सुहास पाटील
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ज्युनियर इंजिनीअरच्या निवडीकरिता घेण्यात येणारी ज्युनियर इंजिनीअर (सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) परीक्षा २०२४ दि. २८ मार्च २०२४ रोजी जाहीर झाली आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल वॉटर कमिशन ( CWC), सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ( CPWD), मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस ( MES), बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन ( BRO), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ( NTRO) इ. ऑर्गनायझेशनमध्ये ज्युनियर इंजिनीअर ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड) पदांची भरती या परीक्षेतून केली जाते. (वेतन – पे-लेव्हल – ६, दरमहा रु. ६६,०००/-)

एकूण १,३२४ पदे

Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
WAPCOS Engineer Recruitment or Bharti For 275 Various Posts Check selection process and important details
WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज
BMC jobs opening news in marathi
BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी मोठी भरती! पदासंबंधीची माहिती पाहा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

रिक्त पदांचा तपशील –

(१) बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) – ज्युनियर इंजिनीअर (सिव्हील) JE( C) – ४३८ पदे (फक्त पुरुष).

पात्रता – सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किंवा सिव्हील इंजिनीअरिंग पदविका आणि सिव्हील इंजिनीअरिंगमधील प्लानिंग/ एक्झिक्युटिव्ह/ मेंटेनन्स कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(२) बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन ( BRO) – ज्युनियर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल) JE( E & M) – ३७ पदे (फक्त पुरुष).

पात्रता – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदविका आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(३) सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (CPWD) – JE (सिव्हील) – २१७ पदे (९ पदे दिव्यांग (कॅटेगरी OH – ३, HH – ३, Others – ३) साठी राखीव).

(४) सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (CPWD) – JE (इलेक्ट्रिकल) – १२१ पदे

पद क्र. ३ व ४ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदविका.

(५) सेंट्रल वॉटर कमिशन (CWC) – JE (सिव्हील) – १२० पदे

(६) सेंट्रल वॉटर कमिशन (CWC) – JE (मेकॅनिकल) – १२ पदे.

पद क्र. ५ व ६ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किंवा पदविका.

(७) मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (MES) – JE( C) – रिक्त पदे नंतर जाहीर केली जातील.

(८) मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (MES) – JE ( E & M) – रिक्त पदे नंतर जाहीर केली जातील.

पद क्र. ७ व ८ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किंवा संबंधित विषयातील पदविका आणि २ वर्षांचा अनुभव.

(९) DGQA Naval संरक्षण मंत्रालय – JE( M) – ३ पदे.

(१०) DGQA Naval संरक्षण मंत्रालय – JE( E) – ३ पदे. (अजा – १, खुला – २).

(११) फराक्का बॅरेज प्रोजेक्ट – JE ( C) – २ पदे (अजा – १, खुला – १).

(१२) फराक्का बॅरेज प्रोजेक्ट – JE ( M) – २ पदे (खुला).

(१३) नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन ( NTRo) – JE( C) – ६ पदे.

(१४) सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन JE( E) – २ पदे (अज – १, ईडब्ल्यूएस – १).

(१५) सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन JE( C) – ३ पदे (इमाव – २, खुला – १).

(१६) ब्रह्मपुत्रा बोर्ड, जलशक्ती मंत्रालय – JE( C) – २ पदे (खुला).

पद क्र. ९ ते १६ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी पद क्र. ३ व ४ सीपीडब्ल्यूडीमधील पदांसाठी ३२ वर्षेपर्यंत, (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९२ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.) इतर पदांसाठी ३० वर्षेपर्यंत. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९४ते १ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.) (उच्चतम वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षेपर्यंत)

बीआरओ (जीआरईएफ)मधील पदांसाठी शारीरिक मापदंड – उंची – १५७ सें.मी., छाती – ७५-८० सें.मी., वजन – ५० कि.ग्रॅ. शिवाय त्यांना शारीरिक क्षमता चाचणी (१ मैल अंतर १० मिनिटांत धावणे) द्यावी लागेल. दृष्टी चष्म्यासह – ६/६.

निवड पद्धती – पेपर-१ – ४ जून ते ९ जून २०२४ दरम्यान घेतला जाईल. (संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी). (१) जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ५० प्रश्न, (२) जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, (३) पार्ट-ए – जनरल इंजिनीअरिंग (सिव्हील अँड स्ट्रक्चरल) किंवा पार्ट-बी – जनरल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल) किंवा पार्ट-सी – जनरल इंजिनीअरिंग (मेकॅनिकल) – १०० प्रश्न. एकूण २०० प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला १ गुण. एकूण २०० गुण, वेळ २ तास.

पेपर-२ – कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप पार्ट-ए – जनरल इंजिनीअरिंग (सिव्हील अँड स्ट्रक्चरल) किंवा पार्ट-बी – जनरल इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल) किंवा पार्ट-सी – जनरल इंजिनीअरिंग (मेकॅनिकल) एकूण १०० प्रश्न, ३०० गुणांसाठी वेळ २ तास. इंजिनीअरिंग वरील प्रश्नांचा दर्जा पदविका स्तरावरील असेल.

प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

उमेदवारांना पेपर-२ च्या वेळी स्वतचा Slide- Rule, Calculator, Logarithm Table आणि Steam Table आणण्यास परवानगी आहे.

पेपर-१ व पेपर-२ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातील. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पदांचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे.

अंतिम निवड – पेपर-१ व पेपर-२ मधील गुणवत्तेनुसार व पदांच्या पसंतीक्रमानुसार केली जाईल. कागदपत्र पडताळणी User Department कडून घेतली जाईल.

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, पणजी इ.

परीक्षा शुल्क – रु. १००/-. (अजा/ अज/ महिला /दिव्यांग यांना फी माफ आहे.) ऑनलाइन पद्धतीने फी दि. १९ एप्रिल २०२४ (२३.०० वाजे)पर्यंत भरता येईल.

अॅडमिट कार्ड परीक्षेच्यापूर्वी ३ ते ५ दिवस अगोदर Regional Director SSC वेस्टर्न रिजनच्या www. sscwr. net या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

ऑनलाइन अर्जासोबत JPEG/ JPG Format (१० kb to २० kb) मध्ये स्कॅन केलेली उमेदवाराची स्वाक्षरी अपलोड करावयाची आहे.

ऑनलाइन अर्जात काही सुधारणा/ बदल करावयाचा असल्यास Window for Application Form Correction दि. २२/२३ एप्रिल २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत उपलब्ध असेल. (पहिल्या वेळेला करेक्शन करण्यासाठी रु. २००/- भरावे लागतील. दुसऱया वेळेला त्यासाठी रु. ५००/- भरावे लागतील.)

अजा/ अजच्या उमेदवारांकडे Annexure- VII, इमावच्या उमेदवारांकडे Annexure- VIII, ईडब्ल्यूएस उमेदवारांकडे Annexure- IX मधील दाखले असावेत.

ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराचा फोटोग्राफ कॅप्चर केला जाईल, याची सविस्तर माहिती जाहिरातीमधील पॅरा १०.३ मध्ये दिलेली आहे.

अर्ज कसा करावा – (१) रजिस्ट्रेशन – One time Registration कसे करावे याची विस्तृत माहिती जाहिरातीमधील Annexure- III मध्ये उपलब्ध आहे. (२) Apply Online (ऑनलाइन अर्ज कसा भरावा याची विस्तृत माहिती जाहिरातीमधील Annexure- IV मध्ये उपलब्ध आहे.)

ऑनलाइन अर्ज https:// ssc. gov. in या संकेतस्थळावर दि. १८ एप्रिल २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत करावेत.