आजच्या लेखामध्ये आपण २०व्या शतकातील आधुनिक जगाच्या इतिहासाकडे पाहणार आहोत. यातील महत्त्वाच्या घडामोडींची विस्तृत चर्चा करून गतवर्षीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नासह या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भ साहित्य वापरावे याचाही आढावा घेणार आहोत.

या कालखंडात ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या त्याला तत्कालीन कारणाबरोबरच मागील दोन शतकांतील म्हणजेच १८व्या आणि १९व्या शतकात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांची पाश्र्वभूमी होती. विशेषकरून युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचा प्रभाव हा संपूर्ण जागतिक व्यवस्थेवर होत असे, कारण २०व्या शतकातील साम्राज्यवादी सत्ता या युरोपमधील होत्या आणि त्यांच्या वसाहती आफ्रिका आणि आशियामध्ये होत्या. तसेच याला १९व्या शतकात झालेल्या युरोपातील काही महत्त्वाच्या घडामोडी उदाहरणार्थ इटलीचे एकीकरण, जर्मनीचे एकीकरण, राष्ट्रवादाचा उदय, पूर्वेकडील प्रश्न, बíलन परिषद आणि आफ्रिका खंडाची साम्राज्यवादी सत्तेमध्ये झालेली विभागणी आणि युरोपातील विविध राष्ट्रामध्ये स्थापन झालेल्या मत्रीपूर्ण युती अथवा करार (Alliances) त्याद्वारे केले जाणारे राजकारण, याचबरोबर अमेरिका, जपान या राष्ट्राची ध्येयधोरणे इत्यादीची योग्य माहिती असल्याखेरीज २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते या शतकाच्या मध्यापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी योग्य पद्धतीने समजून घेता येत नाहीत. मत्रीपूर्ण युती अथवा करार, राष्ट्रवादी विचारसरणीचा वाढता प्रभाव, आक्रमक लष्करवाद, साम्राज्यवादी प्रतिस्पर्धा, बाल्कन युद्धे तसेच तत्कालीन कारण या काही महत्त्वाच्या कारणामुळे पहिल्या जागतिक महायुद्धाची सुरुवात १९१४ मध्ये झाली व हे युद्ध १९१८मध्ये समाप्त झाले. यानंतर पॅरिस शांतता परिषेदतील विविध करारांनुसार पराभूत राष्ट्रांवर अनेक अटी लादण्यात आल्या.

stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”

यामध्ये जर्मनी हे महत्त्वाचे पराभूत राष्ट्र होते व जर्मनीला या युद्धासाठी जबाबदार धरण्यात आलेले होते, तसेच या परिषदेमध्ये राष्ट्रसंघाची (League of Nations) स्थापना करण्यात आली. या संघटनेचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील विवाद सोडविणे हा होता, याचबरोबर याचदरम्यान रशियन क्रांती होऊन सोव्हिएत युनियनची स्थापन झालेली होती आणि या क्रांतीवर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. या विचारसरणीचा वाढता प्रभाव याव्यतिरिक्त दोन जागतिक महायुद्धामधील जग याअंतर्गत इटलीमधील फॅसिस्टवाद आणि जर्मनीमधील नाझीवाद, राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे कार्य आणि राष्ट्रसंघाचे अपयश, जागतिक आíथक महामंदी, अरब राष्ट्रवाद, युरोपमधील हुकूमशाहीचा उदय आणि अंत, ब्रिटिशांचे तुष्टीकरण धोरण व याचे परिणाम, दुसऱ्या जागतिक महायुद्धाची महत्त्वाची कारणे व याचा परिणाम, दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचे जग यामध्ये संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना, आशिया आणि आफ्रिकेमधील निर्वसाहतीकरण व यामधून उदयाला आलेले नवीन राष्ट्र व अलिप्ततावादी चळवळ, चीनची क्रांती भांडवलशाही व समाजवादी विचारसरणीचा प्रभाव व अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्ताचा उदय व या दोन महासत्तामध्ये जगाची विभागणी, शीतयुद्धाची सरुवात आणि या काळातील महत्त्वाच्या घटना, १९८९मधील सोव्हिएत युनियनचे विघटन व याची कारणे, पश्चिम व पूर्व जर्मनीचे १९९१मध्ये झालेले एकत्रीकरण व याच्या जोडीला अमेरिकेचा एकमेव जागतिक महासत्ता म्हणून झालेला उदय इत्यादी महत्त्वाच्या घडामोडीची योग्य माहिती असणे

गरजेचे आहे. अशा प्रकारे या घटकाची सर्वप्रथम मूलभूत माहिती आपणाला करून घ्यावी लागते, ज्यामुळे या विषयाची एक व्यापक समज तयार होण्यास आपणाला मदत होते.

२०१३ ते २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमध्ये या विषयाशी संबंधित विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे होते.

  • आíथक महामंदीशी सामना करण्यासाठी कोणत्या धोरणात्मक साधनांचा वापर करण्यात आलेला होता?
  • कोणत्या घटनामुळे १९५६ मधील सुवेझ संकट (Suez Crisis) निर्माण झालेले होते? याने कशाप्रकारे ब्रिटनच्या स्वयंकित जागतिक सत्तेच्या प्रतिमेवर शेवटचा प्रहार केला?
  • कोणत्या मर्यादेपर्यंत जर्मनीला दोन जागतिक महायुद्धासाठी जबाबदार धरले जाऊ शकते? समीक्षात्मक चर्चा करा.
  • पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षांचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नवअभिजन वर्गाने केलेले होते. परीक्षण करा.’

उपरोक्तप्रश्न हे संकीर्ण आणि विश्लेषणात्मक या दोन्ही माहितीचा एकत्रित आधार घेऊन विचारण्यात आलेले आहेत. यातील आíथक महामंदीशी संबंधित प्रश्न सोडविताना आपणाला आíथक धोरणांचा मुख्यत्वे विचार करावा लागतो, ही धोरणे नेमकी कोणती होती? या धोरणांच्या परिणामस्वरूप नेमके काय साध्य झालेले होते? अशा पद्धतीने माहिती असावी लागते. तसे या प्रश्नाचे स्वरूप संकीर्ण प्रकारात अधिक मोडणारे आहे, म्हणून येथे फक्त धोरणाची माहिती नमूद करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

यातील ‘पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षांचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नवअभिजन वर्गाने केलेले होते. परीक्षण करा.’

हा प्रश्न व्यक्तिविशेष प्रकारात मोडणारा आहे. या देशातील महत्त्वाचे व्यक्ती, त्यांची नावे, कार्य, विचारसरणी आणि त्यांनी कशा प्रकारे नेतृत्व केले होते, या सर्व पलूंचा आधार घेऊन या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित होते. अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत, म्हणून या विषयाचा सर्वागीण आणि सखोल अभ्यास करून परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी तयारी करणे गरजेचे आहे. यासाठी उपरोक्त चच्रेचा फायदा होऊ शकतो.

या घटकाची मूलभूत तयारी करण्यासाठी आपणाला एनसीईआरटीची इयत्ता ९वी ते १२वीच्या शालेय पुस्तकाचा आधार घेता येतो. तसेच याच्या जोडीला या घटकाचा अधिक सखोल पद्धतीने अभ्यास करण्यासाठी राजन चक्रवर्ती लिखित ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’, अर्जुन देव लिखित ‘हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’ आणि नॉर्मन लोवे लिखित ‘मास्टरिरग मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री’ या महत्त्वाच्या संदर्भ साहित्याचा वापर करावा.