वृषाली मेघश्याम धोंगडी

पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा असून आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. सजीवांचे सभोवताली असणारे सर्व जैविक तसेच अजैविक घटक, घडणाऱ्या घटना व त्यांचा प्रभाव यांना एकत्रितपणे पर्यावरण असे म्हणतात. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. थोडक्यात आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक तसेच जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनत असते. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण.

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

पर्यावरण आणि सजीव यांमध्ये घडणाऱ्या आंतरक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. पर्यावरण हे स्थिर नसून सतत बदलणारे असते. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो.

  • जैविक घटक
  • अजैविक घटक

पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास पारिस्थितिकी (Ecology) असे म्हणतात. पारिस्थितिकी म्हणजे सजीवांचा त्यांच्या मूळ निवासस्थानी केलेला अभ्यास होय. इकॉलॉजी हा शब्द ग्रीक शब्दापासून बनलेला आहे (okios – निवासस्थान + logos – अभ्यास). या शब्दाचे सर्वप्रथम उपयोजन १९६८ मध्ये केले होते. मात्र हा शब्द आपल्या लेखनांमध्ये वापरून प्रचलित करण्याचे श्रेय हेकेल या संशोधकास जाते.

पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते, त्यास परिसंस्था (Ecosystem) असे म्हणतात. १९५३ मध्ये ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ आर्थर टान्सली यांनी परिसंस्थेची व्याख्या केली होती. त्यांच्या व्याख्येनुसार पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या एकीकरणातून आकारास येणारी व्यवस्था म्हणजे परिसंस्था होय. थोडक्यात एखादा निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते. म्हणजेच परिसंस्थेमध्ये त्या प्रदेशातील जैविक तसेच अजैविक घटकांचा समावेश होतो हे महत्त्वाचे.

परिसंस्था ही पारिस्थितिकी विज्ञानातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. परिसंस्था ही कितीही लहान (जसे की लहान डबके, शेणाचा गोळा व त्यातील सजीव) तसेच कितीही मोठी असू शकते (उदाहरणार्थ- संपूर्ण पृथ्वी, सागरी परिसंस्था, इत्यादी ). परिसंस्थेतील एका घटकाचा परिणाम हा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या परिसंस्थांतील इतर घटकांवर होत असतो. पर्यावरणातील जलचक्र विविध वायुचक्रे म्हणजेच कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अखंडपणे चालू राहिली की, पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यांमुळेही पर्यावरण-संतुलन कायम राहते. ज्याप्रमाणे पर्यावरण सजीवांना प्रभावित करते त्याचप्रमाणे सजीवदेखील आपल्या विविध जीवनप्रक्रियांच्या आधारे- जसे की पुनरुत्पादन, वाढीच्या प्रक्रिया व विघटन इत्यादी प्रक्रियांमुळे पर्यावरणास प्रभावित करतात.

परिसंस्था संरचनेत सजीवांमध्ये होणारे ऊर्जेचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे असते. सूर्यापासून पृथ्वीवर येणारी ऊर्जा उत्पादकांपासून भक्षकांपर्यंत संक्रमित केली जाते. एका ऊर्जा-विनिमय स्तरापासून दुसऱ्या विनिमय-स्तरांकडे ऊर्जेचे होणारे क्रमवार संक्रमण म्हणजे अन्नसाखळी होय. अन्नसाखळीतील उत्पादक वर्ग म्हणजे असा वर्ग जो स्वयंपोषी आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रकाशसंश्लेषक हरित वनस्पती आणि रसायनसंश्लेषक जिवाणू (chemosynthetic bacteria) यांचा समावेश होतो. सागरी परिसंस्थांमध्ये प्लवंग (phytoplankton) हे सर्वात महत्त्वाचे उत्पादक म्हणून कार्य करतात. सागराची उत्पादकता ही त्यावर अवलंबून असते. दुसरा म्हणजे भक्षक वर्ग, हा अन्नासाठी वनस्पतींवर प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे अवलंबून असतो.

अन्नसाखळीतील स्थानानुसार भक्षकांचे तीन वर्ग आहेत. १. प्राथमिक (उदा. हरीण, गाय इ.) २. द्वितीयक (उदा. कोल्हा, उंदीर इ.) ३. तृतीयक (उदा. वाघ, सिंह, साप इ. ). मृत प्राणी व वनस्पतींचे तसेच इतर सेंद्रिय पदार्थांचे परपोषी सजीव विघटक म्हणून ओळखले जातात. जिवाणू, कवके, बुरशी हे प्रमुख विघटक आहेत. विघटनाच्या प्रक्रियेमध्ये कार्बोदके, प्रथिने, शर्करा व इतर सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन काही असेंद्रिय पोषणद्रव्य पर्यावरणात मुक्त होतात. या जैविक-अजैविक चक्रीय संक्रमणास पोषणद्रव्ये चक्र (Nutrient cycle) असे म्हणतात.

थोडक्यात परिसंस्थेमध्ये परिसंस्था अशी संरचना असते. पर्यावरण व परिसंस्था यांचा आंतरसंबंध तसेच त्यामधील अन्नसाखळीचा अभ्यास परिसंस्थेतील ऊर्जेचा आणि पोषणद्रव्याचा होणारा विनिमय समजावून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे जीव समुदायातील विविध सजीवांमधील परस्पर पोषणसंबंध समजणे शक्य होते.