सुहास पाटील * इंडियन नेव्हीमध्ये अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एन्ट्रीमधील शॉर्ट सव्र्हिस कमिशन मिळविण्यासाठी स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन इंडियन नेव्हल अॅकॅडमी, (INA) इझिमाला, केरळ येथे कोर्सकरिता प्रवेश पदाचे नाव - SSC Executive ( Information Technology) -एकूण रिक्त पदे - ५०. पात्रता - एम.एससी. / बी.ई. / बी.टेक. / एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअिरग / कॉम्प्युटर इंजिनीअरिंग / इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी / सॉफ्टवेअर सिस्टीम / सायबर सिक्युरिटी / सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्किंग / कॉम्प्युटर सिस्टीम अँड नेटवर्किंग / डेटा अॅनालायटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा एम.सी.ए. (कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील बी.सी.ए. / बी.एससी. पदवीसह). १० वीला किंवा १२ वीला इंग्लिश विषयात किमान ६०% गुण मिळालेले असावेत. तसेच पात्रता परीक्षेत किमान सरासरी ६०% गुण मिळविणे आवश्यक. पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल इंडियन नेव्हीच्या officer@navy.gov.in या ई-मेलवर दि. १ जुलै २०२२ पूर्वी सादर करावा लागेल. शारीरिक मापदंड - उंची - पुरुष - १५७ सें.मी., महिला - १५२ सें.मी. वजन - उंची आणि वय यांचे प्रमाणात वजन असावे. (पुरुष व महिला) ज्यांचे वय २० ते ३० वर्षे दरम्यानचे आहे आणि (i) उंची १५२ सें.मी. असलेले उमेदवारांसाठी किमान वजन ४३ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५३ कि.ग्रॅ. (ii) १५७ / १५८ सें.मी. उंचीसाठी - किमान वजन ४६ कि.ग्रॅ. व कमाल वजन ५७ कि.ग्रॅ. असावे. वयोमर्यादा - उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै १९९७ ते १ जानेवारी २००३ दरम्यानचा असावा. निवड पद्धती - COVID-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे निवडीकरिता घेण्यात येणारी इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (INET ( ड)) प्रवेश परीक्षा न घेता सव्र्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) इंटरह्यूमधील गुणवत्तेनुसार केली जाईल. SSB इंटरव्ह्यूकरिता उमेदवार शॉर्ट लिस्ट करताना (१) बी.ई. / बी.टेक. पात्रताधारकांचे / अंतिम वर्षांच्या उमेदवारांचे पाचव्या सेमिस्टपर्यंतचे सरासरी गुण पाहिले जातात. (२) पदव्युत्तर पदवी धारकांचे M.Sc. सर्व सेमिस्टर्सचे सरासरी गुण पाहिले जातील. पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षांतील उमेदवारांचे प्री-फायनल वर्षांची गुणवत्ता पाहिली जाईल. दि. १ जून २०१९ नंतर मिळविलेले नेव्हल / आर्मी / एअर विंगचे NCC- C सर्टिफिकेट (किमान बी ग्रेडसह) उमेदवारांना SSB साठी निवडताना किमान ५% गुणांची सूट दिली जाईल. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल टेस्ट घेतली जाईल. SSB इंटरव्ह्यूची विस्तृत माहिती इंडियन नेव्हीच्या www. joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ट्रेनिंग - सब-लेफ्टनंट पदावर निवडलेल्या उमेदवारांना ४ आठवडय़ांचे नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला येथे नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी पाठविले जाईल. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग नेव्हल इस्टॅब्लिशमेंट्समध्ये दिले जाईल. प्रोबेशन कालावधी - २ वर्षांचा असेल. नेमणूकीचा कालावधी - निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला १० वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल. उमेदवाराची कामगिरी / मेडिकल फिटनेस इ. पाहून नेमणुकीचा कालावधी २ वर्षांसाठी वाढविला जाईल. रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन अर्ज www. joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान करता येईल. * कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC), क्षेत्रीय कार्यालय, मुंबई (Advt. dt..२७.०१.२०२२). पुढील ५९४ पदांची थेट भरती. ESIC च्या विविध रिजनल ऑफिसेसमधील एकूण रिक्त पदे - ४,३१५. RO अहमदाबाद - UDC - १३६, स्टेनो - ६, MTS - १२७; RO पणजी - UDC - १३, स्टेनो - १, MTS - १२; फड विजयवाडा - UDC - ७, MTS - २६, स्टेनो - २; RO - रायपूर - UDC - १७, MTS - २१, स्टेनो - ३; RO इंदौर - UDC - ४४, MTS - ५६, स्टेनो - २; RO बंगळूरु - UDC - १९९, MTS - ६५, स्टेनो - १८; RO - हैदराबाद - UDC - २५, MTS - ४३, स्टेनो - ४ इ. (१) अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) - ३१८ पदे (अजा - ३२, अज - २९, इमाव - ८६, ईडब्ल्यूएस - ३२, खुला - १३९) (१३ पदे दिव्यांग कॅटेगरी इ/ LV - ४ पदे, D/HH- ३ पदे, LD - ३ पदे, SLD/MI- ३ पदे राखीव) (३२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता - पदवी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान (use of Office Suites & Databases). (२) स्टेनोग्राफर - १८ पदे (अजा - २, अज - २, इमाव - ५, ईडब्ल्यूएस - २, खुला - ७) (१ पद दिव्यांग कॅटेगरी इ/ LV साठी राखीव) (२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता - १२ वी उत्तीर्ण आणि स्किल टेस्टचे निकष - डिक्टेशन - १० मिनिटे ८० श.