पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या सामान्य विज्ञान विषयाच्या तयारीच्या दृष्टीने पुढील माहिती देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पचनसंस्था (Digestive System)
अन्ननलिका – अन्ननलिकेत खालील भागांचा समावेश होतो.
मुखगुहा (Mouth/buccal cavity), ग्रसनी (Pharynx), ग्रासिका (Oesophagus), जठर /अमाशय (Stomach), लघुआंत्र/लहान आतडे (Small intenstine) – याचे ३ भाग असतात- आदयांत्र (Duodenum), मध्यांत्र (Jejunum), शेषांत्र (Ileum), बृहद्आंत्र /मोठे आतडे (Large intestine), मलाशय (Rectum), गुद्वार (Anus)
मुखगुहा (Mouth) – लाळ (Saliva)- लाळेच्या तीन ग्रंथी (Salivery glands) असतात- कर्णमूल ग्रंथी, अधोहनु, अधोजिव्हा ग्रंथी
लाळ किंचित आम्लरीधर्मी (Slightly alkaline) असते. त्यामुळे अन्नातील जीवाणूचा नाश होतो. कार्य – अन्नातील पचनास सुलभ अशी पेस्ट तयार करण्यासाठी लाळेमध्ये टायलिन (ptylin) नावाचे विकर असते. हे विकर स्टार्चचे रूपांतर माल्टोजमध्ये करते. भाकरी चावल्यावर गोड लागते कारण स्टार्चचे रूपांतर माल्टोजमध्ये होते. भीतिदायक घटना घडल्यास लाळग्रंथीतून लाळ पाझरणे बंद होते.
ग्रसनी/घसा (Pharynx)- श्वासनलिका व अन्ननलिकांची तोंडे ग्रसनीमध्ये असतात. श्वासनलिकेच्या तेंडावर अधिकंठ नावाची झडप असते. अन्नकण श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग होत असतो.
ग्रासिका – लांबी सुमारे २५ सेंमी असते. यातून स्नायूंच्या आंकुचनामुळे अन्न खाली उतरत असते.
जठर – जठरात अन्न चार तास राहते, जठर रस  (gastric  juice) तसेच पेप्सीन व रेनिन ही दोन जाठरसार विकरे असतात. त्याचप्रमाणे जठरात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड (HCI) असते. रेनिन हे विकर फक्त लहान मुलांमध्ये आढळते, हे विकर दुधातील केसीनचे रूपांतर पॅराकेसीनमध्ये करते. हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड पचनासाठी माध्यम पुरवते. त्यामुळे जठरातील माध्यम आम्लधर्मी बनते. जठरात पचलेल्या अन्नाचे शोषले जात नाही तर फक्त पाणी, अल्कोहोल व औषधे शोषले जाते.
लहान आतडे – लहान आतडय़ाची लांबी सहा ते सव्वासहा मीटर असते आणि तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे. अन्नाचे मुख्यत्वे पचन येथे होते. जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण येथे होते. उरलेले अन्न सहा ते आठ तास येथे राहते. त्याचे पचन यात होते. लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाला आदयांत्र (duodenum) असे  म्हणतात. आदयांत्रात पुढील दोन प्रकारचे स्राव मिसळले जातात-
*    स्वादुिपड रस– हा रस स्वादुिपडातून स्रवतो व आदयांत्रात येऊन मिसळतो. यामध्ये  Trypsin, Amylase ,Lypase ही तीन विकरे असतात.
*    पित्तरस – पित्तरस यकृतातून स्रवतो व तो आदयांत्रात येऊन मिसळतो. पित्तरस स्निग्धपदार्थाचे ीे४’२्रऋ्रूं३्रल्ल म्हणजेच स्निग्ध पदार्थाच्या मोठय़ा कणांचे विभाजन छोटय़ा छोटय़ा कणांमध्ये घडवून आणतो.
मोठे आतडे– मोठय़ा आतडय़ाची लांबी दीड मीटर असते. यात पचलेले अन्न शोषले जात नाही. फक्त पाणी शोषले जाते. मोठय़ा आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स  ही छोटी टय़ुब जोडलेली असते.
ग्रंथी
बाह्य़स्रावी ग्रंथी (Exocrine glands) : याचा स्राव आवश्यक जागी प्रत्यक्षपणे किंवा नलिकांद्वारे वाहून नेला जातो. म्हणून त्यांना नलिकांसहित ग्रंथी म्हणतात. यांचा स्राव एकतर शरीरात स्रवतो किंवा शरीराबाहेर विसर्जति केला जातो. यांपकी काही ग्रंथींच्या स्रावांना विकर enzymes) म्हणतात. उदा. यकृत, किडनी, घामाच्या ग्रंथी, लाळेच्या ग्रंथी, जठर आतडय़ाच्या ग्रंथी इ.
अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine glands) : यांचा स्राव रक्तात मिसळला जातो व त्याद्वारे आवश्यक जागी पोहोचतो. त्यांना नलिका नसतात. म्हणून त्यांना नलिकाविरहित (ductless) म्हणतात. यांचाही स्राव एकतर शरीरात किंवा शरीराच्या बाहेर स्रवतो. यांच्या स्रावांना संप्रेरके म्हणतात. उदा. पीयूषिका ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, पॅराथायरॉइड ग्रंथी, स्वादुिपड, थायमस, अधोवृक्क ग्रंथी, प्लीहा, अंडाशय, वृषण इ.
स्वादुिपड – स्वादुिपड ही एकमेव ग्रंथी आहे, जी बहिस्र्रावी तसेच अंतस्र्रावी आहे. स्वादुिपडाच्या बहिस्र्रावी भागातील पेशींमधून स्वादुिपड रस नावाचा पाचक रस स्रवत असतो. हा रस अंतत: लहान आतडय़ाच्या आदयात्रांमध्ये (duodenum) आणून सोडला  जातो. स्वादुपिंडाच्या अंतस्र्रावी भागात लँगरहॅन्सची द्वीपे (islets of Langerahns) या नावाच्या पेशी विखुरलेल्या असतात. त्यांच्यापकी अल्फा पेशीमधून ग्लुकॅगॉन नावाचे हार्मोन, बीटा पेशींमधून इन्सुलिन नावाचे हार्मोन, तर डेल्टा पेशींमधून सोमॅटोटापीन हे वाढीचे हार्मोन स्रवत असते. इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते. स्वादुिपडामध्ये बिघाड झाल्यास इन्सुलिनची निर्मिती कमी झाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होतो.

Web Title: Psi prelims general science
First published on: 12-08-2013 at 12:09 IST