Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठांतर्गत एकूण तीन पदांसाठी इच्छुक उमेदवार नोकरीचा अर्ज करू शकतो. या जागा नेमक्या कोणत्या आहेत, तसेच कोणत्या जागेवर किती उमेदवारांची भरती करण्यात येईल याचा तपशील पाहा. नोकरीचा अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता व अंतिम तारीख जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai University recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

मुंबई विद्यापीठामध्ये पुढील पदांवर भरती होणार आहे.

पदोन्नती समुपदेशक [Promotion Counselor] – या पदासाठी एकूण १ जागा रिक्त आहे.

कनिष्ठ प्रणाली अधिकारी [Jr. System Officer] – या पदासाठी एकूण १ जागा रिक्त आहे.

शिपाई [Peon]- या पदासाठी एकूण १ जागा उपलब्ध आहे.

मुंबई विद्यापीठामध्ये एकूण तीन पदासांठी तीन रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….

Mumbai University recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

पदोन्नती समुपदेशक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मार्केटिंग क्षेत्रातील MBA पदवी असावी.

कनिष्ठ प्रणाली अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे B.Sc. IT, B.C.A क्षेत्रातील पदवी असावी.

शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बारावीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.

Mumbai University recruitment 2024 : वेतन

पदोन्नती समुपदेशक या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास ४३,२००/- रुपये वेतन देण्यात येईल.

कनिष्ठ प्रणाली अधिकारी या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास २४,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.

शिपाई या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास १०,८००/- रुपये वेतन देण्यात येईल.

Mumbai University recruitment 2024 – मुंबई विद्यापीठ अधिकृत वेबसाईट
https://mu.ac.in/

Mumbai University recruitment 2024 – अधिसूचना –
https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/04/Job-Opening.pdf

Mumbai University recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी उमेदवारास अर्ज करायचा असल्यास त्याने तो ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी उमेदवारांनी खालील पत्त्याचा वापर करावा –
अर्जासाठी पत्ता – गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई- ४०० ०९८.
वरील कोणत्याही पदाच्या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराने अर्जामध्ये आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
तसेच, नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी पाठविणे अनिवार्य आहे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २९ एप्रिल २०२४ अशी आहे.

मुंबई विद्यापीठांतर्गत होणाऱ्या वरील पदांच्या भरतीसंबंधी इच्छुक उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी, मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, तसेच अधिसूचना वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university is hiring for three positions how to apply what is the last date check out dha