डेटा म्हणजे केवळ आकडे नाहीत, तर असे आकडे ज्यांत विशिष्ट प्रकारची माहिती असते. ती प्रक्रिया उलगडून दाखवण्यासाठी ही माहिती आवश्यक असते. अलीकडे अनेक क्षेत्रांमधील आवश्यक डेटाच्या मागणीत वाढ होऊ लागल्याने संख्याशास्त्रज्ञांच्या (स्टॅटिस्टिशियन) सेवांनाही ‘अच्छे दिन’ आले आहेत.
विश्वासार्ह डेटा तयार करणं, सांख्यिकी माहितीचं विश्लेषण करणं, योग्य कारणांसहित त्यातील अर्थ समजून घेणं, त्यातून व्यावहारिक निष्कर्ष काढणं याकरता संख्याशास्त्रज्ञांच्या मदतीची गरज असते. असा तपशील तयार करण्यासाठी तसंच त्याचं विश्लेषण करण्यासाठी संख्याशास्त्रज्ञ अत्याधुनिक संगणकीय प्रक्रियेची मदत घेतात. डेटा तयार करताना त्या डेटाद्वारे माहिती समजावी आणि त्यातील तपशिलाच्या आधारे समस्यांचं निवारण व्हावं, यासाठी संख्याशास्त्रज्ञ प्रयत्नशील असतात.
संख्याशास्त्र या विषयाबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज आढळून येतात. काहींना वाटत असतं, संख्याशास्त्र म्हणजे केवळ हवेत अंदाज बांधणं होय. मात्र संख्याशास्त्र हे अभ्यासक्रमानुसार अथवा आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या स्तरांवर शिकवलं जातं. मात्र, त्यामुळे या क्षेत्रातील करिअरच्या पुढील संधी अधिकाधिक अरुंद होत जातात. त्यामुळे संबंधित व्यक्ती संख्याशास्त्र कुठल्या स्तरापर्यंत शिकली आहे, त्यावर तिला या क्षेत्रात मिळू शकणारी संधी अवलंबून असते.
संख्याशास्त्रात उच्च स्तरीय विश्लेषणात्मक तंत्र अवलंबणं आवश्यक आहे. ज्यात प्रगत गणिताचा उपयोग करणं अनिवार्य ठरतं. कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन कामाकरता भल्यामोठय़ा माहितीचं विश्लेषण करून हवं असतं. त्याकरता संख्याशास्त्राचं कौशल्य वापरणं गरजेचं आहे. अलीकडे मोठय़ा डेटाचं विश्लेषण करण्याची कामे मोठय़ा संख्येने उपलब्ध आहेत.
जीवनाच्या प्रत्येक शाखेत आज संख्याशास्त्राचा उपयोग होतो. त्यात माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, उत्पादनाचं मूल्यांकन, वित्त, विमा, जोखमीचं व्यवस्थापन, विपणन, आर्थिक नियोजन, हवामानाचे अंदाज वर्तवणं, आपत्कालीन तयारी, अनारोग्याची जोखीम तपासणं, आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणं, वाहतूक व्यवस्था, पत अजमावणं, राष्ट्रीय सुरक्षेची ग्वाही देणे, आर्थिकस्थिती तपासणं, गुन्हेगारांवर खटला चालवणं, वैद्यकीय सुरक्षेची पुनर्तपासणी करणं, सरकारी नियम बनवणं, लोकसंख्या मोजणी, औषधांची परिणामकता तपासणं इत्यादी.

नोकरीच्या संधी
संख्याशास्त्रज्ञांना करिअरचे उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध आहेत. संख्याशास्त्रज्ञांना इंडियन स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिस (आयएएसचा समकक्ष स्तर), नॅशनल सॅम्पल सव्‍‌र्हे ऑर्गनायझेशन, आयसीएआर, आयसीएमआर, हवामान खातं, बँकिंग उद्योग, सरकारी तसेच खासगी संस्थांमधील संशोधन आणि विकास स्वरूपाचं काम.
या क्षेत्रात नोकरीच्या प्रगत संधी संपादन करण्यासाठी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त असणं आवश्यक आहे. १९८१ पासून मंगळुरू विद्यापीठात संख्याशास्त्रातून एम.एस्सी. हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाद्वारे इकॉनॉमेट्रिक्स, संख्याशास्त्रीय वित्त, ऑपरेशन्स सव्‍‌र्हिस, टाइम सीरिज, डेटा मायिनग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांची माहिती मिळते. यासंबंधीची प्रात्यक्षिकं संगणकाच्या मदतीने घेतली जातात आणि विद्यार्थ्यांना प्रोग्राम्स डेव्हलपमेन्टचं प्रशिक्षण दिलं जातं. या अभ्यासक्रमात प्रोजेक्ट वर्क हा महत्त्वाचा टप्पा असतो. याद्वारे तुम्हाला कंपन्यांमध्ये प्लेसमेन्ट मिळणं शक्य होतं. आज उद्योगक्षेत्रांमध्ये प्रशिक्षित संख्याशास्त्रज्ञांची वानवा भासत आहे.

upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?

अभ्यासक्रम
बी.एस्सी. आणि बी.ए. स्तरावर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये संख्याशास्त्र हा विषय पदवी स्तरावर उपलब्ध आहे. पदव्युत्तर स्तरावर एम.एस्सी. इन स्टॅटिस्टिक्स हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे उपलब्ध आहे.  एम.ए. इन स्टॅटिस्टिक्स हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांत उपलब्ध आहे.  मुंबई विद्यापीठात ‘अ‍ॅप्लाइड स्टॅटिस्टिक्स विथ सॉफ्टवेअर कोर्स’ या विषयात पदव्युत्तर पदविका उपलब्ध आहे. ‘स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर डेटा अ‍ॅनालिसिस’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उपलब्ध आहे.
योगिता माणगांवकर