एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल)च्या ९ जागा-

अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २९ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६ ते १२ मेच्या अंकात प्रकाशित झालेली एनबीसीसीची जाहिरात पहावी अथवा एनबीसीसीच्या http://www.nbccindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून २०१७.

इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन रिसोर्स टेक्नॉलॉजी-

पालमपूर येथे संशोधकांच्या १९ जागा- अर्जदार बीटेक/ एमसीए/ एमबीए/ एमई/ एमटेक यांसारखी पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३७ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन रिसोर्स टेक्नॉलॉजी, पालपूरची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.ihbt.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून २०१७.

खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डात इंग्रजी लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) म्हणून संधी-

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. याशिवाय त्यांनी एमएच- सीआयटी व लघुलेखनाची १०० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे.

अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डाची जाहिरात पहावी अथवा कॅन्टॉनमेंट बोर्डाच्या ०२०- २५८१७५१० वर संपर्क साधावा, किंवा   http://www.cbkirkee.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज चीफ एक्झीक्युटिव्ह ऑफिसर, खडकी कॅन्टॉनमेंट बोर्ड, १७, फिल्ड मार्शल करिअप्पा मार्ग, खडकी, पुणे- ४११ ००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेटची तारीख ४ जून २०१६.