सुहास पाटील

१२ वी (विज्ञान) उत्तीर्ण अविवाहित पुरुषांना इंजिनिअर होऊन पर्मनंट कमिशन मिळविण्यासाठी इंडियन आर्मीमध्ये जानेवारी, २०२४ पासून सुरू होणाऱ्या ‘10+2 Technical Entry Scheme (TES) – 50’ कोर्ससाठी JEE ( Mains)2023 च्या स्कोअरवर आधारित प्रवेश.
प्रवेश क्षमता – ९०. पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांत (पीसीएम) किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक आणि JEE ( Mains) 2023 परीक्षेस बसलेले असावेत.’

Two years rigorous imprisonment for astrologers who claim to have a child
भंडारा : अपत्य प्राप्तीचा दावा करणे ज्योतिषांना भोवले!
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Monthly scholarship on behalf of Barty to promote research scholarship of Scheduled Caste students
५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती
MPSC, civil services, joint preliminary examination, Maharashtra Public Service Commission, 25 august, agricultural service,
‘एमपीएससी’ : कृषी सेवा परिक्षेबाबत मोठी बातमी; अधिकाऱ्यांनी सांगितले की…
Krushi Sevak, Krushi Sevak posts,
मोठी बातमी! २५ ऑगस्टच्या परीक्षेत कृषी सेवकांचा २५८ पदांच्या समावेशासंदर्भात महत्त्वाचा….
Sanjay Raut
Sanjay Raut : विधानसभा निवडणूक लांबणीवर पडण्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “जर निवडणूक आयोग…”
atul londhe Congress
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरून काँग्रेस आक्रमक, आयोग म्हणाले परीक्षा पुढे….
sushma andhare on ajit pawar
Sushma Andhare : “सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन चुकलो”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वरातीमागून…”

अर्जामध्ये उमेदवारांनी १२ वीला त्यांनी मिळविलेले PCM विषयातील गुणांची दोन डेसिमल पॉईंटपर्यंतची टक्केवारी दाखविणे आवश्यक आहे. उमेदवारांनी JEE ( Mains) 2023 Common Rank List ( CRL) मधील त्यांची रँक अर्जात भरणे आवश्यक.
वयोमर्यादा : (१ जानेवारी, २०२४ रोजी) १६१/२ ते १९१/२ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ जुलै २००४ ते १ जुलै २००७ दरम्यानचा असावा. १० वी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.
उंची : किमान १५७ सें.मी. (२.५ सें.मी. पर्यंत उंचीमध्ये सूट दिली जाईल. यासाठी मेडिकल बोर्डाचा दाखला सादर करावा लागेल. ज्यात ‘उमेदवाराचे ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उंची वाढू शकते.’ असे सर्टिफाय केलेले असेल.)
वजन : उंची आणि वय यांच्या प्रमाणात. छाती – ८१-८६ सें.मी.

निवड पद्धती : JEE ( Mains) मधील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना अलाहाबाद (यूपी), भोपाळ (एमपी), बंगलोर (कर्नाटक), कापूरथाळा (पंजाब) यापैकी एका सिलेक्शन सेंटरचे आणि एस्एस्बी इंटरव्ह्यूसाठीच्या तारखा यांचे वाटप केले जाईल. ऑगस्ट/सप्टेंबर, २०२३ मध्ये एसएसबी इंटरव्ह्यू दोन फेजेसमध्ये घेतला जाईल. (कालावधी ५ दिवस) फेज-१ मधून अनुत्तीर्ण उमेदवारांना परत पाठविले जाईल. एसएसबी इंटरव्ह्यूमधील कामगिरीवर आधारित गुणवत्ता यादी बनविली जाईल. अंतिम निवड वैद्यकीय तपासणी नंतर केली जाते.
ट्रेनिंग : एकूण ५ वर्ष कालावधीसाठी ट्रेनिंग दिले जाईल. (ए) बेसिक मिलिटरी ट्रेनिंग – कालावधी १ वर्ष (ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी गया येथे), (बी) टेक्निकल ट्रेनिंग – (i) फेज-१- ३ वर्षांचे प्री-कमिशिनग ट्रेनिंग सीएमई, पुणे किंवा एमसीटीई, महू किंवा एमसीईएमई, सिकंदराबाद येथे, (ii) फेज-२- १ वर्ष कालावधीचे पोस्ट कमिशन ट्रेनिंग सीएमई, पुणे किंवा एमसीटीई, महू किंवा एमसीईएमई, सिकंदराबाद येथे. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीकडून इंजिनिअरींगमधील पदवी दिली जाते. ट्रेनिंगची ३ वर्ष पूर्ण झाल्यावर कॅडेट्सना रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

