गुजरात सरकारद्वारा संचालित गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, गांधीनगर येथे फॉरेन्सिक सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

*   एमएससी- फॉरेन्सिक ऑडोन्टोलॉजी

*     अभ्यासक्रमाचा कालावधी व उपलब्ध जागा- दोन वर्षे कालावधीच्या या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ३५.

*     आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी डेन्टल सर्जरी विषयातील पदवी कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

*   पोस्ट बेसिक डिप्लोमा इन फॉरेन्सिक नर्सिग –

*     अभ्यासक्रमाचा कालावधी व उपलब्ध जागा- एक वर्ष कालावधीच्या या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या १५.

*     आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी बी.एस्सी.- नर्सिग ही पदवी पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

*   विशेष सूचना- अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

अर्जदारांच्या संबंधित पात्रता परीक्षेच्या गुणांच्या टक्केवारीची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५% नी शिथिल आहे.

*   निवडपद्धती- अर्जदारांची त्यांच्या पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व शैक्षणिक आलेखाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

*   अधिक माहिती व तपशील- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीची जाहिरात पाहावी. युनिव्हर्सिटीच्या http://www.gfsu.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.  अधिक माहितीसाठी एमएससी- फॉरेन्सिक ऑडोन्टोलॉजी या अभ्यासक्रमासाठी (info.odontology@gmail.com) या मेल आयडीवर संपर्क साधावा तर तर  पोस्ट बेसिक डिप्लोमा इन फॉरेन्सिक नर्सिग या अभ्यासक्रमासाठी  (drrajeshbabu.babu@gmail.com)  या मेल आयडीवर संपर्क साधावा.

*   अर्ज करण्याची पद्धत व शेवटची

तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१७ आहे.