scorecardresearch

Premium

CCL Recruitment 2023: कोलफील्डमध्ये दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ६०८ पदांसाठी होणार भरती

CCL Recruitment 2023: सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड( CCL)वर मोठी भरती होणार आहे. ६०० पेक्षा जास्त पदांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. सीसीएल अप्रेंटिस भरती २०२३साठी अधिकृत वेबसाईट centralcoalfields.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करा.

coalfield limited recruitment 2023 for 10th 12th pass in coalfield apply for 608 posts of the apprentice
सीसीएल भरती २०२३ ( फोटो – CCL official website)

Coalfield Limited Recruitment 2023:सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड( CCL)वर मोठी भरती होणार आहे. सीसीएल ट्रेड आणि फ्रेशर अप्रेंटीसच्या एकूण ६०८ पदांसाठी योग्य उमेदरांवाकडून अर्ज मागवले आहेत. इच्छूक उमेदवार सीसीएल अप्रेंटीस भरती २०२३साठी अधिकृत वेबसाईट centralcoalfields.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करा. सीसीएल भरती २०२३ साठी अर्ज भरण्याची शेवटची तारखी १८ जून आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार दहावी किंवा बारावी पास असावा.

CCL Recruitment 2023: महत्त्वाच्या तारखा


सीसीएल भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू – २४ मे २०२३
सीसीएल भरती ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – १८ जून २०२३

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

CCL Recruitment 2023: भरती तपशील

सीसीएल भरती २०२३साठी ट्रेड अपरेंटीस ५३६ पदे आणि फ्रेशर अप्रेंटीस पदांसाठी ७२ पदांवर भरती केली जाईल.

CCL Recruitment 2023: वयोमर्यादा

सीसीएल भरती 2023 साठी उमेदवारांची संपूर्ण वय १८वर्षे असणे आवश्यक आहे. ट्रेड अपरेंटिससाठी उम्मेदवार कमाल वय ३२वर्षे आणि फ्रेशर अपरेंटिससाठी जास्तीत जास्त वय २७ वर्षे असणे आवश्यक आहे. जास्तीच्या वयोमर्यादत ओबीसी वर्गातील उमेदवारांना तीन वर्षांपर्यंत एसी, एसटी वर्गाच्या उमेदवारांना पाच वर्षांना आणि दिव्यांगाना दहा वर्षांची सुट मिळेल.

हेही वाचा – SSC CHSL Recruitment 2023: कर्मचारी निवड आयोगातर्फे ४५२२ पदांवर होणार भरती, जाणून घ्या किती मिळेल पगार?

CCL Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता

उमेदवाराला दहावी , बारावी परिक्षेत उतीर्ण होण्यासह आयटीआय डिप्लोमा प्रमाणपत्र असले पाहिजे.

अधिसुचना येथे पाहा – https://www.centralcoalfields.in/pdfs/updts/2023-2024/24_05_2023_apprentice_25.pdf

हेही वाचा – SBI Fellowship 2023 : तरुणांना मिळणार ग्रामीण भागात काम करण्याची संधी, दरमहा मिळणार १७ हजार रुपये, ३१ मेपूर्वी करा अर्ज

सीसीएल अपरेंटिस भरतीसाठी असा अर्ज भरा

  • सीसीएलच्या वेबसाइटवा Centralcoalfields in भेट दया.
  • ‘सीसीएल अपरेंटिस रिक्रूटमेंट 2023’ लिंकवर क्लिक करा.
  • अधिसूचना लक्षपूर्वक वाचा आणि अर्ज भरण्यासाठी पुढे क्लिक करा.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि आवश्यक दस्तऐवज जोडा.
  • अर्ज भरावे आणि अंतिम अर्ज जमा करावा.
  • सीसीएल अपरेंटिस भरती २०२३साठी अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत प्रिंट करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×