स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आर्मरर्स (केवळ माजी सैनिक/माजी CAPF/AR साठी राखीव) आणि लिपिक संवर्गातील( Clerical Cadre) कंट्रोल रूम ऑपरेटर (केवळ माजी सैनिक/राज्य अग्निशमन सेवा कर्मचारी/माजी CAPF/AR साठी राखीव) या पदांकरिता १०७ जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अर्जाची प्रक्रिया ६ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० ऑक्टोबर आहे.

एसबीआय भरती २०२३ रिक्त जागा तपशील:

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
India Post Recruitment 2024
India Post Jobs 2024: इंडिया पोस्टमध्ये निघाली भरती! ६३ हजारपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया
Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर

ही भरती मोहीम १०७ रिक्त जागा भरण्यासाठी आयोजित केली जात आहे ज्यापैकी ८९ रिक्त पदे लिपिक संवर्गातील कंट्रोल रूम ऑपरेटर पदासाठी आहेत आणि १८ रिक्त जागा आर्मरर्सच्या पदासाठी आहेत.

हेही वाचा – भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी होणार भरती; ‘ही’ आहे शेवटची तारीख, लवकर करा अर्ज

एसबीआय भरती २०२३ वयोमर्यादा :

आर्मरर पदासाठी उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि उमेदवारांचे कमाल वय ४५ वर्षे असावे. कंट्रोल रूम ऑपरेटरच्या पदासाठी, उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि माजी सैनिक/ माजी CAPF/AR साठी कमाल वय ४८ वर्षे आणि राज्य अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांसाठी ३५ वर्षे असावे.

अधिसुचना – https://sbi.co.in/documents/77530/36548767/050920231755-Detailed+AD+Final.pdf/0ff0a69a-2d59-a2d3-76b7-34c95bc95e9b?t=1693916808484

एसबीआय भरती २०२३ अर्ज शुल्क :

उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

हेही वाचा- ओएनजीसीमध्ये २५०० पदांसाठी होणार भरती; कोण करू शकते अर्ज, केव्हा आहे शेवटची तारीख?

एसबीआय भरती २०२३ : अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

  • एसबीआयच्या अधिकृत साईटला sbi.co.in वर भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर, करिअर टॅबवर क्लिक करा
  • एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना भरतीसाठी लिंक दिसेल
  • लॉगिन तपशील किंवा नोंदणी तपशील टाका.
  • अर्ज भरा आणि कागदपत्रे जमा करा.
  • अर्ज सादर करा
  • पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.