Goa Shipyard Limited (GSL) Recruitment 2024 : दहावी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची एक नवीन संधी चालून आली आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे विविध अशा १०६ रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी २७ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या निकषांशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊ.

रिक्त जागा – १०६

पदाचे नाव आणि तपशील

१) असिस्टंट सुपरिटेंडन्ट (HR)- ०२
२) असिस्टंट सुपरिटेंडन्ट (Hindi Translator)- ०१
३) असिस्टंट सुपरिटेंडन्ट (CS)- ०१
४) टेक्निकल असिस्टंट (Electrical)- ०४
५) टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)- ०१
६) टेक्निकल असिस्टंट (Mechanical)- ०४
७) टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)- २०
८) टेक्निकल असिस्टंट (Civil)- ०१
९) टेक्निकल असिस्टंट (IT)- ०१
११) ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)- ३२
१२) ऑफिस असिस्टंट (Finance/IA)- ०६
१३) पेंटर- २०
१४) व्हेईकल ड्रायव्हर- ०५
१५) रेकॉर्ड कीपर- ०३
१६) कुक (Delhi office)- ०१
१७) कुक-०२
१८) प्लंबर- ०१
१९)सेफ्टी स्टुअर्ड- ०१

शैक्षणिक पात्रता:

१) असिस्टंट सुपरिटेंडन्ट (HR) (i) BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare) / BSW /B.A. (Social work) / B.A. (Sociology) आणि कामाचा पाच वर्षांचा अनुभव

२) असिस्टंट सुपरिटेंडन्ट (Hindi Translator)
इंग्रजीसह हिंदी पदवी, ट्रान्सलेशन डिप्लोमा, दोन वर्षांचा अनुभव

३) असिस्टंट सुपरिटेंडन्ट (CS)
पदवीधर, Inter Company Secretary (CS), दोन वर्षांचा अनुभव

४ -९) पद क्र. ४ ते ९ पर्यंत
इंजिनियरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) आणि दोन वर्षांचा अनुभव

१०) ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)
कोणत्याही शाखेतील पदवी, कॉम्प्युटरशी संबंधित किमान एक वर्षाचा कोर्स आणि चार वर्षांचा अनुभव

११) ऑफिस असिस्टंट (Finance/IA)
B.Com कॉम्प्युटरशी संबंधित किमान एक वर्षाचा कोर्स, एक वर्ष अनुभव

१२) पेंटर
दहावी उत्तीर्ण आणि पाच वर्षे अनुभव

१३) व्हेईकल ड्रायव्हर
दहावी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि पाच वर्षे अनुभव

१४) रेकॉर्ड कीपर
दहावी उत्तीर्ण, कॉम्प्युटरशी संबंधित किमान सहा महिन्यांचा कोर्स आणि एक वर्षाचा अनुभव

१५) कुक (Delhi office)
दहावी उत्तीर्ण, पाच वर्षांचा अनुभव

१६) कुक
दहावी उत्तीर्ण, दोन वर्षांचा अनुभव

१७) प्लंबर
ITI (प्लंबर) आणि पाच वर्षांचा अनुभव

१८) सेफ्टी स्टुअर्ड
दहावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)

वयोमर्यादा :

अर्जदाराचे वय १८ ते ३६ वर्षे, असे निश्चित करण्यात आले आहे. [SC/ST : पाच वर्षे सूट, OBC : तीन वर्षे सूट] (प्रत्येक पोस्टनुसार वयाची मर्यादा बदलणारी आहे. त्यामुळे अधिकृत अधिसूचना पाहा.)

नोकरीचे ठिकाण

गोवा, मुंबई व दिल्ली

अर्जाचे शुल्क

General/OBC : २०० रुपये SC/ST/PWD/ExSM : फी नाही

गोवा शिपयार्ड लिमिटेडची अधिकृत वेबसाईट – पाहा

रिक्त पदांबाबत अधिकृत पत्रक – पाहा

ऑनलाईन अर्ज – इथे करा अर्ज