मासिकांवर निर्बंध लादणे, युरोपियन लोकांवर खटला चालविण्यासाठी भारतीयांना घातलेली अपात्रता काढून टाकणे आणि आयात केलेल्या सुती कपड्यावरील कर काढून टाकणे असे चार पर्याय देण्यात आलेले होते. यातील योग्य पर्याय कोणता, असे विचारण्यात आलेले होते.

२०१२ मध्ये ‘भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये दादाभाई नवरोजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते होते?’ आणि यासाठी पर्याय होते, ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी आर्थिक पिळवणूक उघड केली, प्राचीन भारतीय साहित्याचा अर्थ स्पष्ट करून भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला  आणि काही करण्यापूर्वी सामाजिकदृष्ट्या दुष्ट प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याच्या गरजेवर भर दिला, अशी तीन विधाने देण्यात आलेली होती. यापैकी योग्य विधान/ विधाने कोणती हे निवडायचे होते.

२०११ मध्ये, ‘१९४२ च्या चले जाव चळवळीचे कोणते निरीक्षण सत्य नाही?’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यासाठी पुढील पर्याय दिले होते. ही एक हिंसक चळवळ होती, याचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी के ले होते, ही एक उत्स्फू र्त चळवळ होती आणि कामगारांना आकर्षित करून घेता आले नाही. या चार पर्यायांतील अचूक निरीक्षण ओळखून योग्य पर्याय निवडायचा होता.

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या विषयावर विचारण्यात आलेले होते. या विषयाचा अभ्यास करताना आपणाला वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, तसेच व्यक्ती विशेष माहिती, विविध चळवळी आणि संबंधित घडामोडी इत्यादी पैलूंच्या आधारे या विषयाचे आकलन करणे गरजेचे आहे. हा विषय आपणाला पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयार करावा  लागत असल्यामुळे व्यापक पैलूंचा विचार करून या विषयाची सखोल तयारी  करावी लागते.

भारतीय स्वातंत्र चळवळ या विषयाची तयारी करताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि याच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५ मधील भारतीय राष्ट्रीय  काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा, राष्ट्रीय चळवळीची सर्वसाधारणपणे तीन टप्प्यांत विभागणी केली जाते – मवाळ अथवा नेमस्त कालखंड (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधीयुग (१९२०-१९४७) तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र चळवळीमधील इतर प्रवाह… ज्यामध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ इत्यादीचा समावेश होतो.  याचबरोबर  स्वराज पार्टी, आझाद हिंद सेना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानमधील प्रजेच्या चळवळी, निम्नजातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाइसरॉय) आणि भारतमंत्री, १८५७ च्या नंतरचे ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे- १८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील घटनात्मक विकास म्हणून पाहतो. तसेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन, वेव्हल प्लॅन, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

या विषयाची  मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपीन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे आणि त्यानंतर  या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बिपीन चंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फार इंडिपेंडन्स’, बी. एल. ग्रोवर  आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, सुमित सरकार लिखित ‘आधुनिक भारत’ इत्यादी संदर्भग्रंथ वाचावेत आणि  या संदर्भग्रंथावर  आधारित स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात, जेणेकरून हा विषय कमीत कमी वेळेमध्ये अभ्यासला जाऊ शकतो.