scorecardresearch

Premium

नोकरीची संधी

१) एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) (पब्लिक सेक्टर एंटरप्राईज), नवी दिल्ली (ADVT.  No.०५/२०२३) ज्युनियर एक्झिक्युटिव्हज पदांची भरती.

Airports Authority of India Recruitment for Junior Executives Posts
नोकरीची संधी

सुहास पाटील

१) एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) (पब्लिक सेक्टर एंटरप्राईज), नवी दिल्ली (ADVT.  No.०५/२०२३) ज्युनियर एक्झिक्युटिव्हज पदांची भरती. (१) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्राफिक कंट्रोल) – ४९६ पदे (अजा – ७५, अज – ३३, इमाव – १४०, ईडब्ल्यूएस – ४९, खुला – १९९) (५ पदे दिव्यांग कॅटेगरी ‘सी’ साठी राखीव).

Vacancies in Punjab National Bank
नोकरीची संधी : पंजाब नॅशनल बँकेत भरती
mutual fund analysis, Invesco India Large Cap Fund, investment
Money Mantra : फंड विश्लेषण – इव्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड
Job Opportunity Edsil India Limited CPSE STEM TEACHER Recruitment on contract basis
नोकरीची संधी
job opportunities
नोकरीची संधी

पात्रता – (दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी) – बी.एस्सी. (फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयांसह) उत्तीर्ण किंवा इंजिनीअरिंगमधील कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. (पदवीला फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषय कोणत्याही एका सेमिस्टरला अभ्यासलेले असावेत.)

(१० वी किंवा १२ वीला इंग्लिश विषय अभ्यासलेला असावा आणि इंग्लिश बोलण्याचे आणि लिखाणातील प्रावीण्य असावे.)

पात्रता परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना कागदपत्र पडताळणी वेळी पदवी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.  CGPA  तून गुणांमध्ये रूपांतर करण्याचा युनिव्हर्सिटीचे नॉम्र्स वापरून  CGPA चे रूपांतर गुणांमध्ये २ डेसिमलपर्यंत रूपांतरित करावेत.

वयोमर्यादा – दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी २७ वर्षे. (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

IDA वेतन श्रेणी – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ( ए-१) रु. ४०,०००/- – ३ टक्के – रु. १,४०,०००/-. अंदाजे वेतन रु. १२ लाख प्रती वर्ष  CTC.. सिनियर असिस्टंट (NE-६) अंदाजे वेतन रु. १३ लाख दरमहा.

निवड पद्धती – ऑनलाइन एक्झामिनेशन (चुकीच्या उत्तरांना गुण वजा केले जात नाहीत.) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्राफिक कंट्रोल) पदांसाठी लेखी परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी/ व्हॉईस टेस्ट आणि

बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आणि सायको अ‍ॅक्टिव्ह सब्स्टन्सेस कन्झम्प्शन टेस्ट घेतली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/-. (अजा/ अज/ महिला/ दिव्यांग उमेदवार आणि ज्यांनी  AAI मध्ये १ वर्षांची अ‍ॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली आहे, अशा उमेदवारांना फी माफ आहे.)

ऑनलाइन परीक्षेची तारीख नंतर  www. aai. aero या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.

अंतिम निवड लेखी परीक्षेतील/ इंटरह्यूमधील गुणवत्तेनुसार केली जाईल.

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्राफिक कंट्रोल) पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. त्यांना  International Civil Aviation Organisation (ICAO) लँग्वेज एक्झिक्युटिव्ह लेव्हल- ४ (ऑपरेशनल) पात्रता मिळवावी लागेल.

ऑनलाइन अर्ज  www. aai. aero या संकेतस्थळावर दि. १ नोव्हेंबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान करावेत.

ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.

 १) १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण अविवाहित पुरुषांना इंजिनीअर होवून पर्मनंट कमिशन मिळविण्यासाठी इंडियन आर्मीमध्ये जुलै, २०२४ पासून सुरू होणाऱ्या ‘Technical Entry Scheme ( TES) – ५१’ कोर्ससाठी  JEE ( Mains) २०२३ च्या स्कोअरवर आधारित प्रवेश. प्रवेश क्षमता – ९०.

पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांत (पीसीएम) किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक आणि  JEE ( Mains) २०२३ परीक्षेस बसलेले असावेत.

अर्जामध्ये उमेदवारांनी १२ वीला त्यांनी मिळविलेले PCM विषयातील गुणांची दोन डेसिमल पॉईंटपर्यंतची टक्केवारी दाखविणे आवश्यक आहे. उमेदवारांनी  JEE ( Mains) २०२३  Common Rank List ( CRL) मधील त्यांची रँक अर्जात भरणे आवश्यक.

वयोमर्यादा – (१ जुलै, २०२४ रोजी) १६ १/२ ते १९ १/२ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ जुलै २००४ ते १ जुलै २००७ दरम्यानचा असावा. १० वी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.

