AI चा सतत चर्चेत असलेला टूल म्हणजे ChatGPT. चॅटजीपीटीने खूप कमी काळात भरपूर लोकप्रियता कमावली आहे. मोठमोठ्या कंपन्यासुद्धा आता चॅटजीपीटीला स्वीकारत आहे पण तुम्ही कधी चॅटजीपीटीच्या मदतीने पैसे कमावण्याचा विचार केला आहे का? जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर चॅटजीपीटी तुमच्या कामी येऊ शकते. चॅटजीपीटीवरून तुम्ही कमाई करू शकता.
१. संपादन करणे
AI चॅटबॉटकडून लिहिलेल्या लेखाला तुम्ही संपादित करू शकता आणि पैसे कमावू शकता.
२. ब्लॉग लिहिणे
जर तुम्हाला ब्लॉग लिहायचा असेल तर तुम्ही चॅटजीपीटीच्या मदतीने कोणत्याही विषयावर ब्लॉग लिहू शकता. चॅटजीपीटीच्या मदतीने तुम्हीही हवं तसं लिहू शकता आणि पैसे कमावू शकता.
हेही वाचा : ChatGPT चा वापर करून तुम्ही काय काय करू शकता?
३. रिसर्च करणे
जर तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही चॅटजीपीटीच्या मदतीने कोणत्याही विषयावर रिसर्च करू शकता आणि कमाई करू शकता.
४. कविता किंवा गाणे लिहिणे
चॅटजीपीटी कोणत्याही विषयावर कविता लिहू शकते, रॅप किंवा गाणे लिहू शकते. तुम्ही याद्वारे पैसे कमाऊ शकता.
हेही वाचा: ChatGPT अॅप आयफोनवर कसे वापरायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स
५. SEO किवर्ड्स शोधणे
जर तुमचे काम ऑनलाइन असेल आणि तुमचं काम जास्तीत लोकांनी सर्च करावं किंवा बघावं असं वाटत असेल तर त्यासाठी SEO किवर्ड्स तितकेच आवश्यक आहे. चॅटजीपीटी तुम्हाला किवर्ड शोधण्यास आणि Search Engine Optimization ची सेवा देऊ शकते, ज्याद्वारे तुम्ही पैसे कमावू शकता.