एचआर मधील करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर तरुण/तरुणींना ‘मास्टर ऑफ ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट अँड एम्प्लॉयी रिलेशन्स (MHCM & ER)’ कोर्ससाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश मिळविण्याची सुवर्णसंधी, MHCM & ER हा २ वर्षाचा पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम मुंबई/नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे. यातून इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि HRD मधील विशेष व्यावसायिक ( Specialised Professionals) विकसित केले जातात. महाराष्ट्र शासनाची कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीज ( LNML MILS) दादाभाई चामर बागवाला रोड, परेल, मुंबई – ४०००१२ (ही संस्था जुलै १९४७ मध्ये स्थापनझाली आहे.) आणि रिजनल लेबर इन्स्टिट्यूट, नागपूर या संस्थांमार्फत MHCM & एफ कोर्समधून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि लेबर स्टडीजचे प्रशिक्षण थिअरी आणि प्रक्टिसच्या माध्यमातून दिले जाते. दि. १ फेब्रुवारी २०२३ पासून या दोन्ही इन्स्टिट्यूट्स N. M. Lokhande Maharashtra Institute of Labour Studies या नावाने ओळखल्या जातात.

पात्रता – पदवी परीक्षा उत्तीर्ण (कोणतीही शाखा) (अंतिम वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पात्र आहेत.)

निवड पद्धती – शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा (ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) ज्यात एकूण १५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल असे एकूण १५० गुण, वेळा १२० मिनिटे.

(१) क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड – १५ प्रश्न, (२) लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन – ३५ प्रश्न, (३) सामान्य ज्ञान (विशेष करून महाराष्ट्राशी संबंधित) आणि कामगार चळवळ – ४० प्रश्न, (४) इंग्लिश लँग्वेज अँड यूसेज – ४० प्रश्न,

चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जात नाहीत.

प्रवेश परीक्षेचे माध्यम – इंग्लिश.

परीक्षा केंद्राचे ठिकाण दिनांक, वेळ इ. माहिती उमेदवारांना ॲडमिट कार्डद्वारे कळविली जाईल

प्रवेश क्षमता – मुंबईसाठी ५२ आणि नागपूरसाठी ४०.

कोर्स फी – कोर्स फी पहिल्या वर्षासाठी रु. ६२,५००/- आणि दुसऱ्या वर्षासाठी रु. ६५,०००/- (मुंबईसाठी) रु.६४,०००/-

( नागपूरसाठी).

हेही वाचा >>> डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा

अर्जाचे शुल्क – मुंबई इन्स्टिट्यूट आणि नागपूर इन्स्टिट्यूट यापैकी एका संस्थेकरिता अर्ज करण्यासाठी खुला गट रु. १.३००/- मागासवर्गीय आणि ईडब्ल्यूएस रु. १,०००/- दोन्ही इन्स्टिट्यूट्सकरिता अर्ज करण्यासाठी खुला गट रु. १,८००/- मागासवर्गीय आणि ईडब्ल्यूएम रु. १,४००/-

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याकरिता बँकेची माहिती

Account Name – Maharashtra Institute of Labour Studies Director, Account Number – 10594827132

ISC Code – SBIN0001884

अर्ज भरण्याविषयी – शंकासमाधानासाठी – ०२२-२४१२५३३२ या फोनवर संपर्क करा किंवा mils- mini. net. in यावर ई-मेल करा. MHCM & एफ प्रवेश परीक्षा दि ३ जून २०२४ रोजी घेतली जाईल, www.mils.co.in या संकेतस्थळावरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येतील, MHCM & एफ अॅडमिशन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन www.mis.co.in या संकेतस्थळावर दि. १५ मे २०२४ पर्यंत करावे.

( MHCM & ER Admission 2024-25 N & gt; New Registration fill required details& gt; Payment of fees & gt; Reister Button Fill up the MHCM & ER Application form & gt; Submission) रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या केल्यावर उमेदवारांना त्यांचा ID आणि password ई-मेलद्वारे कळविला जाईल. हा ID आणि password वापरून उमेदवार login करून आपला अर्ज भरू शकतील. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी Edge Cromium, Mozilla Firefox ( Version 81 to 98), Google Chrome (version 76 to 99) या browser चा वापर करावा, प्लेसमेंट प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये इन्स्टिटयूटचे २०२२-२३ साली एकूण ५५ आणि२०२३-२४ साली ४७ उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये ट्रेनी एचआर, मॅनेजमेंट ट्रेनी, पीजी ट्रेनी, एक्झिक्युटिव्ह ट्रेनी इ. पदांवर कैंपस प्लेसमेंट मिळाली आहे.