उंची – किमान १५७ सें.मी. (२.५ सें.मी. पर्यंत उंचीमध्ये सूट दिली जाईल. यासाठी मेडिकल बोर्डाचा दाखला सादर करावा लागेल. ज्यात ‘उमेदवाराचे ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उंची वाढू शकते.’ असे सर्टिफाय केलेले असेल.) वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात. छाती – ८१-८६ सें.मी.

निवड पद्धती –  JEE ( Mains) मधील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना प्रयागराज (यूपी), भोपाळ (एम्पी), बंगळूरु (कर्नाटक), जालंदर (पंजाब) यापैकी एका सिलेक्शन सेंटरचे आणि एसएसबी इंटरह्यूसाठीच्या तारखा यांचे वाटप केले जाईल. फेब्रुवारी/ मार्च, २०२४ मध्ये एसएसबी इंटरह्यू दोन फेजेसमध्ये घेतला जाईल. (कालावधी ५ दिवस) फेज-१ मधून अनुत्तीर्ण उमेदवारांना परत पाठविले जाईल. एसएसबी इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित गुणवत्ता यादी बनविली जाईल. अंतिम निवड वैद्यकीय तपासणी नंतर केली जाते.

ज्या उमेदवारांना  SSB साठी निवडले आहे, त्यांनी संबंधित कॅडेट्स ट्रेनिंग विंग्सच्या ३ नावांना पसंतीक्रम द्यावा लागेल. (CTW,  CME, पुणे;  CTW,  MCTE,  Mhow आणि  CTW- MCEME, सिकंदराबाद)

 खालील  CTWs मध्ये पुढील स्ट्रीममधील इंजिनीअरिंग ट्रेनिंग दिले जाते.

(१)   CTW,  CME, पुणे (Corps of Engineering) – सिव्हील अ‍ॅण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग

(२)  CTW,  MCTE Mhow (Corps of Signals) – आयटी अ‍ॅण्ड टेलीकॉम इंजिनीअरिंग

(३)  CTW,  MCEME,, सिकंदराबाद ( Corps of Electronics &  Mechanical Engineers) – इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग

ट्रेनिंग – एकूण ४ र्वष कालावधीसाठी ट्रेनिंग दिले जाईल. फेज-१ – (ए) इंटिग्रेटेड बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनीअरिंग ट्रेनिंग – कालावधी ३ र्वष (सीएमई, पुणे किंवा एमसीटीई, महू किंवा एमसीईएमई, सिकंदराबाद येथे), फेज-२ – (बी) १ वर्ष कालावधीचे इंटिग्रेटेड बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनीअरिंग. (सी) ४ वर्षांचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीकडून इंजिनीअरिंगमधील पदवी दिली जाते. ट्रेनिंगची ३ र्वष पूर्ण झाल्यावर कॅडेट्सना रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

वेतन – ४ वर्षांच्या ट्रेनिंगनंतर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल. वेतन असेल – मूळ पगार रु. ५६,१००/-   मिलिटरी सव्‍‌र्हिस पे रु. १५,५००/- अधिक इतर भत्ते. एकूण वेतन अंदाजे रु. १.२० लाख. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर जेंटलमेन कॅडेट्सना ट्रेनिंगच्या कालावधीसाठीचे रु. ५६,१००/- वरील इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल. युनिफॉर्म अलाऊंस रु. २०,०००/- प्रति वर्ष. ट्रेनिंग दरम्यान पहिल्या ३ वर्षांसाठी रु. १५ लाखांचा विमा संरक्षण वत्यानंतर रु. १ कोटीचे विमा संरक्षणदिले जाईल.

प्रमोशनसाठीचे निकष – लेफ्टनंट पदावरील नेमणूक कमिशन मिळालेल्या दिवसापासून कॅप्टन पदावर प्रमोशन २ वर्षांचे कमिशन पूर्ण झाल्यानंतर, मेजर पदावर प्रमोशन ६ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, लेफ्टनंट कर्नल पदावरील प्रमोशन १३ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, कर्नल (TS) रँकवरील प्रमोशन २६ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर.

ऑनलाइन अर्ज  www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. १२ नोव्हेंबर २०२३ (१२.०० वाजे) पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर डायलॉग बॉक्सवर त्याची पोहोच दिसेल. ३० मिनिटांनंतर उमेदवारांनी अर्जाची पिंट्रआऊट (दोन कॉपी) काढावी. त्यातील एक कॉपी उमेदवारांनी एसएसबी इंटरह्यूच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी. (१० वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (इन ओरिजिनल); १२ वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (इन ओरिजिनल); आयडी प्रूफ इन ओरिजिनल.  JEE ( mains) २०२३ च्या निकालाची प्रत आणि त्यांच्या स्वयंसाक्षांकीत २ प्रती आणि पासपोर्ट आकाराचे २० फोटोग्राफ्स जे स्वयंसाक्षांकीत करावेत.)

शंकासमाधानासाठी  Rtg वेबसाईट  www. joinindianarmy. nic. in वर उमेदवारांना Feedback/ Queries Option वापरता येईल.

suhassitaram@yahoo.com


Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Airports authority of india recruitment for junior executives posts amy

First published on: 01-11-2023 at 05:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×