WRD Maharashtra Bharti 2023: मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या भरतीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जलसंपदा विभागाच्या ताज्या अपडेटनुसार लवकरच संचालक, उपसंचालक, सहायक संचालक इत्यादी पदांसाठी भरती सुरू करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. भरतीबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी जलसंपादन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला असून या अंतर्गत गट-क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहायक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या विभागात किती जागा भरल्या जाणार आहेत ते जाणून घेऊया.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
tax department of the pcmc collect rs 977 crore 50 lakhs in financial year 2023 24
महापालिका मालामाल…पिंपरी- चिंचवडकरांनी भरला कोट्यवधींचा कर
Pimpri Chinchwad Municipal Corporation, Disconnects, 300 Water Connection, Tax Defaulters, marathi news,
पिंपरीतील ३०० मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित, पाणीपट्टी थकविल्याने महापालिकेची कारवाई
Maharashtra Education Department, balbharati, Spends, 71 Crore, Integrated textbooks, Blank Pages, students, teacher, parents, marathi news,
पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्याचा खर्च किती?

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कृषी विभागाकडून ‘या’ पदासांठी भरती सुरु, असा करा अर्ज

नाशिक जलसंपदा विभागात विविध पदांवर एकूण १,७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी ५० टक्के जागा रिक्त असून यामध्ये सहाय्यक अभियंता पदासोबत दफ्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार, मोजणीदार, कॅनॉल निरीक्षक अशा विविध पदांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता या भरती प्रक्रियेत आणखी ४८२ पदांची वाढ करून एकूण ९८२ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे.

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या औरंगाबाद परिमंडळात वर्ग ३ आणि ४ च्या मंजूर पदांपैकी ७५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. अशातच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने जलव्यवस्थापन, धरणे, कालव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, शेतीला पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात, तर जलसंपदा विभाग मोठी धरणे बांधण्याचे काम करतो. हे दोन्ही विभाग गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतात.शिवाय या महामंडळातील अधिकारी, कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या विभागात पदभरती झालेली नाही. यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दोन किंवा अधिक पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदांचा अहवाल महामंडळाच्या दक्षता पथकाने नुकताच शासनास सादर केला आहे.

हेही वाचा- भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदाच्या २३८ जागांसाठी भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या

रिक्त पदांची संख्या –

  • वर्ग १ च्या रिक्त पदांची संख्या – १४५
  • वर्ग २ ची रिक्त पदे- ७२२
  • वर्ग ३ ची रिक्त पदे- ५४१२
  • वर्ग ४ ची रिक्त पदे- १६०६
  • एकूण : ७८८५

पदाचे नाव –

संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, इत्यादी

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in