सुहास पाटील

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘सर्कल बेस्ड ऑफिसर्स’ पदांची भरती. ( Advt. No. CRPD/ CBO/२०२३-२४/१८) एकूण रिक्त पदे – ५४४७. (यात ५,२८० नियमित पदे व १६७ बॅकलॉगच्या पदांचा समावेश आहे.) स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्यक्षेत्र १६ सर्कल्समध्ये विभागलेले आहे. महाराष्ट्र, भोपाळ, हैद्राबाद, जयपूर इ. ४ सर्कल्समधील रिक्त पदांचा तपशील –

Simultaneous record performance of mother-son in nagpur
नागपूर : आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Connecting trust, suicide, suicide idea,
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी…
Job Opportunities Opportunities through Staff Selection Commission
नोकरीची संधी:स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत संधी
IPO of Forcas Studio Limited from August 19
फोर्कास स्टुडिओ लिमिटेडचा १९ ऑगस्टपासून ‘आयपीओ’
Job Opportunity Recruitment through Staff Selection Commission
नोकरीची संधी: स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरती
Startups like Ola Electric Mobility FirstCry and Unicommerce which sold shares responded to the IPO
दमदार बाजार पदार्पणाचे नवउद्यमींमध्ये नव्याने पर्व; ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय, युनिकॉमर्सची सूचिबद्धता फलदायी
Capital market regulator SEBI by Hindenburg Research Real Estate Investment Trust
हिंडेनबर्गचे आरोप निराधार;‘रिट्स’ महासंघाचेही प्रत्युत्तर 

(१) महाराष्ट्र (महाराष्ट्र/ गोवा राज्य) (स्थानिय भाषा – मराठी/ कोंकणी) – एकूण ३०४ पदे (अजा – ४५; अज – २२ ४ बॅकलॉगमधील; इमाव – ८१; ईडब्ल्यूएस – ३०, खुला – १२२) (२२ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव. कॅटेगरी – LD – ४, VI – ४, HI – ६, d & e – ८).

(२) मुंबई मेट्रो (महाराष्ट्र) – एकूण ९० पदे (अजा – १३; अज – ६; इमाव – २४; ईडब्ल्यूएस – ९, खुला – ३८) (४ पदे दिव्यांग कॅटेगरी – VI, HI, LD, d & e साठी प्रत्येकी १ पद राखीव).

(३) हैदराबाद (तेलंगणा राज्य) (स्थानिय भाषा – तेलगू) – एकूण ४२९ पदे (अजा – ६३ २; अज – ३१ २ बॅकलॉगमधील; इमाव – ११४; ईडब्ल्यूएस – ४२, खुला – १७५) (३० पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव – LD – ४, VI – ५, HI- ११, d & e – १०).

(४) भोपाळ (मध्य प्रदेश/ छत्तीसगड राज्य) (स्थानिय भाषा – हिंदी) – एकूण ४५२ पदे (अजा – ६७; अज – ३५; इमाव – १२१; ईडब्ल्यूएस – ४५, खुला – १८४) (२४ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव – LD – ४, VI – ७, HI – ७, d & e – ६).

(५) जयपूर (राजस्थान राज्य) (स्थानिय भाषा – हिंदी) – एकूण ५०० पदे (अजा – ७५; अज – ३७; इमाव – १३५; ईडब्ल्यूएस – ५०, खुला – २०३) (२० पदे दिव्यांगांकरिता राखीव – LD – ५, VI – ५, HI – ५, d & e – ५).

(६) बेंगळूरु (कर्नाटक राज्य) (स्थानिय भाषा – कन्नड) एकूण ३८७ पदे (अजा – ६१; अज – ३१; इमाव – १०२; ईडब्ल्यूएस – ३८, खुला – १५५).

पात्रता : पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण.

अनुभव : दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी शिड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा रिजनल रूरल बँकेमधील ‘ऑफिसर’ पदावरील कामाचा २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९९३ ते ३१ ऑक्टोबर २००२ दरम्यानचा असावा.) (अजा/अज – ३५ वर्षे; इमाव – ३३ वर्षे; दिव्यांग – खुला – ४० वर्षे, इमाव – ४३ वर्षे, अजा/अज – ४५ वर्षे).

स्थानिय भाषा : ज्या राज्यातील पदांसाठी उमेदवाराने अर्ज केलेला आहे. त्या राज्यातील स्थानिय भाषा उमेदवारास अवगत असावी. (वाचता, लिहिता व समजता येणे आवश्यक.) निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून (ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रिनिंग व इंटरह्यूनंतर) त्यांना त्या स्थानिय भाषेमधील टेस्ट ऑफ नॉलेज द्यावी लागेल. ज्या उमेदवारांनी संबंधित स्थानिय भाषा १० वी किंवा १२ वीला अभ्यासलेली असेल त्यांना ही टेस्ट द्यावी लागणार नाही.

निवड पद्धती : ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग आणि इंटरह्यू.

ऑनलाइन लेखी परीक्षा : जानेवारी २०२४ मध्ये घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट १२० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट ५० गुणांसाठी (कॉम्प्युटरवर उत्तरे टाईप करावी लागतील.)

( i) ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट – वेळ २ तास, ४ सेक्शन्स चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

(ii) डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट – ५० गुणांसाठी, वेळ ३० मिनिटे, २ प्रश्न. राज्यनिहाय आणि कॅटेगरीनुसार ऑनलाइन लेखी परीक्षेमधील गुणांनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल. यातून रिक्त पदांच्या ३ पट उमेदवार त्यांच्या सरासरी गुणवत्तेनुसार इंटरह्यूसाठी निवडले जातील. इंटरव्ह्यू ५० गुणांसाठी घेतला जाईल.

अंतिम निवड करताना उमेदवारांचे ऑनलाइन टेस्टचे (१७० गुणांपैकी) गुण (नॉर्मलाईज्ड केलेले) ७५ टक्के वेटेज आणि इंटरह्यूचे (५० गुणांपैकी) गुण २५ टक्के वेटेज देवून एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी सर्कल/ कॅटेगरीनुसार बनविली जाईल.

अर्जाचे शुल्क : रु. ७५०/-. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई.

वेतन : रु. ३६,०००/- १४९०/७ टक्के. ६३,८४०/- स्केलवर मूळ वेतन असेल रु. ३६,०००/- (अधिक अनुभवाच्या २ वर्षांसाठी २ अॅडव्हान्स्ड इन्क्रिमेंट्स दिले जातील आणि इतर देय भत्ते. निवडलेले उमेदवार सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBOs) पदावर ६ महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीसाठी नियुक्त केले जातील. प्रोबेशन कालावधीमधील कामगिरी पाहून प्रोबेशनर्सना ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-१ वर कायम केले जाईल.

ऑनलाइन अर्ज https:// bank. sbi/ web/ careers/ current- openings या संकेतस्थळावर दि. १२ डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. शंकासमाधानासाठी फोन नं. ०२२-२२८२०४२७ वर संपर्क साधा किंवा ई-मेल आयडी http:// cgrs. ibps. in वर संपर्क साधा.)