ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे देशांतर्गत १६० व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांच्या एमबीए अथवा व्यवस्थापनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- सप्टेंबर २०१६ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खालीलप्रमाणे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना निवड परीक्षा द्यावी लागेल. ही निवड परीक्षा लेखी स्वरूपात देशांतर्गत निवड परीक्षा केंद्रांवर ४ सप्टेंबर २०१६ रोजी तर संगणकीय स्वरूपात १० सप्टेंबर २०१६ रोजी घेण्यात येईल.
उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित संस्थेच्या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क- प्रवेश अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून १२०० रु. संगणकीय पद्धतीने अथवा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नावे असणाऱ्या व दिल्ली येथे देय असणाऱ्या डिमांड ड्राफ्टद्वारा पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१६ आहे.

अधिक माहिती व तपशील-
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या दूरध्वनी क्र.- ०११-२४६०८५०० वर संपर्क साधावा अथवा असोसिएशनच्या http://apps.aima.in/ matsept 16 या संकेतस्थळाला भेट द्यावी.