jee main result
अरे व्वा! जेईई मेन परीक्षेत तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० गुण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश!
The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?
National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?

दिव्यांगजन विकासविषयक विशेष अभ्यासक्रमांसाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पर्सन्स विथ मल्टीपल डिसिबलिटीज चेन्नई येथे खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहे.

बीएड – स्पेशल एज्युकेशन इन मल्टीपल डिसॅबिलिटीज ऑस्टीम स्पेक्ट्रम डिसऑर्डर/डिफ ब्लाइंडनेस अभ्यासक्रम (कालावधी – २ वर्षे ) – अर्जदारांनी विज्ञान विषयातील पदवी कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

डेव्हल्पमेंटल थेरपी विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (कालावधी -१५ महिने )  अर्जदारांनी वैद्यकशास्त्र, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीचथेरपी यांसारख्या विषयातील पदवी कमीतकमी ४०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ली इंटरव्हेंशन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (कालावधी – एक वर्ष)- अर्जदारांनी वैद्यकशास्त्र, बीएड स्पेशल एज्युकेशन, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी यांसारख्या विषयातील पदवी, चाइल्ड सायकॉलॉजी वा चाइल्ड डेव्हल्पमेंट यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा नर्सिगमधील पदवी पात्रता कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

एमए- सोशल वर्क- डिसॅबिलिटी स्टडीज या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (कालावधी – २ वर्षे ) अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. दिव्यांगजनविषयक विषयातील पात्रताधारकांना प्राधान्य देण्यात येईल.

एम.फिल (क्लिनिकल सायकॉलॉजी) अभ्यासक्रम (कालावधी – २ वर्षे ) अर्जदारांनी मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

विशेष सूचना- राखीव वर्गगटातील विद्यार्थ्यांसाठी गुणांच्या टक्केवारीची अट पाच टक्क्यांनी शिथिलक्षम आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टीपल डिसॅबिलिटिज चेन्नईच्या दूरध्वनी क्र. ०४४- २७४७२१०४ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या  http://niepmd.tn.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले प्रवेशअर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टीपल डिसॅबिलिटिज (दिव्यांगजन), मन्तुकुडू इस्ट कोस्ट रोड, कोवलम पोस्ट ऑफिस, चेन्नई- ६०३ ११२ या पत्त्यावर १५ जुलै २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.