प्र.मि. वेगाने; ट्रान्सक्रिप्शन - ५० मिनिटे (इंग्लिश) व ६५ मिनिटे (हिंदिं). (३) मल्टिटास्किंग स्टाफ (MTS) - २५८ पदे (अजा - २६, अज - २३, इमाव - ७०, ईडब्ल्यूएस - २६, खुला - ११३) (१० पदे दिव्यांग कॅटेगरी इ/ LV - ३ पदे, D/HH- ३ पदे, LD - २ पदे, SLD/ MIB इ. - २ पदे राखीव) (२६ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पात्रता - १० वी उत्तीर्ण. वयोमर्यादा - दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी UDC आणि स्टेनो पदांसाठी १८ ते २७ वर्षे; MTS पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट - इमाव - ३ वर्षे; अजा/अज - ५ वर्षे; दिव्यांग - खुला - १० वर्षे, इमाव - १३ वर्षे, अजा/अज - १५ वर्षे) वेतन - UDC व स्टेनो पदांसाठी पे-लेव्हल - ४, अंदाजे वेतन दरमहा रु. ४३,००० MTS पदांसाठी पे-लेव्हल - १, अंदाजे वेतन दरमहा रु. २९,००० निवड पद्धती - ( क) अप्पर डिव्हिजन क्लर्क व मल्टिटास्किंग स्टाफ पदांसाठी - फेज-१ - पूर्वपरीक्षा - (फक्त पात्रता स्वरूपाची) ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट (१) जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग, (२) जनरल अवेअरनेस, (३) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड, (४) इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन - प्रत्येकी २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० प्रश्न व २०० गुण, वेळ १ तास. पूर्वपरीक्षेतील गुणवत्तेनुसार १:१० प्रमाणात फेज-२ साठी उमेदवार निवडले जातील. फेज-२ - UDC व MTS पदांसाठी मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची - पूर्वपरीक्षेसाठी असलेल्या विषयांवर आधारित प्रत्येकी ५० प्रश्न विचारले जातील. एकूण २०० प्रश्न, २०० गुणांसाठी वेळ २ तास. ऑब्जेक्टिव्ह परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. मुख्य परीक्षेमधील गुणवत्तेनुसार १:५ प्रमाणात उमेदवार कॉम्प्युटर स्किल टेस्टकरिता निवडले जातील. फेज-३ - (फक्त UDC पदांसाठी) कॉम्प्युटर स्किल टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपाची) (१) २ पॉवर पॉइंट स्लाइड्स बनविणे - १० गुण, (२) MS- Word वर मॅटर टाइप करणे (फॉरमॅटिंगसह) - २० गुण, (३) फॉम्र्युले वापरून MS- Excel वर टेबल बनविणे - २० गुण. एकूण ५० गुण, वेळ ३० मिनिटे. (II) स्टेनोग्राफर पदासाठी - फेज-१ - मुख्य परीक्षा - (१) इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन - १०० प्रश्न, वेळ ७० मिनिटे; (२) रिझिनग अॅबिलिटी - ५० प्रश्न, वेळ ३५ मिनिटे; (३) जनरल अवेअरनेस - ५० प्रश्न, वेळ २५ मिनिटे. प्रत्येक प्रश्नास १ गुण. एकूण २०० गुण. वेळ २ तास १० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील. मुख्य परीक्षेतील कामगिरी पाहून १:१० प्रमाणात उमेदवार फेज-२ स्टेनोग्राफीतील स्किल टेस्टसाठी निवडले जातील. फेज-२ - स्टेनोग्राफी स्किल टेस्ट पात्रतेमध्ये दिलेल्या निकषांनुसार घेतली जाईल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. अर्जाचे शुल्क - अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ माजी सैनिक खातेअंतर्गत उमेदवारांसाठी रु. २५०/- (फेज-१ लेखी परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना रु. २५०/- (बँकिंग चार्जेस वगळून) परत केले जातील. इतर उमेदवारांसाठी रु. ५०० उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना परीक्षा केंद्र निवडावे लागेल. उमेदवार एकापेक्षा अधिक (एकाच किंवा विविध रिजन्समधील) पदांसाठी (UDC/ Steno/ MTS)) अर्ज करू शकतात. अर्जासोबत - (१) पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (२०० X २३० Pixels) (२०-५० ‘kb). (२) सिग्नेचर (१४० X ६० Pixels) (१०-२० kb), (३) डाव्या हाताच्या अंगठय़ाची निशाणी (८०० x ४०० Pixels) (५०-१०० kb), (४) स्वहस्ते लिहिलेले घोषणापत्र, jpg/jpeg फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज www.esic.nic.inया संकेतस्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत करावेत.