वेतन : ४ वर्षांच्या ट्रेनिंगनंतर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल. वेतन असेल – मूळ पगार रु. ५६,१००/- मिलिटरी सव्र्हिस पे रु. १५,५००/- अधिक इतर भत्ते. एकूण वेतन अंदाजे रु. १.२० लाख. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर जेंटलमेन कॅडेट्सना ट्रेनिंगच्या कालावधीसाठीचे रु. ५६,१००/- वरील इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल. युनिफॉर्म अलाऊंस रु. २०,०००/- प्रति वर्ष. ट्रेनिंग दरम्यान पहिल्या ३ वर्षांसाठी रु. १५ लाखांचा विमा संरक्षण व त्यानंतर रु. १ कोटीचे विमा संरक्षण दिले जाईल.

प्रमोशनसाठीचे निकष : लेफ्टनंट पदावरील नेमणूक कमिशन मिळालेल्या दिवसापासून कॅप्टन पदावर प्रमोशन २ वर्षांचे कमिशन पूर्ण झाल्यानंतर, मेजर पदावर प्रमोशन ६ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, लेफ्टनंट कर्नल पदावरील प्रमोशन १३ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, कर्नल (TS) रँकवरील प्रमोशन २६ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर.

ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. In या संकेतस्थळावर दि. ३० जून २०२३ (१२.०० वाजे) पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर डायलॉग बॉक्सवर त्याची पोहोच दिसेल. ३० मिनिटांनंतर उमेदवारांनी अर्जाची पिंट्रआऊट (दोन कॉपी) काढावी. त्यातील एक कॉपी उमेदवारांनी एसएसबी इंटरव्ह्यूच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी. (१० वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (इन ओरिजिनल); १२ वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (इन ओरिजिनल); आयडी प्रूफ इन ओरिजिनल. JEE ( mains) 2023 च्या निकालाची प्रत आणि त्यांच्या स्वयंसाक्षांकीत २ प्रती आणि पासपोर्ट आकाराचे २० फोटोग्राफ्स जे स्वयंसाक्षांकीत करावेत.)

शंकासमाधानासाठी www. joinindianarmy. nic. in वर उमेदवारांना Feedback/ Queries Option वापरता येईल.
टाटा मोटर्स लिमिटेड पुणे (स्किल डेव्हलपमेंट सेंटर) मध्ये अप्रेंटिसेस कायदा १९६१ अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणाऱ्या पूर्ण वेळ ट्रेड अप्रेंटिसशिप प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश.
यातून प्रशिक्षित प्रशिक्षणार्थीना उद्योगात कुशल नोकऱ्यांवर नियुक्त केले जाऊ शकते. त्यांना उच्च शिक्षणासाठी तयार केले जाते. पुढील चार ट्रेड्समध्ये अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल.

१) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स
२) मेकॅनिक मोटर वेहिकल
३) टूल अँड डाय मेकर (press tools, jigs & fixtures)
४) मेकॅनिक मेकेट्रोनिक्स

प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षे ‘स्टायपेंड’ प्रशिक्षणार्थीना पहिल्या वर्षी दरमहा रुपये ८०००/- व दुसऱ्या वर्षी दरमहा रुपये ९०००/- स्टायपेंड दिले जाईल.
प्रशिक्षणार्थीना कॅन्टीन आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी मोफत उपलब्ध असेल.
पात्रता : जून २०२३ मध्ये प्रथम प्रयत्नात १०वी खुला/ इमाव कॅटेगरीतील उमेदवारांनी किमान ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असावी (अजा/ अज साठी ६० टक्के गुण आवश्यक). सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना गणित आणि विज्ञान विषयात ७० टक्के गुण मिळालेले असावेत. महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा किमान १४ वर्षे पूर्ण निवड पद्धती इंग्लिश माध्यमातून ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल फिटनेस. शंका समाधानासाठी संपर्क साधा ०२० ६६१३२९५१/ ८३०८०९४२७७ (सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजे दरम्यान) ऑनलाइन अर्ज https:// joinus. tatamotors. com/ apprenticeship/ या संकेतस्थळावर दिनांक २५ जून 2023 पर्यंत करावेत.

suhassitaram@yahoo.com